झी मराठी वाहिनीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका सध्या प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. या मालिकेचे कथानक थोडे हटके असून या हटके कथानकामुळे ही मालिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस या मालिकेची लोकप्रियता खूपच वाढत आहे. मालिकेत सध्या अभिराम व श्वेता यांच्या लग्नाचे कथानक सुरु असल्याचे पाहायला मिळाले. अशातच आता अभिराम व श्वेताऐवजी अभिराम व लीला यांचे लग्न होणार असल्याच्या ट्विस्टचा एक प्रोमो शेअर करण्यात आला.
मालिकेतील या नवीन ट्विस्टनिमित्त शेअर करण्यात आलेल्या या प्रोमोने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले. अशातच आता या मालिकेचा आणखी एक व्हिडीओ शेअर करण्यात अल आहे आणि या व्हिडीओमधून एजे व लीला यांच्यातील प्रेम बहरतानाचे पाहायला मिळत आहे. मालिकेचा हा नवीन व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडीओमुळे मालिकेच्या कथानकात काही नवीन पाहायला मिळणार असल्याचे दिसत आहे. झी मराठीच्या सोशल मीडियाद्वारे शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये एजे व लीला यांच्यातील संवाद चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.
या व्हिडीओमध्ये लीला एजेला असं म्हणते की “आता मला असं वाटत आहे की आपण दोघे भांडता भांडता एकेमकांना ओळखायला लागलो आहो. ही ओळख वरवरची नाही, तर एकमेकांचे चांगले-वाईट गुण आणि एकमेकांचे स्वाभावही कळायला लागले आहेत. म्हणजे एजे तसं आपल्यात काहीही नातं नाही. आपल्यात मैत्रीही नाही. पण तरीसुद्धा एक आपलेपणा आहे.” हा व्हिडीओ प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडत असून या व्हिडीओला नेटकऱ्यांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे.
दरम्यान, हा व्हिडीओ प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडत असून या व्हिडीओला नेटकऱ्यांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. या व्हिडीओमधून एजे व लीला यांच्यातील नाते अधिकच बहरत चालले असल्याचे दिसून येत आहे आणि मालिकेतील हे कथानक चाहत्यांना खुपच आवडत आहे. त्यामुळे मालिकेच्या आगामी भागांत एजे व लीला यांच्यातील हे नाते आणखी बहरणार का? त्यांच्या नात्याला एक वेगळी नवीन सुरुवात आहे? हे आगामी भागांत पाहायला मिळेल.