शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : वांद्रेमध्ये रस्त्याशेजारी वडापाव-भजीपाव खाताना अश्विनी भावेंना भलताच आनंद, व्हिडीओ शेअर करत म्हणाल्या, “पाटीलचा वडापाव…”

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 14, 2023 | 1:31 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
marathi actress ashvini bhave shared special video of eating roadside vadapav bhajipav in bandra

Video : वांद्रेमध्ये रस्त्याशेजारी वडापाव-भजीपाव खाताना अश्विनी भावेंना भलताच आनंद, व्हिडीओ शेअर करत म्हणाल्या, "पाटीलचा वडापाव..."

मराठी मनोरंजनसृष्टीत आपल्या मनमोहक सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनावर मोहिनी घालणाऱ्या एव्हरग्रीन अभिनेत्री म्हणजे अश्विनी भावे. अनेक मराठी नाटक, मालिका व चित्रपटांमधून काम करत त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. मराठीसह हिंदी चित्रपटांतही त्यांनी काम केले आहे. ‘शाब्बास सूनबाई’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘धडाकेबाज’, ‘वजीर’ ‘हळद रुसली कुंकू हसलं’, ‘ध्यानीमणी’ सारख्या अनेक मराठी व ‘जखमी दिल’, ‘मोहब्बत की आरजू’, ‘बंधन’ सारख्या अनेक गाजलेल्या हिंदी चित्रपटांत काम करत त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.  (Ashvini Bhave On Instagram)

अश्विनी या सध्या मनोरंजनसृष्टीपासून लांब असल्या तरी त्या सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. सोशल मीडियावर आपले अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत ते त्यांच्या चाहत्यांच्या संपर्कात राहतात. अशातच अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात तिने तिच्या काही जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. अश्विनी या काल (१३ डिसेंबर) बांद्राला भजीपाव खाण्यासाठी गेल्या होत्या. तेव्हा यानिमित्ताने त्यांनी त्यांची जुनी आठवण शेअर केली आहे. अश्विनी बांद्रामध्ये त्यांच्या वडापाव-भजीपाव खायला गेली असताना त्यांना मोह आवरला नाही. त्यामुळे ही खास आठवण त्यांनी कॅमेऱ्यात कैद केली.

आणखी वाचा – पूजा हेगडेला जीवे मारण्याची धमकी, प्रकरण नेमकं काय?, अभिनेत्रीची टीम स्पष्टीकरण देत म्हणाली, “धमकी मिळाली असल्याचं…”

ही खास आठवण त्यांनी व्हिडीओद्वारे त्यांच्या चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, “कधीकधी आपल्या जुन्या ठिकाणी भेट द्यायला खूप मज्जा येते. तशीच मी आता ‘पाटील वडापांव-भजीपाव’ इथे आली आहे. वांद्रेमध्ये माझ्या आवडीच्या खाण्याच्या खूप जागा आहेत. वांद्रेमधील कुल्फीवाला, शेवपुरीवाला आणि हा ‘पाटीलचा वडापाव’ या माझ्या आवडीच्या जागा आहेत. माझे मन झाले की मी याठिकाणी येऊन या पदार्थांचा आस्वाद घेते. माझ्या मुलांनाही इथला वडापाव आवडतो. त्यांना तिखट लागलं तरी ते आनंदाने हा वडापाव खातात आणि तेच मीसुद्धा करत आहे.”  

आणखी वाचा – “त्यांना असं रडताना पाहून…”, रवींद्र बेर्डेंच्या निधनानंतर हेमांगी कवी भावुक, म्हणाली, “जो नट इतकी वर्षे…”

यापुढे त्यांनी “वांद्रेमधील तुमच्या आवडीची खाण्याची ठिकाणे कोणती आहेत? ते मला सांगा. मला त्याठिकाणी भेटी देऊन त्या पदार्थांचा आस्वाद घ्यायला नक्की आवडेल” असंही चाहत्यांना म्हटलं आहे. तसेच या व्हिडीओत त्या भजीपावचा मनमुराद आनंद घेताना दिसत आहेत. दरम्यान, अश्विनी भावे या सध्या मनोरंजनसृष्टीत कार्यरत नाहीत पण त्या सोशल मीडियाद्वारे चाहत्यांच्या नेहमीच संपर्कात राहतात. नुकतेच त्यांनी स्टायलिश लूकमधील काही फोटो शेअर केले असून या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे भरघोस प्रतिसाद दिला आहे. तसेच त्यांच्या या व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू आहे.           

Tags: ashvini bhaveentertainment newsmarathi actressmarathi entertainmentMarathi news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Akshaya Naik Answers To Trollers

"अंगप्रदर्शन करणं ही…", अक्षया नाईकचा बोल्ड लूक पाहून नेटकऱ्याची कमेंट, अभिनेत्रीने दिलं सडेतोड उत्तर, म्हणाली, "कलेची गरज असल्यास…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.