गुरूवार, जुलै 23, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लग्नाच्या पाच वर्षांनंतर सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने घेतला आई होण्याचा निर्णय, घरी चिमुकल्याचं आगमन, पोस्टने वेधलं लक्ष

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 3, 2024 | 11:35 am
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
bhago mohan pyare fame marathi actress sarita mehendale joshi shared goodnews with baby boy on new year

लग्नाच्या पाच वर्षांनंतर सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने घेतला आई होण्याचा निर्णय, घरी चिमुकल्याचं आगमन, पोस्टने वेधलं लक्ष

२०२३ या वर्षात सई लोकुर, राधा सागर या मराठी अभिनेत्रींसह दिशा परमार हिने बाळाला जन्म देत चाहत्यांना गुडन्यूज दिली होती. अशातच आता येत्या नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच आणखी एका मराठी अभिनेत्रीने चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. झी मराठी वाहिनीवरील ‘भागो मोहन प्यारे’ या मालिकेत भुताची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सरिता मेहेंदळे हिने एक आनंदाची बातमी दिली आहे. तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट करून आपण आई झाल्याची गुडन्यूज चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. (Sarita Mehendale Joshi On Instagram)

अभिनेत्रीने नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशीच बाळाला जन्म दिला आहे. सरिताला मुलगा झाला आहे. तिला १ जानेवारी २०२४ रोजी मुलगा झाला. इन्स्टाग्रामवर तिने ‘इट्स अ बॉय’ लिहिलेला एक फोटो शेअर केला आहे. तसेच या पोस्टखाली तिने “हे नवीन वर्ष भरभरून आनंद घेऊन आले आहे. लाडक्या तुझे स्वागत आहे” असं म्हटलं आहे. तसेच तिने बाळाच्या जन्माची तारीखही लिहिली आहे.

View this post on Instagram

A post shared by meSarita (@saritamehendalejoshi)

आणखी वाचा – फुलांच्या पायघड्या, आकर्षक सजावट, रोमॅंटिक डान्स अन्…; प्रथमेश-क्षितिजा यांच्या केळवणाचा अनोखा थाट, खास व्हिडीओ चर्चेत

सरिताने शेअर केलेल्या या पोस्टला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे प्रतिसाद दिला आहे. मधुरा जोशी, निखिल राऊत, हर्षद अतकरी यांसारख्या कलाकारांनी तिला कमेंट्सद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. तर सरीताच्या अनेक् चाहत्यांनीही तिला कमेंट्समध्ये अभिनंदन, शुभेच्छा असं म्हटलं आहे. बाळाच्या येण्याने आईवडिलांसह त्यांच्या चाहत्यांनाही आनंद झाला असल्याचे पाहायला मिळत आहे.    

आणखी वाचा – आमिर खानच्या लेकीच्या लग्नात येणाऱ्या पाहुण्यांसाठी असणार ‘हा’ खास नियम, महाराष्ट्रीयन पद्धतीनेच होणार विवाह अन्…

दरम्यान, सरिताने आजवर अनेक मालिका व नाटकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. ‘कन्यादान’ व ‘सरस्वती’ यांसारख्या तिच्या मालिका या लोकप्रिय होत्या. तसेच ‘भागो मोहन प्यारे’ या मालिकेत तिने मोहनच्या मागे असलेल्या भुताचे म्हणजेच मधुवंती हे पात्र साकारले होते आणि या पात्राला खूप लोकप्रियता मिळाली होती.

Tags: bhago mohan pyareentertainment newsmarathi actressmarathi entertainmentMarathi newssarita mehendale
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Ayesha Khan Police Custody
Entertainment

“मी एक शब्दही बोलले नाही”, आंदोलन प्रकरणात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात, म्हणाली, “घोषणाबाजी…”

जुलै 23, 2026 | 11:13 am
Salman Khan Student Protest
Entertainment

विद्यार्थ्यांच्या निषेधाच्या समर्थनार्थ सलमान खाननेही उठवला आवाज, म्हणाला, “राजकीय रंग…”

जुलै 23, 2026 | 10:36 am
Shabana Azmi asthma attack
Entertainment

CJP च्या निषेधादरम्यान 75 वर्षीय अभिनेत्रीला दम्याचा झटका, अश्रुधुराच्या धुरामुळे तब्येत बिघडली आणि…

जुलै 22, 2026 | 11:42 am
Next Post
aamir khan daughter ira khan and nupur shikhare pre wedding rituals photos viral on social media

Ira Khan-Nupur Shikhare Wedding : डोक्यावर फेटा, एकमेकांना घास भरवला अन्…; लग्नापूर्वी आमिर खानच्या लेकीचं केळवण, पुरणपोळी-मोदकावर मारला ताव

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.