सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘नवरी मिळे हिटलरला’मधील वल्लरीची आई खऱ्या आयुष्यात दिसते इतकी ग्लॅमरस, फोटो पाहून प्रेक्षक म्हणाले, “संतुर मॉम आणि…”

Saurabh Moreby Saurabh More
एप्रिल 24, 2024 | 8:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Navri Mile Hitlerla fame Sheetal Kshirsagar shared her glamorous photos

'नवरी मिळे हिटलरला'मधील वल्लरीची आई खऱ्या आयुष्यात दिसते इतकी ग्लॅमरस, फोटो पाहून प्रेक्षक म्हणाले, "संतुर मॉम आणि…"

बऱ्याचदा एखाद्या मालिका किंवा चित्रपटांत मुख्य कलाकारांपेक्षा छोट्या-मोठ्या भूमिका साकारणारे कलाकारही चाहत्यांच्या मनावर आपली छाप उमटवतात. त्यांच्या अभिनयामुळे ते आपलं पात्र इतकं छान पद्धतीने साकारतात की, प्रेक्षकांना त्यांचा विसर पडत नाही. ते कलाकार आपल्या भूमिकांमुळे ओळखले जातात. अशीच एक अभिनेत्री म्हणजे ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील सिम्मी काकू अर्थात शीतल क्षीरसागर. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेत शीतल क्षीरसागरची भूमिका नकारात्मक असूनही तिने सगळ्यांच्या कौतुकाची थाप मिळवली होती.

त्यानंतर ती कलर्स मराठीवरील ‘रमा राघव’ मालिकेत आईची भूमिका साकारत आहे. आता ती ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील मुख्य अभिनेत्री लीला म्हणजेच वल्लरी विराजच्या आईची भूमिका साकारत आहे. आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारी शीतल क्षीरसागर सोशल मीडियावरही तितकीच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. अशातच तिने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोंमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

View this post on Instagram

A post shared by Shitaal Kshirsaagar (@sheetal_kshirsagar_)

अभिनेत्री शीतल क्षीरसागरने नुकतंच एक फोटोशूट केलं असून या शूटमधील फोटोंची सध्या सोशल मीडियाववर चर्चा रंगली आहे. या फोटोमध्ये शीतलचा हॉट व बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे. यांमध्ये तिने गुलाबी रंगाचा शॉर्ट वन पीस ड्रेस परिधान केला असल्याचे पाहायला मिळत आहे. “Feeling starry” असं म्हणत तिने हे फोटो पोस्ट केले आहेत. तिचे हे फोटो पाहून चाहत्यांनाही भुरळ पडली आहे. मराठी मनोरंजन अनेक कलाकारांसह तिच्या अनेक चाहत्यांनी तिला याबद्दल दाद दिली आहे.

आणखी वाचा – “जुनाट पद्धत मोडून…”, लेकीसाठी पाळण्याचा वापर न करण्यावरुन सई लोकूरची पोस्ट, म्हणाली, “पाळण्याची जुनी पद्धत…”

शीतलने शेअर केलेल्या या फोटोंना चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. चाहत्यांनी कमेंट्स करत असं म्हटलं आहे की, “शीतल या लूकमध्ये खुपक सुंदर दिसत आहे, खूपच छान दिसत आहेस, संतुर आई, लीला व रेवतीची संतुर आई, तू वल्लरीची आई नव्हे तिची बहीण दिसत आहेस” अशा अनेक कमेंट्सद्वारे चाहत्यांनी शीतलच्या या फोटोंना प्रतिसाद दिला आहे.

आणखी वाचा – Video : जुही चावलाही गौरव मोरेवर फिदा, हिंदी शोमध्ये अभिनेत्याने केलेली नक्कल पाहून भारावली, चाहते म्हणाले, “अभिमान वाटतो कारण…”

दरम्यान, शीतल क्षीरसागर गेल्या २० वर्षांपासून मनोरंजन सृष्टीत कार्यरत आहेत. त्यांनी आजवर ‘का रे दुरावा’, ‘एक होती राजकन्या’, ‘आई कुठे काय करते’, ‘माझी तुझी रेशीमगाठ, रमा राघव’ तसेच आता ‘नवरी मिळे हिटलरला’ अशा अनेक मराठी मालिकेतून त्यांनी अभिनयाची जादु दाखवली आहे. त्यांच्या वाट्याला आलेल्या सकारात्मक व नकारात्मक अशा प्रत्येक भूमिकांनी तिने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.  

Tags: marathi entertainment newsNavri Mile Hitlerlasheetal kshirsagar
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Deepali Sayed First Post After Bigg Boss Marathi 6
Entertainment

पाच लाखांची बॅग सोडली आणि…; एलिमिनेट झाल्यानंतर दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली, “माझ्यासाठी…”

एप्रिल 20, 2026 | 11:29 am
Bigg Boss Marathi 6 Winner
Entertainment

‘बिग बॉस मराठी’ सीझन ६ची विजेती ठरली तन्वी कोलते, ट्रॉफीसह मिळवली इतकी रक्कम, कौतुकाचा वर्षाव

एप्रिल 20, 2026 | 10:15 am
Next Post
Shekhar Suman Shared Emotional Incident

लेकाचं निधन, मोठा धक्का, नैराश्य अन्…; शेखर सुमन यांचा मोठा खुलासा, म्हणाले, "लेकाच्या मृत्यूनंतर माझं जगणंच…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.