शुक्रवार, ऑगस्ट 28, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

ज्येष्ठ तेलुगू अभिनेते वयाच्या ७३ व्या वर्षी काळाच्या पडद्याआड, चिरंजीवींनी वाहिली श्रद्धांजली

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 28, 2026 | 10:35 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Telugu actor GV Narayana Rao Death

ज्येष्ठ तेलुगू अभिनेते वयाच्या ७३ व्या वर्षी काळाच्या पडद्याआड, चिरंजीवींनी वाहिली श्रद्धांजली

Telugu actor GV Narayana Rao Death : सुप्रसिद्ध तेलुगू अभिनेता आणि निर्माते जी.व्ही. नारायण राव यांचे हैदराबादमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 73 वर्षांचे होते. अभिनेते कराटे कल्याणी यांनी गुरुवारी जी.व्ही. नारायण यांच्या निधनाची माहिती दिली. त्यांच्या पार्थिवावर 28 ऑगस्ट रोजी वैकुंठ महाप्रस्थानम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अभिनेता चिरंजीवीनेही एका भावनिक सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली.

चिरंजीवीने लिहिले की, “सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते आणि निर्माते आणि माझे प्रिय मित्र जीव्ही नारायण राव गरू यांच्या निधनाने मला खूप धक्का बसला आहे. 1976 मध्ये अंटुलेनी कथा या चित्रपटातून त्यांनी पदार्पण केले. अनेक चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये आपल्या उत्कृष्ट अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण केले. जी.व्ही. नारायण गरू यांच्याशी माझे खूप जवळचे नाते होते. निर्माता म्हणून त्यांनी माझ्यासोबत ‘देवंथाकुडू’ आणि ‘यमुदिकी मोगुडू’ सारखे चित्रपट केले. त्याच्यासोबतच्या माझ्या छान आठवणी होत्या. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. मी त्यांच्या कुटुंबातील सदस्य, जवळचे सहकारी आणि चाहत्यांसाठी माझ्या मनापासून शोक व्यक्त करतो. ओम शांती”.

आणखी वाचा – राम-लक्ष्मणाच्या अतूट बंधाची आठवण करून देणारा ‘बंधू’, उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी पहिल्यांदा एकत्र

जी.व्ही. नारायण राव यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात 1976 मध्ये केली होती. ते अंटुलेनी कथा या चित्रपटात दिसले होते. बालचंदर यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले. जी.व्ही. नारायण राव यांनी जवळपास 100 चित्रपट आणि अनेक टीव्ही शोमध्ये काम केले. जी.व्ही. नारायण गरू हे रजनीकांत यांचे बॅचमेट होते. त्यांनी ‘देवंथाकुडू’ (1984) आणि ‘यमुदिकी मोगुडू’ (1988) या चित्रपटांची निर्मिती केली. या चित्रपटाचा नंतर तामिळमध्ये ‘अथिसया पिरावी’ (1990) म्हणून रिमेक करण्यात आला. या चित्रपटात रजनीकांत मुख्य भूमिकेत होते.

आणखी वाचा – ‘कापूसकोंडा’मुळे सचिन पिळगावकर, मधुराणी गोखले पुन्हा एकत्र, २३ ऑक्टोबरला सिनेमागृहात

त्याने पसुपु कुमकुमा, सुन्दरकाण्ड, गिरिजा कल्याणम आणि गीतांजलि सारखे शो केले. याशिवाय त्यांनी ‘राजा विक्रमार्क’, ‘सीतारमैया गारी’ ‘मनावरलु’, ‘गैंग लीडर’, ‘सूर्या आईपीएस’, ‘सुपर एक्सप्रेस’, ‘प्रेमा चित्रम पेली विचित्रम’, ‘हिटलर’, ‘सहसम’, ‘राजू गारी गाडी 2’, ‘थोलू बोम्मालता’, ‘स्काईलैब” यांसारखे चित्रपट केले आहेत. जी.व्ही. नारायण यांनी आपल्या प्रतिभेच्या जोरावर इंडस्ट्रीत आपला ठसा उमटवला.

स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Telugu actor GV Narayana Rao Death
Entertainment

ज्येष्ठ तेलुगू अभिनेते वयाच्या ७३ व्या वर्षी काळाच्या पडद्याआड, चिरंजीवींनी वाहिली श्रद्धांजली

ऑगस्ट 28, 2026 | 10:35 am
Kapuskonda Movie
Entertainment

‘कापूसकोंडा’मुळे सचिन पिळगावकर, मधुराणी गोखले पुन्हा एकत्र, २३ ऑक्टोबरला सिनेमागृहात

ऑगस्ट 28, 2026 | 10:02 am
Bandhu Marathi Movie
Entertainment

राम-लक्ष्मणाच्या अतूट बंधाची आठवण करून देणारा ‘बंधू’, उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी पहिल्यांदा एकत्र

ऑगस्ट 27, 2026 | 3:07 pm
 Kuku kohli death
Entertainment

ज्येष्ठ चित्रपट निर्मात्यांचे निधन, दोन दिवसांपूर्वी आला हृदयविकाराचा झटका, बॉलिवूडला दिले हिट मुव्ही

ऑगस्ट 26, 2026 | 11:12 am
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.