शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“भारत देश…”, दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांना पोलिसांकडून दिल्या जाणाऱ्या वागणूकीवर मराठी अभिनेत्रीची नाराजी, म्हणाली, “नुसते जय म्हणून…”

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 14, 2024 | 9:52 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Marathi actress Ashwini Mahangde's displeasure over the treatment given to farmers by the police at the Delhi border

"भारत देश...", दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांना पोलिसांकडून दिल्या जाणाऱ्या वागणूकीवर मराठी अभिनेत्रीची नाराजी, म्हणाली, "नुसते जय म्हणून..."

भोवतालच्या सामाजिक, राजकीय परिस्थितीवर भाष्य करणे हे आजच्या परिस्थितीत फारच कठीण झालं आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही.  त्यात पण या तुम्ही एखादे प्रसिद्ध वा लोकप्रिय असाल तर ते आणखीनच कठीण. तसेच सध्याच्या या सोशल मीडियाच्या काळात ट्रोलिंग व नकारात्मक कमेंट्समूळे अनेक कलाकार त्यांची भूमिका ठामपणे घेण्यास कचरतात. पण मराठीत काही मोजके कलाकार आहेत, जे भोवताली घडणाऱ्या सामाजिक किंवा राजकिय परिस्थितीवर त्यांची मतं किंवा भाष्य व्यक्त करत असतात. त्यापैकीच एक कलाकार म्हणजे अभिनेत्री अश्विनी महांगडे.

सध्या दिल्लीच्या सीमांवर शेतकरी पुन्हा एकदा मोठ्या संख्येने जमले आहेत. किमान आधारभूत किमतीसाठी कायदा करण्याच्या प्रमुख मागणीसाठी पंजाब आणि हरियाणातील हजारो शेतकरी दिल्लीच्या सीमांवर एकत्र आले आहेत. या शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांकडून ड्रोनमधून अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. समाज माध्यमांसह अनेक स्तरातून यावर निषेध व्यक्त केला जात आहे. त्यामुळे अश्विनीनेही यावर सोशल मीडियाद्वारे संताप व्यक्त केला आहे.

आणखी वाचा – कॅन्सरवर मात केल्यानंतर चित्रपटात काम करण्याची संधी मिळण्याबाबत शरद पोंक्षे यांचं भाष्य, म्हणाले, “माझे केस, चेहरा…”

दिल्लीमध्ये पोलिसांकडून शेतकऱ्यांची अडवणूक केली जात असल्याचा व्हिडीओ अश्विनीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे शेअर केला असून याखाली तिने “निषेध.. भारत कृषीप्रधान देश आहे बरं का…” असं लिहिलं आहे. तसेच यापुढे तिने आणखी एक स्टोरी पोस्ट करत असं म्हटलं आहे की, “जय जवान व जय किसान हे शाळेत शिकवतात… आता समजते नुसते जय म्हणून जय होत नाही”.

आणखी वाचा – श्वानाला बेदम मारहाण करतानाचा व्हिडीओ पाहून रितेश देशमुख भडकला, प्रतिक्रिया देत म्हणाला, “तुरुंगात…”

दरम्यान, ‘आई कुठे काय करते’ फेम अश्विनी महांगडे सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती अनेक सामाजिक, राजकीय विषयांवर आपली मतं मांडत असते. याआधीही तिने अनकेदा सोशल मीडियाद्वारे तिची मतं व्यक्त केली आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांना दिलेल्या वागणुकीचा अश्विनीने निषेध केला आहे.

Tags: Ashwini MahangdeDelhi Border Farmers StrikeDelhi Policeentertainment newsFarmers StrikeFarmers Strike Newsmarathi actressmarathi entertainment newsMarathi newsअश्विनी महांगडेदिल्ली पोलिसदिल्ली सीमा शेतकरी संपमनोरंजन बातमीमराठी अभिनेत्रीमराठी बातमीमराठी मनोरंजन बातमीशेतकरी संप
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Amruta Deshmukh Traditional Look

माहेरची साडी, हटके नथ अन् केसात गजरा; असं पार पडलं अमृता देशमुखचं पहिलं हळदीकुंकू, मंगळसूत्राचीही होतेय चर्चा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.