शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“माईकवरून भसाड्या आवाजात…”, घराशेजारी कित्येक दिवस जत्रा भरल्याने सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला त्रास, म्हणाली, “का सहन करायचं?”

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 6, 2024 | 4:49 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
marathi actress and writer mugdha godbole ranade shared fecebook post on noise pollution and cultural events

“माईकवरून भसाड्या आवाजात…”, घराशेजारी कित्येक दिवस जत्रा भरल्याने सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला त्रास, म्हणाली, “का सहन करायचं?”

‘आभाळमाया’, ‘ठिपक्यांची रांगोळी’, ‘हम बने तुम बने’, ‘अजूनही बरसात आहे’ तसेच ‘आई कुठे काय करते?’ अशा अनेक लोकप्रिय मालिकांच्या लेखिका म्हणून मुग्धा गोडबोले या चांगल्याच लोकप्रिय आहेत. मुग्धा या लेखिका असण्याबरोबरच एक उत्तम अभिनेत्रीदेखील आहेत. मुग्धा या त्यांच्या अभिनय व लेखनामुळे जितक्या लोकप्रिय आहेत. तितक्याच त्या स्पष्टव्यक्त्याही आहेत. त्या सोशल मीडियावर चांगल्याच सक्रिय असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असतात. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या अनेक विषयांवर त्यांची मते  स्पष्टपणे व्यक्त करत असतात. (Mugdha Godbole Ranade On Facebook)

नुकतीच मुग्धा यांनी त्यांच्या फेसबुकद्वारे एक पोस्ट शेअर केली असून ही पोस्ट सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. मुग्धा यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटद्वारे त्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल पोस्ट लिहीत संताप व्यकात केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की, “गेले कित्येक दिवस म्हणजे जवळपास २० ते २५ दिवस आमच्या घराजवळच्या दोन मैदानांवर रोज संध्याकाळी ७ वाजल्यापासून मेळा, जत्रा, जाहीर कार्यक्रम सुरू आहेत. रात्री १० किंवा १०.३०ला संपतात. पण रोज संध्याकाळी ७ ते रात्री १० जे असतं तेही त्रासदायकच असतं. माईकवरून भसाड्या आवाजात गाणारे, मोठ्याने लावलेले स्पीकर्स, अगदी सुंदर मराठी गाणीसुद्धा रोज संध्याकाळी एवढ्या मोठ्या आवाजात का ऐकायची?. आजूबाजूला राहणाऱ्या लोकांनी महिना-महिना हे का सहन करायचं?”

आणखी वाचा – Video : घरच्या अंगणात भजन सुरु असताना बहिणीच्या मुलीला सांभाळताना दिसली जुई गडकरी, म्हणाली, “मावशी ड्युटी अन्…”

तसेच यापुढे त्यांनी असं म्हटलं आहे की, “आज कसलीतरी जत्रा, उद्या महोत्सव, परवा कुठलातरी प्रादेशिक बाजार यांचं संपतच नाही. याबद्दल काही बोलायची सोय नाही. कारण सांस्कृतिक कार्यक्रमांच्या अंतर्गत हे सगळं मोडतं. याच मैदानांवर असंख्य वेळा असंख्य कारणांनी फटाके उडवले जातात. ध्वनी प्रदुषण म्हणजे काय रे भाऊ अशी अवस्था आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत लोक बाहेर जातात तसं आता यंदा या लादलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या हंगामात इथून बाहेर कुठेतरी जावं का? याचा विचार करावा लागणार.”

आणखी वाचा – Video : भाचीनेच केली नम्रता संभेरावची हुबेहूब नक्कल, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील ‘लॉली’ पात्र साकारलं अन्…; व्हिडीओ व्हायरल  

दरम्यान, या पोस्टखाली नेटकऱ्यांनीदेखील अनेक कमेंट्स करत याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. तसेच मुग्धा यांना कमेंट्सद्वारे काही उपायदेखील सुचवले आहेत. “खर आहे अमच्याइथे पण हे प्रकार सर्रास होत असतात, कोणाला बोलायची सोय नाही, लेखी तक्रारी करा, डेसिबल मीटर रिडींग मागा, तक्रारी करा, योग्य मुद्द्याला वाचा फोडली ताई, हे जवळपास सगळीकडेच चालते” अशा अनेक कमेंट्सद्वारे त्यांनी मुग्धा यांच्या या पोस्टला पाठिंबा दर्शविला आहे.

Tags: marathi actressmarathi entertainmentmarathi entertainment newsMarathi newsmarathi writermugdha godbole ranadeमराठी अभिनेत्रीमराठी बातमीमराठी मनोरंजनमराठी लेखिकामुग्धा गोडबोले रानडे
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
100th akhil bhartiya natya sammelan inaugurated by chief minister eknath shinde

१००व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनासाठी मराठी कलाकारांची तुफान गर्दी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदें व शरद पवार यांची विशेष उपस्थिती

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.