बऱ्याच कलाकारांची मुलंही त्यांच्या आई-वडिलांच्या पाऊलावर पाऊल टाकत सिनेसृष्टीत पदार्पण करतात. तर काही कलाकारांची मुलंही वेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत. अशातच एक वडील-मुलाची जोडी सिनेसृष्टीत नेहमीच कार्यरत असते ती म्हणजे अभिनेते सुनील तावडे व अभिनेता शुभंकर तावडे. सुनील व शुभंकर हे सिनेसृष्टीत नेहमीच सक्रिय असतात. अशातच शुभंकरचा नुकताच ‘कन्नी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. कन्नी या चित्रपटात शुभंकर मुख्य भूमिकेत पाहायला मिळाला. (shubhankar tawde and father)
नुकताच कन्नी चित्रपटाचा प्रीमियर अगदी दिमाखात पार पडला. यावेळी कन्नी चित्रपटाची संपूर्ण टीम तेथे उपस्थित होती. शुभंकरच्या या प्रीमियर सोहळ्याला त्याच्या आई-वडिलांनी हजेरी लावली होती. लेकाच्या चित्रपटाला त्यांनी हजेरी लावत त्याचं तोंडभरून कौतुकही केलेलं पाहायला मिळालं. आई वडिलांनी दिलेली कौतुकाची थाप प्रत्येक मुलासाठी खूप महत्वाची असते. अभिनेते सुनील तावडे यांनी आपल्या लाडक्या लेकाला या चित्रपटासाठी शुभेच्छा देत त्याचा अभिनयाचं कौतुक केलं आहे.
शुभंकरचा चित्रपट पाहून सुनील तावडे थोडेसे भावुकही झालेले पाहायला मिळाले. त्यांनी आपल्या मुलाचं तोंडभरुन कौतुक केलं. अभिनय विश्वात ही बाप लेकाची जोडी कायम सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारी ठरली आहे. चित्रपटाच्या प्रीमियरमध्ये दोघांचा अनोखा बॉण्डही पाहायला मिळाला. शिवाय त्याचं आईबरोबरच नातंही साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. व्हिडीओमध्ये चित्रपट पाहताना सुनील तावडे यांनी बायकोसह ठेका धरलेला पाहायला मिळत आहे. शुभंकरचा हा कुटुंबाबरोबरचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळत आहे.
‘कन्नी’ या चित्रपटामधून शुभंकर प्रेक्षकांची मन जिंकायला तयार झाला आहे. चित्रपटातील नवरोबा नवरोबा हे रॅप सॉंग चांगलंच चर्चेत आलं आहे. या चित्रपटात शुभंकरसह ऋता दुर्गुळे, अजिंक्य राऊत, वल्लरी विराज व रिशी मनोहर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा चित्रपट ८ मार्च रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे.