शुक्रवार, सप्टेंबर 4, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

दारुची नशा, दोन वेळा हृदयविकाराचा झटका अन्…; सुप्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपची झाली होती वाईट अवस्था, म्हणाला, “मी पूर्णपणे…”

Majja Webdeskby Majja Webdesk
नोव्हेंबर 22, 2023 | 1:17 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
Anurag kashyap shocking revelation

Anurag kashyap shocking revelation

बॉलिवूडमधील सर्वात प्रतिभावंत दिग्दर्शकांच्या यादीत आवर्जुन ज्याचं नाव घेतलं जातं तो म्हणजे अनुराग कश्यप. त्याने आपल्या चित्रपटांच्या कारकिर्दीत वेगळ्या व हटके आवाजांना बराच पाठिंबा दिला. त्याचे बरेच चित्रपट हीट ठरले पण या प्रसिद्ध दिग्दर्शकाला कठीण काळाचाही सामना करावा लागला होता. नुकताच त्याने त्याच्या त्या कठीण काळाबाबात खुलासा केला. त्याचा ‘मॅक्सिमम सिटी’ या प्रोजेक्ट बंद झाल्यानंतर त्याच्या प्रकृतीत बिघाड झाला होता. त्यानंतर त्याला नैराश्येचाही सामना करावा लागला. याबाबत त्याने एका मुलाखतीत खुलासा केला आहे.  (Anurag kashyap shocking revelation)

नुकत्याच अनुरागने दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या त्या कठीण काळाबद्दल सांगितलं. ज्यावेळी तो ‘सुकेतू मेहता’ यांच्या ‘मॅक्सिमम सिटी’ या लोकप्रिय कादंबरीच्या सीरीजवर काम करत होते. अनुराग म्हणाला, “ते माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम काम होतं. मी आजपर्यंत इतकं प्रामाणिक काम कधीच केलं नव्हतं. पण ‘नेटफ्लिक्स’ने या प्रकल्पातून माघार घेतल्यामुळे हा प्रकल्प बंद करावा लागला”. अनुराग पुढे म्हणाला, “हा प्रकल्प अचानक बंद झाल्यामुळे माझ्यावर खूपच वाईट परिणाम झाला. त्यावेळी मी पूर्णपणे नैराश्येत गेलो होतो. अस्वस्थ असल्यामुळे मला दारूचं व्यसनही लागलं होतं. या काळात मला दोनवेळा हृदयविकाराचा झटकादेखील आला होता. मला तेव्हा असं वाटत होतं की मी सगळं काही गमावलं”.

View this post on Instagram

A post shared by Anurag Kashyap (@anuragkashyap10)

आणखी वाचा – Video : सेल्फी काढायला आलेल्या चाहत्याबरोबर अक्षय कुमारच्या बॉडीगार्डने केलं वाईट वर्तन, त्यानंतर अभिनेत्याने केलं असं काही की…

‘इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या एका मुलाखतीत अनुरागने सांगितलं होतं की, लॉकडाऊनमुळे त्याची वेब सीरिज ‘अल्मोस्ट प्यार विथ डीजे मोहब्बत’चं शुटिंग लांबलं होतं. त्यामुळे तो खूप अस्वस्थ होता. त्या काळातही तो बराच नकारात्मक विचारांनी घेरला गेला होता.

View this post on Instagram

A post shared by Anurag Kashyap (@anuragkashyap10)

आणखी वाचा – रजनीकांत यांच्या नातवाला सुपरबाईक चालवणं पडलं महाग, नियमांचं उल्लंघन केल्याने चेन्नई पोलिसांनी ठोठावला दंड

‘मॅक्सिमम सिटी’ ही लेखक सुकेतू मेहता यांची प्रसिद्ध कादंबरी आहे. या कादंबरीवर आधारित अनुराग एक बेव सिरीज बनवत होते. अशा परिस्थितीत ‘तांडव’ या वेबसिरीजवर आलेल्या प्रतिक्रियांनंतर नेटफ्लिक्सने त्याच्या ‘मॅक्सिमम सिटी’ वेब सीरिजमधून माघार घेतली. मात्र त्यांनी त्याबाबतचं कोणतंही कारण स्पष्ट केलं नाही. तो काळ अनुरागसाठी खूप कठीण गेला.

Tags: anurag kashyapBollywood directorshocking revelation
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
Next Post
bigg boss 17 actress ankita lokhande throw chappal on husband vicky jain video viral on social media

Video : नवऱ्याने मान पकडताच अंकिता लोखंडेने विकी जैनला फेकून मारली चप्पल, व्हिडीओ तुफान व्हायरल, घरातील सदस्य म्हणाले…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.