रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मुलाचा मृत्यू अन् पत्नीसह घेतला घटस्फोट, १२ वर्षांनी लहान मुलीशी दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ कारण…; प्रकाश राज यांच्या खासगी आयुष्य होतं चर्चेत

Majja Webdeskby Majja Webdesk
मे 18, 2024 | 6:55 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
prakash raj life)

मुलाचा मृत्यू अन् पत्नीसह घेतला घटस्फोट, १२ वर्षांनी लहान मुलीशी दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ कारण...; प्रकाश राज यांच्या खासगी आयुष्य होतं चर्चेत

‘सिंघम’मधील जयकांत शिकरे असो किंवा ‘वॉन्टेड’मधील ‘गणी भाई’ या भूमिकांमुळे दाक्षिणात्य सुपरस्टार प्रकाश राज चांगलेच चर्चेत आले. प्रकाश यांनी १९९० साली अभिनय क्षेत्रामध्ये पाऊल ठेवले. त्यांनी आतापर्यंत कन्नड, तमिळ, तेलगू, हिंदी या भाषांमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांच्या अभिनयाने आतापर्यंत सगळ्यांच्याच मनात जागा निर्माण केली. त्यांची करियरमधील कारकीर्द रंगात येत होती मात्र त्यांच्या खासगी आयुष्यामध्ये वादळ निर्माण होत होतं. त्यांचे वैयक्तिक आयुष्यात खूप चढ-उतार आलेले पाहायला मिळाले. (prakash raj life)

त्यांनी १९९४ साली त्यांनी अभिनेत्री ललिता कुमारीबरोबर लग्न केले. त्यांना मेघना, पूजा व सिद्धू अशी तीन मुलं होती. काही वर्षानंतर त्यांनी ललितापासून घटस्फोट घेतला आणि २०१० साली नृत्यदिग्दर्शिका पोनी वर्माबरोबर लग्न केले. ललिता व प्रकाश यांच्या नात्यावर जयंती कनप्पनने सविस्तर भाष्य केले आहे.

आणखी वाचा – शाहरुख खान, करण जोहरमध्ये शारिरीक संबंध, दोघं एकत्रित लंडनला जायचे कारण…; गायिकेचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाली, “समलैंगिक…”

View this post on Instagram

A post shared by Prakash Raj (@joinprakashraj)

जयंती यांनी सांगितले की, “प्रकाश व ललिताची ओळख चेन्नईमध्ये झाली. त्यांनी प्रकाश यांना राहण्यासाठी घर शोधण्यामध्ये मदत केली होती. त्यामुळे त्यावेळी त्यांच्यामध्ये मैत्री वाढली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर दोघंही लग्नबंधनात अडकले. दोघांना दोन मुली व एक मुलगा झाला. पण त्यांच्या आयुष्यात असे काही झाले ज्यामुळे त्यांच्या आयुष्यात दु:खाचा डोंगर कोसळला.

आणखी वाचा – Video : नवऱ्याच्या पायाला मसाज करुन देताना दिसली अंकिता लोखंडे, नेटकऱ्यांना राग अनावर, म्हणाले, “हे दाखवण्याची गरज काय?”

प्रकाश यांचा मुलगा सिद्धू पतंग उडवताना छतावरुन पडला. ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. या घटनेचा प्रकाश यांच्या आयुष्यावर खूप खोलवर परिणाम झाला. या घटणेमुळे प्रकाश त्यांच्या पत्नीपासून दूर होऊ लागले. त्याचवेळी त्यांच्या आयुष्यात पोनी आली आणि प्रकाश यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडून आले. त्यानंतर त्यांनी पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेऊन पोनीबरोबर दुसरे लग्न केले.

 प्रकाश यांनी त्यांच्या अभिनयाने  अभिनय क्षेत्रामध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.  यांची एकूण संपत्ती ५० कोटी रुपये आहे. ते एका चित्रपटासाठी २.५० कोटी रुपये फी घेतात. त्यांचे स्वतःचे प्रोडक्शन हाऊस आहे. त्यांचे मुंबई व चेन्नई येथे घरं असून फार्महाऊसदेखील आहे.  

Tags: bollywood actorprakash rajsingham actor
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Mahesh Bhatt once revealed that Sanjay Dutt used to drink alcohol and take drugs when he woke up in the morning

सकाळी उठताच दारुने गुळण्या, सतत ड्रग्जमुळे सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याची झाली होती भयानक परिस्थिती, आता कसं जगत आहे आयुष्य?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.