सोमवार, ऑगस्ट 31, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सलमान खानच्या  घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची तुरुंगात आत्महत्या, नेमकं घडलं तरी काय?

Majja Webdeskby Majja Webdesk
मे 1, 2024 | 5:38 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
salman khan firing case accused suicide

सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची तुरुंगात आत्महत्या, नेमकं घडलं तरी काय?

काही दिसवानपूर्वी बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या घरावर काही आज्ञातांनी गोळीबार केला होता. त्यानंतर मुंबई पोलिस यंत्रणेने तपास सुरु करून दोन दिवसांतच गोळीबार करणाऱ्यांचा शोध घेतला. विकी गुप्ता व सागर पाल अशी अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारांची नाव होती. या हल्ल्याची संपूर्ण जबाबदारी बिश्नोई गँगने घेतली होती. त्यानंतर अजून तपास करण्यात आल्यानंतर दोन जणांना अटक करण्यात आली होती. एकूण चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. दोन्ही आरोपींना पिस्तूल पुरवल्याप्रकरणी पंजाब येथून सोनू चंदर व अनुज थापन अशा दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या. आता त्या आरोपीबद्दलची एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. (salman khan firing case accused suicide )

वांद्रे येथील सलमानच्या घरावर अज्ञातांनी गोळीबार केला होता. याप्रकरणी एकूण चार आरोपीना पकडण्यात आले होते. मात्र या चार आरोपीपैकी एका आरोपीने म्हणजे अनुज थापन याने पोलिस कोठडीमध्येच आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे. त्याच्याजवळ असलेल्या चादरीने गळफास लाऊन घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्येच त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आहे आहे.

आणखी वाचा – पोरीनं मन जिंकलं! पूजा सावंतच्या ऑस्ट्रेलियाच्या घरात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती, म्हणाली, “खूप इच्छा होती की…”

Salman Khan residence firing case | Accused Anuj Thapan who attempted suicide in custody has been declared dead by doctors at the hospital: Mumbai Police https://t.co/3OMrikn0nP

— ANI (@ANI) May 1, 2024

अनुज हा लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या संपर्कात होता. त्याच्यावर आतापर्यंत अनेक खंडणी व शस्त्रास्त्र कायद्याचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. अनुजचे ३२ वर्ष होते. त्याने सलमान खान गोळीबार प्रकरणात गोळीबार करणाऱ्यांना हत्यारे पुरवली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिस कोठडीमध्ये त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मुंबई पोलिस हेडक्वार्टर क्राइम ब्रांचमध्ये पोलिस कोठडीत त्याने टॉयलेटमध्ये चादर घेऊन गेला आणि त्याने गळफास लाऊन घेतला. त्यानंतर लगेचच सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि तेथेत्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

आणखी वाचा – मालिकांमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री रुपाली गांगुलीचा भाजपामध्ये प्रवेश, म्हणाली, “नरेंद्र मोदी यांना…”

दरम्यान वांद्रे येथे पकडण्यात आलेल्या आरोपींकडून माहिती काढत तपास पंजाबपर्यंत पोहोचला होता. तेथे थापन व चंदरला अटक करण्यात आले. तसेच या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे.  

Tags: accusedfiring casesalman khansuicide
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Rajat Bedi Marathi Movie
Entertainment

बॉलिवूडनंतर रजत बेदींची मराठी सिनेमात एन्ट्री; ‘बंधू’ चित्रपटातून नवी इनिंग

ऑगस्ट 31, 2026 | 4:24 pm
Jayanti 2 Trailer
Entertainment

‘जयंती २’मधून उलगडणार कॉलेजमधील भेदभावाची गोष्ट, ट्रेलर पाहून वाढली उत्सुकता, ११ सप्टेंबरपासून जवळच्या सिनेमागृहात

ऑगस्ट 31, 2026 | 12:49 pm
Nikki Arbaaz breakup news
Entertainment

निक्की-अरबाजमध्ये नेमकं काय बिनसलं?, एकमेकांना अनफॉलो केलं अन्…; पोस्टमुळे चर्चांना उधाण

ऑगस्ट 31, 2026 | 10:22 am
Heavy Weight Lifting
Entertainment

कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

ऑगस्ट 29, 2026 | 10:14 am
Next Post
nilesh sabale on chala hawa yeu dya actors

श्रेया, भारत, कुशल नव्या शोमध्ये का नाहीत?, निलेश साबळेनं स्पष्टच सांगितलं, म्हणाला, “चॅनलने आमच्याबरोबर…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.