छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘ठरलं तर मग’ मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी. जुईने आपल्या अभिनयाने सोज्वळ अभिनयाने व निरागस सौंदर्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. तिने आपल्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं. ती ‘श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी’, ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’, ‘तुजविण सख्या रे’ अशा मालिकांमध्ये काम केले आहे. मात्र ‘पुढचं पाऊल’ या मालिकेतून ती प्रसिद्धी झोतात आली आणि ‘ठरलं तर मग’ या मालिकेत जुई मुख्य भूमिकेत दिसत आहे. (Jui Gadkari On Instagram)
अभिनेत्री सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. तिच्या फोटो व व्हिडीओला चाहत्यांकडूनदेखील चांगलाच प्रतिसाद मिळत असतो. अशातच अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक छान फोटो शेअर केला आहे. ज्यात ती एका लहान मुलीला खेळवत आहे आणि ही मुलगी तिची भाची आहे. अभिनेत्रीने या व्हिडीओखाली एक छान कॅप्शनदेखील लिहिलं आहे. जुईने शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
जुईने हा खास व्हिडीओ शेअर करत असे म्हटले आहे की, “दत्तजयंतीला घरी भजन सुरु असताना आमच्या प्रचितीला (जुईची भाची) असं फिरायचं होतं! गंम्मत म्हणजे भजन सुरु असताना ती एकदाही रडली नाही. ती भजनामध्ये छान रमली होती. तेवढाच आमच्या सखीला मोकळा वेळ मिळाला आणि तिच्याबरोबर माझा वेळ पण खुप छान गेला.” याचबरोबर जुईने मावशीचे काम असेही म्हटले आहे.
दरम्यान, जुईने शेअर केलेल्या या व्हिडीओला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे प्रतिसाद दिला आहे. नेटकऱ्यांनी “तुझी भाची खूपच गोड आणि क्युट आहे, दोघी एकदम सारख्याच दिसताय, खूपच छान, दोघींना खूप प्रेम” अशा अनेक कमेंट्स करत या व्हिडीओला पसंती दर्शवली आहे.