गुरूवार, जुलै 23, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“अंगप्रदर्शन करणं ही…”, अक्षया नाईकचा बोल्ड लूक पाहून नेटकऱ्याची कमेंट, अभिनेत्रीने दिलं सडेतोड उत्तर, म्हणाली, “कलेची गरज असल्यास…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 14, 2023 | 1:59 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Akshaya Naik Answers To Trollers

"अंगप्रदर्शन करणं ही…", अक्षया नाईकचा बोल्ड लूक पाहून नेटकऱ्याची कमेंट, अभिनेत्रीने दिलं सडेतोड उत्तर, म्हणाली, "कलेची गरज असल्यास…"

मराठी मालिकेतील लोकप्रिय चेहरा म्हणजे अभिनेत्री अक्षया नाईक. ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या लोकप्रिय मालिकेतून अक्षयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. या मालिकेत अक्षयाने लतिका हे पात्र साकारले होते. हळवी तितकीच खंबीर अशी लतिका प्रेक्षकांना फार आवडली. मालिकेतील अक्षयाची भूमिका ही प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली. मात्र या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेताच अक्षयाने रंगभूमीवर एन्ट्री केली आहे. ‘चूकभूल द्यावी घ्यावी’ या नाटकात ती मुख्य भूमिकेत आहे. (Akshaya Naik Answers To Trollers)

पहिल्याच मालिकेत आव्हानात्मक भूमिका असल्यानं तिनं आपली अभिनय क्षमता दाखवून दिली. त्यामुळे अक्षया सशक्त अभिनेत्री असल्याचं स्पष्ट झालं. अभिनेत्री म्हणून काम करत असताना अक्षयाला बरेचदा ट्रोलिंगचा सामना हा करावा लागला. बरेचदा अभिनेत्रीला बॉडी शेमिंगवरुनही ट्रोल करण्यात आलं. दरम्यान अक्षया अनेकदा तिला न पटणाऱ्या गोष्टींवर बेधडकपणे भाष्य करताना दिसली. तसेच बॉडी शेमिंग करणाऱ्यांना सणसणीत उत्तरही दिलेलं आहे.

आणखी वाचा – Video : वांद्रेमध्ये रस्त्याशेजारी वडापाव-भजीपाव खाताना अश्विनी भावेंना भलताच आनंद, व्हिडीओ शेअर करत म्हणाल्या, “पाटीलचा वडापाव…”

अक्षया सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असते. अशातच अभिनेत्रीने शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अभिनेत्रीने या पोस्टमध्ये बोल्ड फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने कॅप्शन देत, “हा फोटो मी माझ्या फोनच्या गॅलरीमधून इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करत आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये केलेल्या फोटोशूटमधील हा फोटो आहे. मी हा फोटो सोशल मीडियावर अपलोड करण्यासाठी खूप जागरुक होते. माझे प्रेक्षक मला या बोल्ड लूकमध्ये स्वीकारतील की नाही याची मला खात्री नाही. कधीही न होण्यापेक्षा उशीरा का होईना मला जाणवले की मी एक कलाकार आहे. आणि जर मी माझ्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडले नाही तर माझी वाढही खुंटेल” असंही म्हटलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Akshaya Naik (@akshayanaik12)

आणखी वाचा – Video : बहिणीच्या हळदीमध्ये शिवाली परबचा भन्नाट डान्स, पण बेभान होऊन नाचलेल्या अभिनेत्रीच्या वडिलांनी वेधलं लक्ष, व्हिडीओ तुफान व्हायरल

तिच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी तिच्या या धाडसीपणाचं कौतुक केलं आहे. तर एका युजरने अभिनेत्रीने शेअर केलेला बोल्ड फोटो पाहून “तुला अशी पाहण्याची इच्छा नाही” अशी कमेंट केली आहे, यावर उत्तर देत अक्षयाने, ‘ओके’ असं म्हटलं आहे.

Tags: akshaya naikakshaya naik answers to trollersakshaya naik bold photoakshaya naik troll
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Ayesha Khan Police Custody
Entertainment

“मी एक शब्दही बोलले नाही”, आंदोलन प्रकरणात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात, म्हणाली, “घोषणाबाजी…”

जुलै 23, 2026 | 11:13 am
Salman Khan Student Protest
Entertainment

विद्यार्थ्यांच्या निषेधाच्या समर्थनार्थ सलमान खाननेही उठवला आवाज, म्हणाला, “राजकीय रंग…”

जुलै 23, 2026 | 10:36 am
Shabana Azmi asthma attack
Entertainment

CJP च्या निषेधादरम्यान 75 वर्षीय अभिनेत्रीला दम्याचा झटका, अश्रुधुराच्या धुरामुळे तब्येत बिघडली आणि…

जुलै 22, 2026 | 11:42 am
Next Post
ankita lokhande likely evicted from bigg boss 17 house

Bigg Boss 17 : 'बिग बॉस'च्या घरामधून अंकिता लोखंडे बाहेर पडणार?, एक चुकी अन् अभिनेत्रीची एक्झिट, प्रेक्षकही चक्रावले

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.