‘बिग बॉस १७’ या पर्वाचा निकाल समोर आला असून यंदाच्या पर्वात मुनव्वर फारुकीने बाजी मारत विजेतेपद पटकावलं. मुनव्वर फारुकी, अंकिता लोखंडे, मन्नारा चोप्रा, अभिषेक फारुकी, अरुण माशेट्टी या स्पर्धकांमध्ये अटीतटीची लढाई पाहायला मिळाली. अखेर या लढाईत मुनव्वर फारुकीने प्रथम क्रमांक पटकावला. तर अभिषेक कुमार उपविजेता ठरला. या पाच स्पर्धकांपैकी पहिला नॉमिनेट झालेला स्पर्धक होता अरुण माशेट्टी. तर चौथ्या क्रमांकावर अंकिता लोखंडे व तिसऱ्या क्रमांकावर मन्नारा चोप्रा होती. (Reshu Jain On Bigg boss 17)
दरम्यान या ‘बिग बॉस’च्या फिनालेमधून अंकिता लोखंडे घराबाहेर पडताच साऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. अंकिता लोखंडे पहिल्या दोन क्रमांकामध्ये असेल अशी खात्री बऱ्याच जणांना होती. मात्र चौथ्या क्रमणकावर अंकिताचं नाव आल्याने साऱ्यांना आश्चर्य वाटलं. अंकिताला सपोर्ट करण्यासाठी तिचा पती विकी जैन, अंकिताची आई व अंकिताच्या सासूबाई व जाऊबाईदेखील आल्या होत्या. अंकिता एलिमिनेट झाली हे ऐकल्यावर तिच्या कुटुंबियांना धक्का बसला.
दरम्यान, अंकिताचा प्रवास संपला हे ऐकताच प्रेक्षकांमध्ये उपस्थित असलेल्या अभिनेत्रीच्या जाऊबाई रेशू जैन यांना अश्रू अनावर झाले. इतकंच नव्हे तर स्वत: अंकितानेही सलमानसमोर एवढ्या जवळ येऊन फिनाले रेसमधून बाहेर पडल्याचं खूप दु:ख होतंय हे मान्य केलं. दरम्यान, अंकिताचे अनेक चाहते नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत.
‘विरल भयानी’ ने रेशू जैनचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या हा व्हिडीओ सर्वत्र चर्चेत आला असल्याचं पाहायला मिळत आहे. ज्यामध्ये रेशूला ‘बिग बॉस १७’च्या निकालाबद्दल विचारलं गेलं असता ती म्हणाली, ” मला अजूनही वाटतं, अंकिता पहिली किंवा दुसरी पाहिजे होती. पण हे खूप चुकीच आहे. अंकिता पहिली किंवा दुसरी येईल, असंच मला वाटतं होतं” असं ती म्हणाली. याआधी ही ‘बिग बॉस’च्या घरात अंकिताला समर्थन करण्यासाठी रेशु जैन आली होती. तेव्हा तिने अभिनेत्रीला स्वतःची प्रतिमा सुधारण्यासाठी काही गोष्टी सांगितल्या.