सिनेसृष्टीतील बऱ्याच कलाकार जोड्या या लग्नबंधनात अडकल्या. एकामागोमाग एक कलाकार मंडळी लग्नबंधनात अडकत आहेत. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री अमृता देशमुख व अभिनेता प्रसाद जवादे ही कलाकार जोडी विवाहबंधनात अडकली. अगदी शाही थाटामाटात या जोडीचा विवाहसोहळा संपन्न झाला. अमृता-प्रसाद ही जोडी ‘बिग बॉस’ मराठीमुळे चर्चेत आली. ‘बिग बॉस मराठी मध्ये सहभाग घेतला असता सुरुवातीला त्याच्यात मैत्री झाली. त्यानंतर ही जोडी प्रेमात पडली. (Amruta Deshmukh Traditional Look)
थेट साखरपुड्याची फोटो शेअर करत दोघांनी सोशल मीडियावरुन त्यांच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली. अमृता व प्रसाद ही सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडी आहे. सध्या दोघेही त्यांचे लग्नानंतरचे दिवस एन्जॉय करत असल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच लग्नानंतर दोघांनीही त्यांच्या कामालाही सुरुवात केली आहे. लग्नानंतरचे सणही अमृता-प्रसाद साजरे करताना दिसले. काही दिवसांपूर्वीच मकरसंक्रांतनिमित्त अमृता-प्रसादचा खास लूक पाहणं रंजक ठरलं.
त्यानंतर आता अमृताने सोशल मीडियावरुन शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांच्या नजरा वळविल्या आहेत. अमृताने तिच्या खास हळदीकुंकू समारंभातील खास फोटो शेअर केले आहेत. अमृताच्या या पारंपरिक अंदाजात फोटोंनी साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या फोटोसह, “मी थकुन बसले होते. हळदी कुंकू. ही ‘माहेरची साडी’ आहे. कारण अखिल भारतीय नाट्य परिषद, जळगाव यांनी मला ती खास ‘खान्देश कन्या’ म्हणून भेट दिली आहे” असं तिने म्हटलं आहे.
अमृताने शेअर केलेल्या हळदी कुंकूच्या फोटोंमध्ये अमृताचा खास लूक साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. पारंपरिक पैठणीसह अमृताने घातलेल्या हटके नथने साऱ्यांच्या नजरा वळविल्या आहेत. शिवाय अमृताच्या गळ्यातील हलव्याच्या दागिन्यांमधील मंगळसूत्राचं डिझाइन खास दिसत आहे. केसात गजरा माळत अमृताचा हा मराठमोळा लूक खास असल्याचं पाहायला मिळत आहे. अमृताच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत तिच्या लूकचं कौतुक केलेलं पाहायला मिळत आहे.