शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“ते खूप घाण दिसतात”, नवऱ्याच्या लूकवरुन सुनावणाऱ्यावर ऐश्वर्या नारकर भडकल्या, म्हणाल्या, “चांगलं व वाईट दिसणं…”

Majja Webdeskby Majja Webdesk
मे 1, 2024 | 7:34 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
aishwarya narakar on comments

“ते खूप घाण दिसतात”, नवऱ्याच्या लूकवरुन सुनावणाऱ्यावर ऐश्वर्या नारकर भडकल्या, म्हणाल्या, “चांगलं व वाईट दिसणं...”

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय जोडी अविनाश नारकर व ऐश्वर्या नारकर हे दोघेही सतत चर्चेत असतात. अविनाश व ऐश्वर्या दोघेही सोशल मिडियावरही अधिक सक्रिय असतात. ते नेहमी व्यायाम करताना, फिरताना, मजा-मस्ती करतानाचे सर्व फोटो व व्हिडीओ त्यांच्याअ चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. नुकताच दोघांनीही एक भन्नाट डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दोघेही अप्रतिम डान्स करताना दिसत आहेत. त्यांच्या या व्हिडीओला प्रेक्षकांनी खूप पसंती दिली असून अनेक प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.  (aishwarya narakar on comments)

मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकार अभिनयाबरोबरच आपला आवडता छंद जोपासताना दिसतात. त्यातील कलाकार म्हणजे ऐश्वर्या व अविनाश नारकर जोडी. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी आपल्या अभिनयाने सर्वांच्या मनावर राज्य केले आहे. आता दोघेही वेगवेगळ्या मालिकांमध्ये काम करताना दिसतात. पण मालिकांच्या व्यस्त शेड्यूलमधून वेळ काढून दोघेही रील्सदेखील बनवतात. अशातच त्यांनी नुकतेच एका गाण्यावर डान्स करतानाचे रील चांगलेच चर्चेत आले आहे. त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर ऐश्वर्या यांनी चांगलेच खडे बोल सुनावले आहेत.

आणखी वाचा – सलमान खानच्या  घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची तुरुंगात आत्महत्या, नेमकं घडलं तरी काय?

अविशान व ऐश्वर्या हे एका गाण्यावर दिलखुलासपणे डान्स करताना दिसत आहेत. अशातच एका नेटकऱ्याने अविनाश यांच्याबद्दल एक प्रतिक्रिया दिली. त्याने आपल्या प्रतिक्रियेमध्ये म्हंटले आहे की, “हे इतके घाणेरडे का दिसत आहेत?”, या प्रतिक्रियेला ऐश्वर्यायांनी लगेच उत्तर देत म्हंटले आहे की, “चांगलं व वाईट हे बघणाऱ्यांच्या नजरेत असतं. हे खरं नसतं. त्यामुळे तुम्ही यामध्ये पडू नका. आयुष्य एंजॉय करा. ते महत्त्वाचं आहे. खुश रहा. अनेकदा आपण जे देतो तेच आपल्याला युनिव्हर्स परत देखील देतो”.

आणखी वाचा – “अविनाशच चांगला डान्स करतात आणि…”, ऐश्वर्या नारकरांनी या वयातही रिल बनवण्यामागचं सांगितलं कारण, म्हणाल्या, “नवरा-बायकोचं नातं…”

त्यावर पुन्हा नेटकऱ्याने लिहिले की, “आयुष्य एंजॉय करायला हवं हे नक्की. पण काही वेळा रील्समधून विचित्र वाईब बघायला मिळतात. तुमचा कलाकार म्हणून मी खूप आदर करते”. त्यावर ऐश्वर्या यांनी पुन्हा उत्तर दिले की, “यावर साधा उपाय म्हणजे अनफॉलो करणे”.

दरम्यान अनेकदा शांत राहणाऱ्या ऐश्वर्या यांनी नेटकऱ्याला सडेतोड उत्तर देऊन बोलती बंद केल्याचे दिसून आले आहे. ऐश्वर्या यांच्या कामबद्दल बोलायचे झाले तर सध्या त्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत काम करताना दिसत आहेत.  

Tags: aishwarya narkaravinash narkarcommentsreel
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Paaru Serial Update

आदित्य खरंच पडला आहे का पारूच्या प्रेमात?, दामिनीचा संशय ठरणार का खरा?, तर लोगोसाठी कोणाच्या डोळ्यांची होणार निवड?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.