अभिनेता सुशांत सिंह राजपूतने फक्त छोट्या पडद्यावर नाही तर रुपेरी पडद्यावर देखील स्वतःच्या अभिनयाचा ठसा उमटवला. अभिनेत्याच्या निधनाला आज इतकी वर्ष झाल्यानंतर देखील आजही असे काही सेलिब्रेटी आहेत जे सुशांत सिंह राजपूतला विसरू शकलेले नाहीत. बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांच्या आयुष्यात सुशांत सिंह राजपूतसाठी खास स्थान आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्यासाठी हे कलाकार अनेकदा दुःख व्यक्त करताना दिसतात. अशातच आता ‘बिग बॉस १८’मध्ये करण वीर मेहराने दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतने त्याला कशी मदत केली हेही सांगितले आणि जेव्हा त्याच्या मृत्यूची बातमी आली तेव्हा तो स्तब्ध झाल्याची भावनाही व्यक्त केली. (Karanveer Mehra on Sushant Singh Rajput)
पत्रकार सौरभ द्विवेदी यांच्यासमोर करण वीर मेहराने खुलासा केला. यावेळी त्याने असं म्हटलं की, “सुशांतने मला खूप मदत केली. माझे करिअर वाईट टप्प्यातून जात होते आणि तो अभियांत्रिकीचा विद्यार्थी होता, त्यामुळे त्याने आपली मते स्पष्टपणे आणि पद्धतशीरपणे माझ्यापुढे मांडली. त्याने आपल्या आयुष्याचे नियोजनही चोखपणे केले होते. पुढच्या पाच वर्षांत त्याला कुठे पोहोचायचे आहे, याची त्याला कल्पना होती”. तसंच करणने सांगितले की, सुशांत सिंह राजपूतने त्याची इंडस्ट्रीतील अनेक प्रसिद्ध लोकांशी कशी ओळख करुन दिली. आयुष्यातील कठीण प्रसंगातून जात असताना मार्गदर्शनही केले. त्याच्या दारूच्या व्यसनावर मात करण्यासही त्याला सुशांतनेच मदत केली.
karan expressing how sushant singh rajput helped him at the lowest point of his career 🤍
— sh. (@worldofshhh) December 5, 2024
I never knew he was this close with karan and his whole family 🥹#KaranVeerMehra #BiggBoss18 #BB18pic.twitter.com/x94UgMRqO5
आणखी वाचा – Tharla Tar Mag : सायली-अर्जुन एकमेकांच्या प्रेमात, लवकरच देणार प्रेमाची कबुली, उत्सुकता वाढली
सुशांतच्या अकाली निधनाबद्दल करण म्हणाला की, “जेव्हा मी त्याच्या निधनाबद्दल ऐकले तेव्हा मी दिल्लीत होतो. तो माझ्या आईच्या आणि आमच्या कुटुंबाच्या खूप जवळचा होता. ही बातमी कळताच मी माझ्या आईला आणि कुटुंबीयांना फोन करुन घाबरू नका असे सांगितले. त्यानंतर टीव्ही ऑन केल्यावर सर्वांनाच धक्का बसला. तो एक कौटुंबिक माणूस होता आणि माझ्या खूप जवळचा होता. हे घडल्यावर मी थक्क झालो. ही बातमी कळल्यानंतर आम्ही घरातले २-३ तास एकमेकांशी काहीच बोललो नाही”.
आणखी वाचा – आईच्या ७४ व्या वाढदिवसानिमित्त स्वप्नील जोशीची खास पोस्ट, म्हणाला, “मला या जगात आणल्याबद्दल…”
यानंतर जेव्हा करणला विचारण्यात आले की, “सुशांतला मदतीची गरज आहे असे त्याला कधी वाटले का?” तर त्याने उत्तर दिले, “नाही, मला वाटले नाही की, त्याला मदतीची गरज आहे. पण त्याच्या बाबतीत जे काही घडलं ते ऐकून मला मोठा धक्का बसला. तो एक अतिशय शिस्तबद्ध माणूस होता. त्याच्याकडे एक डायरी होती ज्यामध्ये त्याने १०-१२ दिग्दर्शकांची नावे लिहिली होती ज्यांच्याबरोबर त्याला काम करायचे होते. त्यापैकी ०८-०९ जणांबरोबर त्याने कामही केले होते”.