शुक्रवार, ऑगस्ट 28, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

राम-लक्ष्मणाच्या अतूट बंधाची आठवण करून देणारा ‘बंधू’, उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी पहिल्यांदा एकत्र

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 27, 2026 | 3:07 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Bandhu Marathi Movie

राम-लक्ष्मणाच्या अतूट बंधाची आठवण करून देणारा 'बंधू’, उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी पहिल्यांदा एकत्र

Bandhu Marathi Movie : प्रभू श्रीरामासाठी लक्ष्मण फक्त भाऊ नव्हे, तर विश्वासाचा, कर्तव्याचा आणि आयुष्यभराच्या साथीचा जणू आधार! भावा-भावामधलं नातं शब्दांत मांडता येत नाही… प्रत्येक भावाच्या नात्यात असतो असाच एक न बोलता जाणवणारा जिव्हाळा, संकटात खंबीरपणे पाठीशी उभं राहण्याची ताकद आणि सुख-दुःखात कायम सोबत राहण्याचं वचन. दोन भावांच्या अतूट बंधाची आणि नात्यांच्या कसोटीची हृदयस्पर्शी कहाणी घेऊन ‘बंधू’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मराठी आणि विशेषतः भारतीय चित्रपटसृष्टीत नेहमीच वेगळ्या आणि आव्हानात्मक भूमिका वठविण्यात हातखंडा असलेले राष्ट्रीय पुरस्कार विजेते उपेंद्र लिमये आणि नामांकित इफ्फी विजेते जितेंद्र जोशी ‘बंधू’ चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र. आपल्या सहज, वास्तववादी आणि प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ही जोडी ‘बंधू’ मधून एका वेगळ्या आणि भावनिक नात्याची कहाणी मोठ्या पडद्यावर साकारताना दिसणार आहे.

हिंदीपासून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीपर्यंत आपल्या अभिनयाची छाप उमटवणारे आणि भारतीय चित्रपटसृष्टीतील तीन पिढ्यांचा वारसा पुढे नेणारे अभिनेता रजत बेदी ‘बंधू’ चित्रपटाच्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीशी जोडले गेले आहेत. आगामी ‘बंधू’ या मराठी चित्रपटाचे ते प्रस्तुतकर्ते आहेत. रजत बेदी प्रस्तुत जे एस् डी स्टुडिओ आणि ट्राईफ्लिक्स एंटरटेंमेंट यांच्या सहकार्याने ‘बंधू’ हा चित्रपट येत्या २० नोव्हेंबरला मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होत आहे. चित्रपटाची निर्मिती प्रणव देसाई, जुही देसाई, कुलदीप सुनील ओझा यांनी केली आहे.

आणखी वाचा – ज्येष्ठ चित्रपट निर्मात्यांचे निधन, दोन दिवसांपूर्वी आला हृदयविकाराचा झटका, बॉलिवूडला दिले हिट मुव्ही

‘आटपाडी नाईट्स’, ‘सरला एक कोटी’ सारख्या यशस्वी, मनोरंजक आणि आशयघन चित्रपटांबरोबरच भावनिक प्रसंगांची उत्कृष्ट मांडणी करण्यासाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक नितीन सिंधूविजय सुपेकर यांनी ‘बंधू’ चित्रपटाच्या लेखन, संवाद आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. त्याचबरोबर जनमाणसात लोकप्रिय होऊ पाहणाऱ्या ‘बंधू’ च्या संगीताची आणि पार्श्वसंगीताची जबाबदारी विजय नारायण गवंडे यांनी सांभाळली असुन त्यांच्या भावनिक, मधुर आणि काळजाचा ठाव घेणाऱ्या सुश्राव्य गाण्यांची मेजवानी ‘बंधू’ चित्रपटातून प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार यात काही शंका नाही.

आणखी वाचा – ‘पाच फुटाचा बच्चन’ कोण?, रंगभूमी गाजवल्यानंतर श्रुती मधुदीपची सिनेमात दमदार एन्ट्री

एका छोट्याशा गावात घडणारी ही गोष्ट पडद्यावर दोन भावांचं नातं उलगडताना कुठेतरी आपल्या घरातल्या, आपल्या भावाची आठवण करून देणारी ठरणार आहे. भावाच्या सुखासाठी स्वतःच्या वाट्याचे काटे दूर करणारा भाऊ, नात्यांमधला विश्वास, मनात दडलेला अहंकार आणि परिस्थितीसमोर उभी ठाकणारी भावनिक परीक्षा…या सगळ्यांचा वेध ‘बंधू’ घेणार आहे. नाती, भावना आणि संघर्षांची ही कहाणी पडद्यावरची न वाटता कुठेतरी आपल्या घरातलीच वाटते. प्रेम, संघर्ष, अहंकार, त्याग आणि भावनांची गुंतागुंत यांचा सुरेख मिलाफ असलेली ही कथा प्रेक्षकांना २० नोव्हेंबरपासून एका हृदयस्पर्शी आणि भावनिक प्रवासावर घेऊन जायला सज्ज होत आहे.

Tags: entertainmentmarathi actormarathi movie
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bandhu Marathi Movie
Entertainment

राम-लक्ष्मणाच्या अतूट बंधाची आठवण करून देणारा ‘बंधू’, उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी पहिल्यांदा एकत्र

ऑगस्ट 27, 2026 | 3:07 pm
 Kuku kohli death
Entertainment

ज्येष्ठ चित्रपट निर्मात्यांचे निधन, दोन दिवसांपूर्वी आला हृदयविकाराचा झटका, बॉलिवूडला दिले हिट मुव्ही

ऑगस्ट 26, 2026 | 11:12 am
paach futacha bachchan
Entertainment

‘पाच फुटाचा बच्चन’ कोण?, रंगभूमी गाजवल्यानंतर श्रुती मधुदीपची सिनेमात दमदार एन्ट्री

ऑगस्ट 24, 2026 | 4:48 pm
 Tejaswini Lonari & Samadhan Sarvankar Baby Boy
Entertainment

सुप्रसिद्ध अभिनेत्री झाली आई, केलं चिमुकल्या बाळाचे स्वागत, कौतुकाचा वर्षाव

ऑगस्ट 22, 2026 | 4:21 pm
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.