Nupur Shikhare and Ira Khan Marriage : बॉलिवूड अभिनेता आमिर खानच्या घरी सध्या लग्नाची धामधूम पाहायला मिळत आहे. अभिनेत्याची मुलगी आयरा खान बॉयफ्रेंड नुपूर शिखरेबरोबर आज विवाहबंधनात अडकणार आहे. अशातच आयरा व नुपूर यांच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. आज मुंबईमध्ये दोघेही शाही पद्धतीने लग्न करणार असून त्यांच्या लग्नात पाहुण्यांसाठी काही खास नियम बनवण्यात आले आहेत.
आज म्हणजे ३ जानेवारी रोजी महाराष्ट्रीयन रितीरिवाजानुसार आयरा व नूपुर यांचे लग्न होणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यांच्या लग्नाला जवळचे काही खास कुटुंबीय आणि मित्रपरिवार उपस्थित राहणार असल्याची चर्चा आहे. तथापि, या आयरा-नूपुर यांच्या लग्नात पाहुण्यांसाठी एक खास नियम असेल, जो परिणीती चोप्रा व राघव चढ्ढा यांच्या लग्नातही होता. हा नियम नो-गिफ्ट पॉलिसी होय. आयरा-नूपुर यांच्या लग्नात पाहुणे उपस्थित राहणार आहेत. पण यांना लग्नासाठी काही आहेर न आणण्याचा नियम करण्यात आला असल्याचे म्हटले जात आहे.
आयरा-नुपूरच्या यांच्या या नियमामागे एक सुंदर विचार आहे. तो म्हणजे भेटवस्तूंऐवजी पाहुण्यांनी त्यांच्या संस्थेला देणगी देण्याची विनंती केली असल्याचे म्हटले जात आहे. तसेच पिंकव्हिलाच्या वृत्तानुसार, आयराने लग्नात भेटवस्तू स्वीकारण्यास नकार दिला असून पाहुण्यांना भेटवस्तूंऐवजी आशीर्वाद व आगत्सू फाउंडेशनला देणगी द्यावी असे म्हटले आहे.
दरम्यान, आयरा-नूपुर हे आज म्हणजेच ३ जानेवारी रोजी वांद्रे येथील ताज लँड्स एंड या आलिशान हॉटेल शाही पध्दतीने विवाहबद्ध होणार आहेत. यानंतर ६ ते १० जानेवारी दरम्यान दोन रिसेप्शन पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे. यापैकी एक रिसेप्शन दिल्ली येथे तर दुसरे रिसेप्शन जयपूरमध्ये होणार असल्याचे म्हटले जात आहे.