शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

कॅन्सरवर मात केल्यानंतर चित्रपटात काम करण्याची संधी मिळण्याबाबत शरद पोंक्षे यांचं भाष्य, म्हणाले, “माझे केस, चेहरा…”

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 13, 2024 | 8:00 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Sharad Ponkshe revealed that Mahesh Manjrekar and Kedar Shinde gave him an opportunity to act in a film after undergoing treatment for cancer.

कॅन्सरवर मात केल्यानंतर चित्रपटात काम करण्याची संधी मिळण्याबाबत शरद पोंक्षे यांचं भाष्य, म्हणाले, “माझे केस, चेहरा...”

शरद पोंक्षे यांनी २०१९ मध्ये कर्करोगावर मात करत ‘हिमालयाची सावली’ या नाटकातून रंगमंचावर पुन्हा एकदा एन्ट्री घेतली. दरम्यान, या काळात त्यांना मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर व केदार शिंदे यांनी कॅन्सरनंतर त्यांना चित्रपटात घेऊन काम करणार असल्याचे वचन दिले होते आणि महेश मांजरेकर व केदार शिंदे यांनी हा शब्द पाळलादेखील. स्वत शरद पोंक्षे यांनी याबद्दलचा खुलासा केला आहे.

महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘ही अनोखी गाठ’ या चित्रपटाचा ट्रेलर लॉंच सोहळा पार पडला. या चित्रपटाच्या निमित्ताने महेश मांजरेकर व अभिनेता श्रेयस तळपदे यांनी पहिल्यांदाच एकत्र काम केलं आहे. या सोहळ्याला शरद पोंक्षे, महेश मांजरेकर, श्रेयस तळपदे यांसह अभिनेत्री सुहास जोशी व गौरी इंगावले यांनी हजेरी लावली होती. या सोहळ्यात शरद पोंक्षे यांनी त्यांच्या कॅन्सरच्या काळात महेश मांजरेकर व केदार शिंदे यांनी दिलेला शब्द पाळल्याचे सांगितले.

आणखी वाचा – फुलांची नेमप्लेट, पारंपरिक अंदाज अन्…; मंगेश देसाईंनी घेतलं नवं घर, पत्नी, मुलासह केला नव्या घरात गृहप्रवेश

यावेळी शरद पोंक्षे असं म्हणाले की, “आजारी असताना मला महेश मांजरेकरांचा फोन आला होता. तेव्हा त्याने मला लवकर बरा हो. तू बरा झाल्यानंतर आपल्याला एकत्र चित्रपट करायचा आहे असं म्हटलं होतं. तेव्हा त्याने मला ‘ही अनोखी गाठ’ या चित्रपटातील माझ्या भूमिकेविषयीही सांगितलं होतं. आजारपणानंतर माझी शरीरयष्टी, माझे केस व चेहरा हे या चित्रपटातील त्या पात्राला अगदी साजेसं होतं. त्यामुळे या चित्रपटाद्वारे महेशने मला दिलेला शब्द पाळला.”

आणखी वाचा – कॅन्सरवर उपचार घेताना महेश मांजरेकरांनी केले होते ‘बिग बॉस’चे चित्रीकरण, हृदयस्पर्शी प्रसंग शेअर करत म्हणाले, “पायाला व पोटाला…”

तसेच यापुढे शरद पोंक्षे यांनी केदार शिंदेचे कौतुक करतही असं म्हटलं की, “केदारनेही मला माझ्या आजारपणानंतर आपल्याला लवकरच एकत्र चित्रपट करायचा आहे असं म्हटलं होतं. त्यामुळे आजारपणानंतर लगेच केदारने मला ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट दिला आणि त्यानेही मला दिलेला शब्द पाळला.” दरम्यान, शरद पोंक्षे हे लवकरच महेश मांजरेकर यांच्या ही अनोखी गाठ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे अनेकजण त्यांच्या या भूमिकेसाठी व चित्रपटासाठी आतुर आहेत.           

Tags: marathi actormarathi entertainmentmarathi entertainment newsMarathi newssharad ponksheमराठी अभिनेतेमराठी बातमीमराठी मनोरंजनशरद पोंक्षे
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Ghabadkund Movie
Entertainment

घुंगरांचा आवाज, रहस्य थरार अन्…; सोन्याच्या मोहात विहिरीत उतरले संदीप पाठक, ‘घबाडकुंड’ मिळणार का?

एप्रिल 17, 2026 | 11:15 am
Next Post
Marathi actress Ashwini Mahangde's displeasure over the treatment given to farmers by the police at the Delhi border

"भारत देश...", दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांना पोलिसांकडून दिल्या जाणाऱ्या वागणूकीवर मराठी अभिनेत्रीची नाराजी, म्हणाली, "नुसते जय म्हणून..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.