सोमवार, जून 2, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“जुन्या साहेबांबरोबर राहून तुतारीतून आवाज काढू का?”, राजकीय परिस्थितीवरील संकर्षण कऱ्हाडेच्या कवितेने वेधलं लक्ष, म्हणाला, “मत वाया गेलं…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 25, 2024 | 10:29 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Sankarshan Karhade Shared Political Based Poem

"जुन्या साहेबांबरोबर राहून तुतारीतून आवाज काढू का?", राजकीय परिस्थितीवरील संकर्षण कऱ्हाडेच्या कवितेने वेधलं लक्ष, म्हणाला, "मत वाया गेलं…”

आजवर अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने आजवर त्याच्या अभिनयशैलीने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. संकर्षणने मराठी नाटक, मालिका व चित्रपट अशा तिन्ही माध्यमांत महत्त्वपूर्ण कामगिरी बजावत प्रेक्षकांची मनं जिंकली. आजवर संकर्षणने लेखन, दिग्दर्शन, अभिनय व कविता करत प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केलं आहे. अभिनयाशिवाय तो एक उत्तम लेखक, कवी असल्याचे आपण जाणतोच. सोशल मीडियावरही संकर्षण बऱ्यापैकी सक्रिय असतो. नेहमीच तो काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. अशातच संकर्षणने शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. (Sankarshan Karhade Shared Political Based Poem)

संकर्षणने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन सध्याच्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेत एक सुंदर अशी कविता सादर केली आहे. “नमस्कार. सध्याच्या राजकिय परिस्थीतीवर काही लिहिण्याचा मनापासून प्रयत्न केला आणि प्रेक्षकांनी काल तो प्रयत्न अगदी मनापासून स्विकारला. तुम्हीही ऐका, पहा आणि मनापासून सांगा की तुमच्याही मनांत हेच आहे का?”, असं कॅप्शन देत त्याने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

आणखी वाचा – ‘नवरी मिळे हिटलरला’मधील वल्लरीची आई खऱ्या आयुष्यात दिसते इतकी ग्लॅमरस, फोटो पाहून प्रेक्षक म्हणाले, “संतुर मॉम आणि…”

कविता सादर करताना संकर्षण म्हणाला, “एका कुटुंबातील आजोबा हे दुःख सांगत आहेत”.

सगळ्यांचेच चेहरे पडलेलं एक कुटुंब मला भेटलं, खात्यापित्या घरचं तरी दुखी मला वाटलं
माणुसकीच्या नात्याने माझं मन भरून आलं, मीच जवळून जाऊन म्हटलं, का हो काय झालं,
तुमच्यापैकी कोणाला काही झालंय का?, तिन्हीसांजेला कुणी गेलंय का?
कुटुंबप्रमुख आजोबा उठले, सोडत मोठा श्वास, डोळे तांबडे लाल बहुतेक रडले होते ढसाढसा
ऐक तुला सांगतो म्हणाले, असं झालंय, आम्हा सगळ्या कुटुंबाचं एक-एक मत वाया गेलंय,

आता हा माझा नातू बघ नुसता जीवाला घोर आहे, सभेला जायचं, घोषणा द्यायचं याला फारच जोर आहे.
बरं, एवढं करून याने मतही दिलं, तरीही याच भागलं नाही, पण याच्या नेत्याचं इंजिन आजवर सत्तेच्या स्टेजवर लागलं नाही. मग ती सभा, त्या घोषणा, ती गर्दी, तो आवाज त्याच पुढे काय झालं, असं करत याच मत तीन-चारवेळा वाया गेलं.

आणखी वाचा – लेकाचं निधन, मोठा धक्का, नैराश्य अन्…; शेखर सुमन यांचा मोठा खुलासा, म्हणाले, “लेकाच्या मृत्यूनंतर माझं जगणंच…”

View this post on Instagram

A post shared by Sankarshan Karhade (@sankarshankarhade)

आता या माझ्या दुसऱ्या नातवाची आणि त्याच्या नेत्याची सेम टू सेम लाईफ आहे. ना करिअर मे ग्रोथ है, ना जिंदगी मे वाईब है, अरे बाबा वारशाने फक्त पैसा येतो, कर्तृत्व कोणी आणत नाही. भारतभर चालूं तुझी पावलं दमली, पण हात काय चालत नाही. मग ते धोतर, ती काठी, ते आडनांव त्याचं काय झालं, आणि असं करत याचंही मत बरंच वाया गेलं.

