शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : लेकाच्या चित्रपटाच्या प्रिमियरला सुनिल तावडेंचे डोळे पाणावले, आनंदाच्या भरात बायकोसह थिएटरमध्येच डान्स केला अन्…; व्हिडीओ व्हायरल

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 9, 2024 | 5:32 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
shubhankar tawde and father

Video : लेकाच्या चित्रपटाच्या प्रिमियरला सुनिल तावडेंचे डोळे पाणावले, आनंदाच्या भरात बायकोसह थिएटरमध्येच डान्स केला अन्...; व्हिडीओ व्हायरल

बऱ्याच कलाकारांची मुलंही त्यांच्या आई-वडिलांच्या पाऊलावर पाऊल टाकत सिनेसृष्टीत पदार्पण करतात. तर काही कलाकारांची मुलंही वेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत. अशातच एक वडील-मुलाची जोडी सिनेसृष्टीत नेहमीच कार्यरत असते ती म्हणजे अभिनेते सुनील तावडे व अभिनेता शुभंकर तावडे. सुनील व शुभंकर हे सिनेसृष्टीत नेहमीच सक्रिय असतात. अशातच शुभंकरचा नुकताच ‘कन्नी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. कन्नी या चित्रपटात शुभंकर मुख्य भूमिकेत पाहायला मिळाला. (shubhankar tawde and father)

नुकताच कन्नी चित्रपटाचा प्रीमियर अगदी दिमाखात पार पडला. यावेळी कन्नी चित्रपटाची संपूर्ण टीम तेथे उपस्थित होती. शुभंकरच्या या प्रीमियर सोहळ्याला त्याच्या आई-वडिलांनी हजेरी लावली होती. लेकाच्या चित्रपटाला त्यांनी हजेरी लावत त्याचं तोंडभरून कौतुकही केलेलं पाहायला मिळालं. आई वडिलांनी दिलेली कौतुकाची थाप प्रत्येक मुलासाठी खूप महत्वाची असते. अभिनेते सुनील तावडे यांनी आपल्या लाडक्या लेकाला या चित्रपटासाठी शुभेच्छा देत त्याचा अभिनयाचं कौतुक केलं आहे.

आणखी वाचा – “त्याचं पूनम पांडेसारखं…”, पूर्वाश्रमीचा पती आदिल खानच्या दुसऱ्या लग्नावर राखी सावंतची प्रतिक्रिया, म्हणाली, “पब्लिसिटी स्टंट…”

View this post on Instagram

A post shared by Shubhankar Tawde (@shubhankar_tawde)

शुभंकरचा चित्रपट पाहून सुनील तावडे थोडेसे भावुकही झालेले पाहायला मिळाले. त्यांनी आपल्या मुलाचं तोंडभरुन कौतुक केलं. अभिनय विश्वात ही बाप लेकाची जोडी कायम सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारी ठरली आहे. चित्रपटाच्या प्रीमियरमध्ये दोघांचा अनोखा बॉण्डही पाहायला मिळाला. शिवाय त्याचं आईबरोबरच नातंही साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. व्हिडीओमध्ये चित्रपट पाहताना सुनील तावडे यांनी बायकोसह ठेका धरलेला पाहायला मिळत आहे. शुभंकरचा हा कुटुंबाबरोबरचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – “ते दिसायला चांगले होते पण…”, हेमा मालिनींना धर्मेंद्र यांच्याशी करायचं नव्हतं लग्न, स्वतःच म्हणालेल्या, “काम करताना…”

‘कन्नी’ या चित्रपटामधून शुभंकर प्रेक्षकांची मन जिंकायला तयार झाला आहे. चित्रपटातील नवरोबा नवरोबा हे रॅप सॉंग चांगलंच चर्चेत आलं आहे. या चित्रपटात शुभंकरसह ऋता दुर्गुळे, अजिंक्य राऊत, वल्लरी विराज व रिशी मनोहर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा चित्रपट ८ मार्च रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे.

Tags: entertainmentmarathi actorshubhankar tawdeshubhankar tawde and fathersunil tawde
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Shilpa Shetty on karan kundra

करण कुंद्राच्या श्रीमंतीकडे पाहून शिल्पा शेट्टीने केलं लग्न, अभिनेत्रीला प्रश्न विचारताच संतापली, म्हणाली, "पैसेवाला जोडीदार…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.