बॉलिवूडमधील सुंदर, ,यशस्वी अभिनेत्री म्हणून शिल्पा शेट्टीचे नाव घेतले जाते. आजपर्यंत शिल्पाने अनेक हिंदी,तमिळ, तेलुगू व कन्नड या भाषांच्या चित्रपटामध्ये अभिनय केला आहे. तिने ‘बाजीगर’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले. याबरोबरच तिने अनेक रिॲलिटी शोचे परीक्षक म्हणूनही काम पाहिलं आहे. तसेच योगामुळेही ती अधिक प्रसिद्ध झाली आहे. तिने व्यावसायिक करण कुंद्राबरोबर लग्न केले असून तिच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक चर्चा होत असतात. (Shilpa Shetty on karan kundra)
शिल्पाने राजबरोबर लग्न केल्यानंतर तिच्याबद्दल अनेक चर्चा सुरू झाल्या. व्यावसायिक करण कुंद्राबरोबर लग्नगाठ बांधली. करणचं हे दुसरं लग्न आहे. तिच्या लग्नावरुन अनेकांनी तिला ट्रोलही केले. तिने पैशांसाठी करणबरोबर लग्न केलं असंही बोललं गेलं. या ट्रोलवर आता शिल्पाने उत्तर दिलं आहे. ती म्हणाली की, “जेव्हा मी करणबरोबर लग्न केलं तेव्हा श्रीमंत ब्रिटिश भारतीयांच्या यादीत त्यांचा १०८व्या क्रमांकावर होते. हे सर्व चांगलेच होते पण त्यावेळी लोक शिल्पा शेट्टीला गुगलवर सर्च केलं नाही. तेव्हा मीही खूप श्रीमंत होते आणि आजही मी श्रीमंत आहे. तसेच मी माझे सर्व आयकर, जीएसटी व प्रत्येक बिल मी वेळेत आणि स्वतः भरते”.
पुढे ती म्हणाली की, “यशस्वी महिला ही आपल्यासाठी पैसेवाला जोडीदार शोधत नाही. तसेच राज त्यावेळी श्रीमंत होते पण त्यांच्या आयुष्यात पैसा हा कधीही महत्त्वाचा नव्हता. त्यावेळी राजपेक्षाही खूप श्रीमंत व्यक्ती होत्या ज्यांनी मला लग्नासाठी विचारलं होतं. पण पैसा हा माझ्यासाठी कधीही महत्त्वाचा नव्हता”.
राज व शिल्पा यांनी २००९ मध्ये मुंबईमध्ये लग्न केलं. त्या दोघांनाही आता २ मुलं आहेत. शिल्पा आपल्या फिटनेससाठी अधिक प्रसिद्ध असून फॅशन, योगा यामध्ये अधिक सक्रिय असते.तसेच सोशल मीडियावरही ती सक्रिय असून चाहत्यांच्या सतत संपर्कात असते. नुकतीच ती दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या ‘इंडियन पोलिस फोर्स’मध्ये दिसली होती. या सीरिजमधील तिच्या भूमिकेचेही खूप कौतुक करण्यात आले होते.