गुरूवार, मे 15, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘आता होऊ दे धिंगाणा’च्या मंचावर दणक्यात साजरा झाला सिद्धार्थ जाधवचा वाढदिवस, अभिनेत्याचा प्रवास ऐकून कलाकारांनाही अश्रू अनावर

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 23, 2023 | 5:26 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Siddharth Jadhav Birthday

'आता होऊ दे धिंगाणा'च्या मंचावर दणक्यात साजरा झाला सिद्धार्थ जाधवचा वाढदिवस, अभिनेत्याचा प्रवास ऐकून कलाकारांनाही अश्रू अनावर

आजवर मराठी चित्रपटांसह हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पाडणारा कलाकार म्हणजे सिद्धार्थ जाधव. मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही सिद्धार्थने अभिनयाच्या जोरावर स्वतःचा असा चाहतावर्ग निर्माण केला. सर्वांना हसवत खेळवत पडद्यावर दिसणारा, सेटवरील वातावरण हलकं करणारा अशा या सिद्दार्थ जाधवचा इथवरचा प्रवास काही सोप्पा नव्हता. आज या प्रसिद्ध अभिनेत्याचा वाढदिवस आहे. आणि त्याच्या वाढदिवसानिमित्त ‘स्टार प्रवाह’ वाहिनीकडून ‘आता होऊ दे धिंगाणा’च्या मंचावर त्याचा वाढदिवस दणक्यात साजरा करण्यात आला. (Siddharth Jadhav Birthday)

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील दोन मालिका म्हणजेच ‘तुझेच मी गीत गात आहे’ आणि ‘मन धागा धागा जोडते नवा’ या मालिकेच्या कलाकारांनी ‘आता होऊ दे धिंगाणा’ या कार्यक्रमाच्या मंचावर हजेरी लावली होती. यावेळी मालिकेतील कलाकारांच्या उपस्थितीत हा सिद्धार्थचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी मालिकेतील कलाकारांनी ‘स्टार प्रवाह’ची पारंपारिक परंपरा फॉलो करत आधी सिद्धूचं औक्षण केलं. त्यानंतर त्याने केक कापून त्याचा वाढदिवस साजरा केला. यावेळी सिद्धार्थचा प्रवास ऐकून उपस्थित कलाकारांच्या डोळ्यात पाणी आलं.

आणखी वाचा – Video : हजारोंची गर्दी, लोक पाया पडले अन्…; आनंद दिघेंच्या रुपात प्रसाद ओक ठाण्यातील टेंभीनाका देवीच्या चरणी, व्हिडीओ व्हायरल

‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेतील अभिनेता अभिजीत खांडकेकरने सिद्धूचं कौतुक करत म्हटलं की, “सर्वसामान्य कुटुंबातूनआलेला मुलगा स्वबळाने, स्वमेहनतीने, आपला आई वडिलांवर प्रचंड प्रेम करत, आपली आवड जोपासत साऱ्या प्रेक्षकांना पराकोटीचा आनंद देतो तो म्हणजे आपला सिद्धू. सिद्धू तुला कल्पनाही नसेल की तू सहज म्हणून करत असणाऱ्या कित्येक गोष्टी आहेत ज्या आज कितीतरी लोकांना आनंद मिळवून देतात.” यापुढे बोलताना तो असंही म्हणाला, “सिद्धू कधीच दुखी, नाराज दिसला नाही. प्रत्येक कलाकाराने आपल्या आयुष्यातील दुःख, टेन्शन ही कॅमेरा रोल व्हायच्या आधी बाहेर टाकून यावीत आणि त्याच मूर्तिमंत उदाहरण सिद्धू आहे. त्याच्या आयुष्यात काय चाललंय काय नाही हे आम्हाला कधीच माहित नसत.”

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

आणखी वाचा – ‘आदिपुरुष’ फेम मराठमोळ्या अभिनेत्याची तेलुगू चित्रपटात एन्ट्री, ‘या’ भूमिकेत दिसणार, कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव

यावेळी सिद्धार्थ म्हणाला, “प्रत्येक माणसाच्या आयुष्यात वेगवेगळे टप्पे असतात. माझ्या आयुष्यातले हे टप्पे मी खूप एन्जॉय करतो. आयुष्यात बऱ्याच गोष्टी शिकत गेलो. धडपडत गेलो, पडत गेलो पण उभा राहिलो. आनंद वाटण्याने आनंद मिळतो ही जी गोष्ट आहे, ती खूप महत्त्वाची आहे. मी नेहमीच म्हणतो, मी किती चांगला अभिनेता आहे, हे मला माहित नाही. पण मी प्रचंड नशीबवान अभिनेता आहे की मला त्या क्षणाला त्या लोकांचा सहवास मिळतो आणि माझं आयुष्य समृद्ध होतं. धन्यवाद. माझ्यासाठी हा क्षण खूप खास आहे. गेल्यावर्षी माझ्यासाठी महेश मांजरेकर केक घेऊन आले होते. माझे बाबा, दादा आणि आई आली होती. माहित नाही माझं नशीब काय आहे? पण आता माझ्याबरोबर केक कापताना स्वरा आहे.”

Tags: aata hou de dhinganaabhijeet khandkekarentertainmentmarathi actormarathi malikamarathi moviemarathi serialsiddharth jadhavsiddharth jadhav birthdaystar pravah
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

navri mile hitlerla serial off air
Entertainment

झी मराठी वाहिनीवरील सुप्रसिद्ध मालिका वर्षभरानंतर बंद होणार, कलाकार भावुक, म्हणाले, “इथली माणसं…”

मे 15, 2025 | 5:16 pm
kalki koechlin water birth
Entertainment

कल्की कोचलिनने पाण्यात मुलाला दिला जन्म, चुडैल म्हणून लोकांनी हिणवलं अन्…; ‘वॉटर बर्थ’ नक्की काय?

मे 15, 2025 | 3:43 pm
Tinnu Anand On Trolling
Entertainment

रस्त्यावरच्या कुत्र्यांना हॉकी स्टिकने मारण्याच्या विधानावरुन टिनू आनंद यांचं स्पष्टीकरण, म्हणाले, “कुत्र्यांनी माझ्यावर हल्ला केला तर…”

मे 15, 2025 | 3:33 pm
Garbage Collector Passed 10th Exam
Women

पतीपासून विभक्त, लेकाचा एकटीने सांभाळ अन् …; पुण्यातील कचरा वेचणारी ‘ती’ झाली दहावी पास, प्रेरणादायी संघर्ष

मे 15, 2025 | 2:00 pm
Next Post
Neha Dhupia father-in-law Bishan singh Bedi passed Away

नेहा धुपियाचे सासरे व भारताचे माजी गोलंदाज बिशन सिंग बेदी यांचे निधन, लेकासह चित्रपटात एकत्र केलं होतं काम

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.