शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

फुलांच्या पायघड्या, आकर्षक सजावट, रोमॅंटिक डान्स अन्…; प्रथमेश-क्षितिजा यांच्या केळवणाचा अनोखा थाट, खास व्हिडीओ चर्चेत

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 3, 2024 | 10:55 am
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
marathi actor prathamesh parab and wife kshitija ghosalkar kelvan by family new video on instagram

फुलांच्या पायघड्या, आकर्षक सजावट, रोमॅंटिक डान्स अन्…; प्रथमेश-क्षितिजा यांच्या केळवणाचा अनोखा थाट, खास व्हिडीओ चर्चेत

मराठी कलाविश्वात सध्या जोरदार लगीनघाई पाहायला मिळत आहे. गेल्याच महिन्यात माराठीतील अनेक् कलाकरांनी आपल्या जोडीदाराबरोबर लग्नगाठ बांधली. अशातच आता यात आणखी एका कलाकाराची भर पडणार आहे. टाइमपास या चित्रपटातून लोकप्रिय झालेला दगडू म्हणजेच अभिनेता प्रथमेश परब हा लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. ‘आमचं ठरलं’ म्हणत नुकताच त्याने त्याच्या  केळवणाचा एक फोटो शेअर करत तो लग्न करण्यासाठी सज्ज झाल्याचे त्याच्या चाहत्यांना सांगितले. (Prathamesh Parab Kelvan Video On Instagram)

प्रथमेशने गेल्या वर्षी ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी त्याच्या प्रेमाची कबुली दिली होती. प्रथमेश क्षितिजा घोसाळकरबरोबर रिलेशनशिपमध्ये असून याआधी दोघांनी त्यांचे बरेच एकत्र फोटो आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केले. त्यानंतर थेट केळवणाचा फोटो शेअर करत प्रथमेशने लवकरच लग्न करणार असल्याची माहिती दिली आहे. अशातच आता त्यांच्या केळवणाचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. प्रथमेश-क्षितिजा यआणि त्यांच्या सोशल मीडियाद्वारे केळवणाचा व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओला चाहत्यांकडून खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे.

View this post on Instagram

A post shared by Prathamesh Parab (@prathameshparab)

आणखी वाचा – आमिर खानच्या लेकीच्या लग्नात येणाऱ्या पाहुण्यांसाठी असणार ‘हा’ खास नियम, महाराष्ट्रीयन पद्धतीनेच होणार विवाह अन्…

प्रथमेशच्या कुटुंबियांनी हा खास केळवणाचा बेत केला होता. यावेळी कुटुंबीयांनी त्यांच्या पुष्पवृष्टी करत त्यांचे घरात स्वागत केले. त्याचबरोबर धमाल, मज्जा, मस्ती करत अगदी आनंदाच्या वातावरणात त्यांचा हा केळवणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रथमेशच्या कुटुंबियांनी प्रथमेश व क्षितिजा यांच्याबरोबर ठेकाही धरला. यावेळी त्यांचा काही मित्रपरिवारदेखील उपस्थित होता. त्यांनी ही या केळवणच्या खास कार्यक्रमात रंगत आणली. यावेळी प्रथमेश व क्षितिजा यांनी रोमॅंटिक डान्सही केला. त्याचबरोबर एकमेकांना केक भरवत व एकमेकांवर प्रेम करत त्यांनी या केळवणाच्या कार्यक्रमात कुटुंबियांच्या व मित्रपरिवाराच्या उत्साहात आणखी भर घातली.

आणखी वाचा – “मी तुम्हाला ओळखतो आणि…”, सोनू निगम यांनी कौतुक करताच भारावून गेले समीर चौघुले, म्हणाले, “हा क्षण माझ्यासाठी…”

दरम्यान, या केळवणच्या व्हिडीओखाली चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर “अभिनंदन, शुभेच्छा, तुमची जोडी खूपच भारी दिसत आहे, क्या बात है” अशा कमेंट्स करत दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच अभिनेता अभिनय बेर्डेनेदेखील या व्हिडीओखाली “दोघांचे अभिनंदन व शुभेच्छा” असं म्हटलं आहे.   

Tags: entertainment newskelvanmarathi actormarathi entertainmentMarathi newsprathamesh parabprathamesh parab weddingprathamesh parab wife
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
bhago mohan pyare fame marathi actress sarita mehendale joshi shared goodnews with baby boy on new year

लग्नाच्या पाच वर्षांनंतर सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने घेतला आई होण्याचा निर्णय, घरी चिमुकल्याचं आगमन, पोस्टने वेधलं लक्ष

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.