आता माझ्या मुलाला राजकारणातलं खूप कळतं, याचं मनं गेली अनेकवर्ष घडाळ्यातील वेळ पाळत,
चुकली वेळ, झाला खेळ वेगळंच संधान साधलं, एका साहेबांचं घड्याळ दुसऱ्या साहेबाने स्वतःच्या हातावर बांधलं. मग नवा साहेब, घड्याळ तेच पुन्हा वेळ पाळू का?, का जुन्या साहेबांबरोबर राहून तुतारीने आवाज काढू का? मग ते वय, तो अनुभव, ती निष्ठा, तो परिवार त्याचं पुढे काय झालं असं करत माझ्या मुलाचं मत वाया गेलं.

आता ही माझी सून अस्मिता, तशी धाडसीच म्हणायची. जरा कुणी नडलं की घरातला बाण काढायची.
मी तिला कितीदा म्हणलं, बाण जपून वापरायचा असतो, एकदा हातातून सुटला की परत येत नसतो गं.
मग जी मनातही नसायची ती भीती खरी झाली, अहो शब्दांनी आग लागायची तिथे हातात मशाल आली.
मग तो बाण, तो बाणा, ते सैनिक यांच्यात असं काय झालं, पण असं करत माझ्या सूनेचं मत वाया गेलं.

आणखी वाचा – अखेर अहिल्यादेवींचं व्रत पूर्ण तर पारूला चक्कर आली अन्…; जीवाला धोका असल्याची शक्यता अधिक, पुढे काय घडणार?

आता ही माझी बायको, ही घडवेल तेच घरात घडतं. नाव हिचं लक्ष्मी हिला कमळ फार आवडतं
मी लगेच पुढे विचारलं माझी उत्सुकतातर दिसली असेल, अहो कमळ जिथल्या तिथेच आहे मग यांचं मत वाया गेलं नसेल. आजोबा म्हणाले ती दुःखात नाही तशी, पण तिच्या मनात तळमळ आहे. कारण ज्यांच्या विरोधात मत दिलं त्यांच्या हातात आता कमळ आहे.
अहो मग ते सत्ताधारी, ते विरोधक, हे प्रामाणिक, ते बाजारी यांच्यात असं काय झालं, त्यामुळे आता असं वाटतंय की माझ्या बायकोच एक मत वाया गेलं.

त्यामुळे पुढाऱ्यांनो तुम्ही कितीही पक्ष बदलून म्हणालात की, हाच माझा पक्ष आहे. तरी एक गोष्ट लक्षात ठेवा, की, आमचं तुमच्यावर लक्ष आहे. त्यामुळे इथून पुढे तरी दिलेल्या मताची किंमत ठेवा, आणि मतदारांनो मत करा आणि लोकशाही जिवंत ठेवा.

Tags: marathi actormarathi poempolitical poemsankarshan karhadeSankarshan Karhade Shared Political Based Poem
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

seema kapoor torchered by own mother
Entertainment

आईकडून मारहाण, टॉर्चर अन् हाल; सुप्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला वाईट काळ, जन्मदातीच वैरी ठरली तेव्हा…

जून 2, 2025 | 7:00 pm
Premachi Goshta fame Swarda Thigales car accident
Entertainment

‘प्रेमाची गोष्ट’मधील मुक्ताचा अपघात, गाडी चालवताना झोप लागली अन्…; अभिनेत्रीचं मोठं नुकसान

जून 2, 2025 | 5:58 pm
Vaishnavi Hagawane Death
Entertainment

वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचं बाळ कोणाजवळच राहीना, आईविना लेकराचे रडून-रडून हाल, हृदयस्पर्शी व्हिडीओ समोर

जून 2, 2025 | 5:00 pm
Radhika Apte Motherhood
Entertainment

बाळ होण्याच्या एक दिवस आधीपर्यंत केलं काम, अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतील सत्य, म्हणाली, “इथं काम करणं…”

जून 2, 2025 | 3:30 pm
Next Post
Prathamesh Parab and Kshitija Ghosalkar Wedding Video

लग्नाला दोन महिने पूर्ण होताच प्रथमेश परबने शेअर केला सर्वात सुंदर व्हिडीओ, रंगतेय चर्चा, म्हणाला, "पडद्यावर आयुष्य घडतं तसा हा आंतरपाट…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.