बुधवार, जून 4, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss 17 : अंकिता लोखंडे घराबाहेर पडताच अमृता खानविलकरला झालं दु:ख, मैत्रिणीसाठी खास पोस्ट शेअर करत म्हणाली…

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 29, 2024 | 10:49 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Marathi actress amruta khanvilkar first reaction on ankita lokhande eviction from bigg boss 17

अंकिता लोखंडे घराबाहेर पडताच अमृता खानविलकरला झालं दु:ख, मैत्रिणीसाठी खास पोस्ट शेअर करत म्हणाली...

Bigg Boss 17 Updates : ‘बिग बॉस १७’चा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला. डोंगरीचा मुनव्वर फारुकी हा यंदाच्या पर्वाचा विजेता ठरला. घरात आल्यापासूनच त्याच्या वैयक्तिक आयुष्यात व शोमध्येदेखील अनेक चढ उतार आल्याचे पाहायला मिळाले. पण आपल्या चाहत्यांच्या व शुभचिंतकांच्या पाठिंब्यामुळे मुनव्वरने ‘बिग बॉस’च्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले असं म्हणायला हरकत नाही.

‘बिग बॉस १७’चा विजेता मुनव्वरच होणार याचा त्याच्या चाहत्यांना विश्वास होता आणि अखेर चाहत्यांचा हा विश्वास खरा ठरला आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचं व उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. तसेच सोशल मीडियाद्वारे मुनव्वरवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

अशातच या कमी मतांमुळे घरातून बाहेर पडलेल्या स्पर्धकांवर त्यांच्या चाहत्यांकडून सांत्वनपर पोस्ट केली जात आहे. अभिनेत्री अंकिता लोखंडेचा चाहतावर्गदेखील खूप मोठा आहे. अनेक बॉलिवूड अभिनेत्रींसह मराठमोळ्या अभिनेत्रींनीदेखील अंकिताला पाठिंबा दिला असल्याचे पाहायला मिळाले. मात्र ‘बिग बॉस’च्या अंतिम टप्प्यावर अंकिताचा प्रवास संपल्यामुळे अनेकांच्या पदरी निराशा पडली आहे.

आणखी वाचा – पाचवीपर्यंतचे शिक्षण अन् आर्थिक अडचणी…; ‘डोंगरीचा मुन्ना’ ते ‘बिग बॉस १७चा’ विजेता, जाणून घ्या मुनव्वर फारुकीच्या एकूण प्रवासाबद्दल…

अशातच अभिनेत्री अमृता खानविलकरदेखील अंकिताच्या बाहेर जाण्याने निराश झाली असल्याचे पाहायला मिळाले. अभिनेत्री अमृता खानविलकरने अंकिता लोखंडे ‘बिग बॉस १७’च्या स्पर्धेतून बाहेर येताच इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली. या स्टोरीमध्ये अंकिता लोखंडे बाहेर झाल्याचं वृत्त असून त्यावर अमृताने “हृदय तुटलं” असं लिहिलं आहे.]

आणखी वाचा – Bigg Boss 17 Grand Finale  : मुनव्वर फारुकी ठरला ‘बिग बॉस १७’चा विजेता, वाढदिवशी तमाम भारतीयांकडून मिळालं मोठं बक्षीस, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

दरम्यान, अमृताने अनेकदा अंकितासाठी पाठिंबा दर्शवला असल्याचे पाहायला मिळाले. त्याचबरोबर नुकत्याच पार पडलेल्या एका भागातही अमृता ‘बिग बॉस’च्या घरात अंकिताला पाठिंबा द्यायला गेली होती. पण अंकिताच्या एक्झिटवर अमृता खूपच निराश झाली असल्याचे पाहायला मिळत आहे.  

Tags: Amrita Khanwilkarankita lokhandeAnkita Lokhande evictedBig Boss 17 NewsBigg Boss 17 Ankita Lokhandebollywood actressBollywood entertainment newsbollywood newsentertainment newsmarathi actressअंकिता लोखंडेअमृता खानविलकरबिग बॉस १७ अंकिता लोखंडेबिग बॉस १७ बातमीबॉलिवूड अभिनेत्रीबॉलिवूड बातमीमनोरंजन बातमीमराठी अभिनेत्री
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Chahat Khanna Personal life
Entertainment

आजारी असतानाही शरीरसंबंध ठेवायचा आणि…; नवऱ्याबाबत सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “पैशांसाठी…”

जून 4, 2025 | 6:00 pm
Nivedita saraf talk about ashok saraf
Entertainment

“इतरांप्रमाणे दुसऱ्यांचे डायलॉग न कापता…”, पत्नी निवेदितांकडून अशोक सराफांचं तोंडभरुन कौतुक, म्हणाल्या, “दुसऱ्याला बरोबर घेऊन…”

जून 4, 2025 | 5:48 pm
Dipika Kakar Health
Entertainment

दीपिका कक्करची कॅन्सरवर मात, १४ तास सुरु होती शस्त्रक्रिया, नवऱ्याने दिली अपडेट, म्हणाला, “आता आयसीयूमध्ये…”

जून 4, 2025 | 4:24 pm
Jaya bachchan angry on paparazzi
Entertainment

Video : “निघा इथून, सगळेच घाणेरडे”, फोटोग्राफर्सवर अचानकच भडकल्या जया बच्चन, गाडीमध्ये बसूनही ओरडत राहिल्या अन्…

जून 4, 2025 | 3:29 pm
Next Post
Reshu Jain On Bigg boss 17

Video : "हे चुकीचं केलं…", 'बिग बॉस १७'च्या निकालावर अंकिता लोखंडेच्या जाऊबाईंची प्रतिक्रिया, नाराजी व्यक्त करत म्हणाली…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.