बुधवार, एप्रिल 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“त्याचं पूनम पांडेसारखं…”, पूर्वाश्रमीचा पती आदिल खानच्या दुसऱ्या लग्नावर राखी सावंतची प्रतिक्रिया, म्हणाली, “पब्लिसिटी स्टंट…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 9, 2024 | 4:53 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Rakhi Sawant On Adil Khan Durrani Wedding

"त्याचं पूनम पांडेसारखं...", पूर्वाश्रमीचा पती आदिल खानच्या दुसऱ्या लग्नावर राखी सावंतची प्रतिक्रिया, म्हणाली, "पब्लिसिटी स्टंट..."

बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंतचा माजी पती आदिल खान सध्या त्याच्या दुसऱ्या लग्नामुळे चर्चेत आला आहे. त्याने ‘बिग बॉस १२’ फेम सोमी खानबरोबर लग्न केले आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो अचानक सोशल मीडियावर समोर आल्याने साऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. आदिलने सोमीच्या आधी राखीशी लग्न केले होते. त्यांच्या नात्याची बऱ्याच दिवसांपासून चर्चा होती. गेल्यावर्षी त्यांच्यातील भांडणामुळे अनेक चर्चा रंगलेल्या पाहायला मिळाल्या. अभिनेत्रीने तिच्या माजी पतीवर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला यामुळे काही दिवस त्याला जेलमध्येही जावे लागले होते. यानंतर त्याने सोमी खानसह गुपचूप लग्न केले. आदिलच्या दुसऱ्या लग्नावर राखीने प्रतिक्रिया दिली असून याला पब्लिसिटी स्टंट असं म्हटलं आहे.
(Rakhi Sawant On Adil Khan Durrani Wedding)

राखी सावंतने सोशल मीडियावर पोस्ट लिहीत आदिल खानच्या दुसऱ्या लग्नावर प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणाली की, “त्याला इतरांना आनंदी ठेवण्याची खूप आवड आहे, परंतु तो तेव्हाच शुद्धीवर आला जेव्हा तो एकटा पडला”. राखीने कोणाचेही नाव न घेता ही पोस्ट लिहिली नाही. यानंतर लोकांनी तर्क वितर्क काढत ही पोस्ट आदिलनेच लिहिली असल्याचं म्हटलं आहे.

आणखी वाचा – अर्जुन बिजलानी रुग्णालयामध्ये भरती, उपचारादरम्यानचा फोटोही केला शेअर, अभिनेत्याला नेमकं झालं तरी काय?

View this post on Instagram

A post shared by Adil Khan Durrani (@iamadilkhandurrani)

इतकंच नाही तर राखी सावंतने ETimes शी बोलताना आदिलच्या लग्नाबाबत भाष्य केलं आहे. राखी सावंत म्हणाली की, “आदिलने लग्न केले आहे. त्याने कोर्ट मॅरेजही केले आहे”. याबरोबर अभिनेत्रीने असंही सांगितले की, “मी यावर भाष्य करणार नाही. याला पब्लिसिटी स्टंट म्हणत ती म्हणाली की, “पूनम पांडे प्रमाणेच त्याचा व्हिडीओ प्रदर्शित करण्यासाठी पब्लिसिटी स्टंट करत असून त्याचे सत्य लवकरच समोर येईल”.

आणखी वाचा – श्वेता शिंदेच्या मंगळसूत्राची झुमका स्टाइल डिझाइन, काय आहे यामध्ये युनिक?, स्त्रियांची अधिकाधिक पसंती

आदिल खानने ३ मार्च रोजी सोमी खानशी म्हैसूर येथे लग्न केले होते. त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर करण्याबरोबरच आदिलने लिहिले की, “अल्लाहच्या कृपेने आमचा लग्नसोहळा साध्या व सुंदर पद्धतीने पार पडला. हे सांगताना मला आनंद होत आहे”. याबरोबरच आदिलने चाहत्यांचे आशीर्वादही मागितले.

Tags: Adil Khan DurraniAdil Khan Durrani weddingentertainmentrakhi sawantRakhi Sawant On Adil Khan Durrani Wedding
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

veen doghatli hi tutena serial
Entertainment

भयंकर ऊन, घामाच्या धारा अन्…; ‘वीण दोघांतली…’च्या कलाकारांनी ४५ मिनिटांत पूर्ण केलं शूट, बहरणार रोमान्स

एप्रिल 22, 2026 | 2:50 pm
Puja Banerjee pregnant
Entertainment

टेलिव्हिजनची ‘पार्वती’ दुस-यांदा प्रेग्नंट, पळून जाऊन वयाच्या १५व्या वर्षी केलेलं लग्न, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

एप्रिल 22, 2026 | 1:00 pm
Aishwarya Rai updates
Entertainment

“आई ती शेवटी आईच”, एअरपोर्टवर लेकीला घ्यायला पोहोचले ऐश्वर्या-अभिषेक, आराध्याचे फोटोही काढले आणि….

एप्रिल 22, 2026 | 11:00 am
Deepali Sayed Home Coming
Entertainment

घरापासून लांब, मानसिक ताण आणि…; १०० दिवसांनी घरी परतताच दीपाली सय्यदच जंगी स्वागत, म्हणाली, “उंबरठ्यावर…”

एप्रिल 22, 2026 | 9:55 am
Next Post
Hema malini on dharmendra

"ते दिसायला चांगले होते पण…", हेमा मालिनींना धर्मेंद्र यांच्याशी करायचं नव्हतं लग्न, स्वतःच म्हणालेल्या, "काम करताना…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.