शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : “तर आईच्या पुढ्यात डोकं ठेवा…”, संकर्षण कऱ्हाडेने आईबाबत सादर केली कविता, उपस्थितही रडू लागले अन्…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 26, 2024 | 10:42 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Sankarshan Karhade Emotional Poem

संकर्षण कऱ्हाडेने सादर केलेली कविता ऐकून उपस्थित थक्क

Sankarshan Karhade Emotional Poem : आई सारखं दैवत साऱ्या जगतात नाही. आई या शब्दाची ताकद कोणत्याही संकटाला हरवू शकते. आई या शब्दाचा अर्थच आहे आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. आत्मा अन् ईश्वर एकत्र असतील तिथे अपयश, भीती, काळजी ही नाहीच. प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग म्हणजे आई. प्रत्येक आई आपल्या मुलांवर भरभरुन प्रेम करताना दिसते. आता सोशल मीडियाचं युग असल्याने अनेकजण आपल्या आईबद्दल सोशल मिडियाद्वारे व्यक्त होतात. अशातच आता एका मराठमोळ्या अभिनेत्याने आईबाबत केलेली कविता सध्या व्हायरल झाली आहे. ‘झी मराठी’ वाहिनीच्या पुरस्कार सोहळ्याला अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने आईबाबत सादर केलेली कविता अनेकांच्या मनाला भावली.

‘झी मराठी’ पुरस्कार सोहळ्यात संकर्षणच्या या कवितेवर अनेकांच्या डोळ्यात पाणी आलेलं पाहायला मिळालं. अनेक कलाकार यावेळी भावुक झाले.

आणखी वाचा – Paaru Marathi Serial : दामिनीचा डाव तिच्यावरच उलटला, पारू-आदित्यची निखळ मैत्री असल्याचं समोर, अहिल्यादेवींनी घेतली शाळा अन्…

आईसाठीची संकर्षणची कविता,

आज म्हणलं स्वतःला जाब विचारावा,
आईसाठी आपण काय करतो आढावा घ्यावा,

आपण पहाटे उठलोय आणि आई दुपारी असं कधी घडलंय,
आपण जेवायच्या आधी आईचं ताट आपण कधी वाढलंय,

बरं तुम्ही घरी येताना आईसाठी कधी काय आणता,
बरं तुम्ही सांगा तुमच्या आईचा फेव्हरेट कलर कोणता?,

आईला हवं ते मिळू दे अशी प्रार्थना कधी केलीय,
पाहिलं का आई शेवटची कधी ऑनलाईन आलीय,

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

तिच्या बर्थडेची पार्टी तिच्या मैत्रिणींना बोलावून देतो?,
तिने केलेला पसारा कधी आपण आवरतो,

तरीही बाळाला कोणी बोललं की तिचं मन येत भरुन,
आपण मात्र बोलताना शिव्या आईवरुन,

लक्षात ठेवून सतत ती हात पसरते, नशिबापुढे, देवापुढे,
पण स्वतःची मात्र दुपारची बीपीची गोळी विसरते,

आईची आई होऊन कधीतरी बाळांनो वागा नं,
तिचा खडबडीत हात हातात घेऊन एकदा बघा नं,

कितीही कर्तृत्व गाजवा तुम्ही झेप कमी पडते,
आईने कडेवर घेतल्यावरचं आपली उंची वाढते,

उगाच कशाला त्या अध्यात्म आणि श्रद्धेच्या गप्पा हाणता,
आईच्या पोटी जन्माला येतात अन् देव कुठे म्हणता,

आईला सतत मुलांचा ध्यास, त्यांच्या प्रेमाची धुंदी,
बाळांनी गंमत आणली नाही तरी आई सदा आनंदी,

नका करु स्पर्धा कुणाशी, नको कुणाचा हेवा,
जग जिंकायचंय का तुम्हाला आईच्या पायावर डोकं ठेवा.

Tags: marathi actorsankarshan karhadeSankarshan Karhade Emotional Poem
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Shiva Marathi Serial
Entertainment

‘शिवा’ मालिकेतील एकाचवेळी दोन कलाकारांच्या एक्झिट, भावुक पोस्ट शेअर करत सांगितलं कारण, म्हणाले…

जून 6, 2025 | 12:23 pm
Housefull 5 Review
Entertainment

Housefull 5 Review : ‘हाऊसफुल ५’ पाहावा की नाही?, प्रेक्षकांनी चित्रपटाचा ट्विस्टच सांगितला, खरंच तुफान गर्दी आहे का?

जून 6, 2025 | 11:53 am
Niranjan Kulkarni Wedding Video
Entertainment

‘आई कुठे…’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याचं थाटामाटात लग्न, पारंपरिक पद्धतीने पार पडला विवाहसोहळा, लूकची चर्चा

जून 6, 2025 | 11:42 am
Priya bapat online shopping experience
Entertainment

प्रिया बापटला Blinkit ने पाठवला सडलेला कोबी, फोटोही केला शेअर, म्हणाली, “घाणेरड्या दर्जाच्या भाज्या…”

जून 6, 2025 | 11:07 am
Next Post
 Vidya Balan Dance Video

माधुरी दीक्षितसह स्टेजवर परफॉर्म करताना विद्या बालन खाली पडली अन्…; पुढे काय झाले ते पाहून व्हाल थक्क

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.