मराठी कलाविश्वात सध्या जोरदार लगीनघाई पाहायला मिळत आहे. गेल्याच महिन्यात माराठीतील अनेक् कलाकरांनी आपल्या जोडीदाराबरोबर लग्नगाठ बांधली. अशातच आता यात आणखी एका कलाकाराची भर पडणार आहे. टाइमपास या चित्रपटातून लोकप्रिय झालेला दगडू म्हणजेच अभिनेता प्रथमेश परब हा लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. ‘आमचं ठरलं’ म्हणत नुकताच त्याने त्याच्या केळवणाचा एक फोटो शेअर करत तो लग्न करण्यासाठी सज्ज झाल्याचे त्याच्या चाहत्यांना सांगितले. (Prathamesh Parab Kelvan Video On Instagram)
प्रथमेशने गेल्या वर्षी ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी त्याच्या प्रेमाची कबुली दिली होती. प्रथमेश क्षितिजा घोसाळकरबरोबर रिलेशनशिपमध्ये असून याआधी दोघांनी त्यांचे बरेच एकत्र फोटो आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केले. त्यानंतर थेट केळवणाचा फोटो शेअर करत प्रथमेशने लवकरच लग्न करणार असल्याची माहिती दिली आहे. अशातच आता त्यांच्या केळवणाचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. प्रथमेश-क्षितिजा यआणि त्यांच्या सोशल मीडियाद्वारे केळवणाचा व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओला चाहत्यांकडून खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे.
प्रथमेशच्या कुटुंबियांनी हा खास केळवणाचा बेत केला होता. यावेळी कुटुंबीयांनी त्यांच्या पुष्पवृष्टी करत त्यांचे घरात स्वागत केले. त्याचबरोबर धमाल, मज्जा, मस्ती करत अगदी आनंदाच्या वातावरणात त्यांचा हा केळवणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रथमेशच्या कुटुंबियांनी प्रथमेश व क्षितिजा यांच्याबरोबर ठेकाही धरला. यावेळी त्यांचा काही मित्रपरिवारदेखील उपस्थित होता. त्यांनी ही या केळवणच्या खास कार्यक्रमात रंगत आणली. यावेळी प्रथमेश व क्षितिजा यांनी रोमॅंटिक डान्सही केला. त्याचबरोबर एकमेकांना केक भरवत व एकमेकांवर प्रेम करत त्यांनी या केळवणाच्या कार्यक्रमात कुटुंबियांच्या व मित्रपरिवाराच्या उत्साहात आणखी भर घातली.
दरम्यान, या केळवणच्या व्हिडीओखाली चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर “अभिनंदन, शुभेच्छा, तुमची जोडी खूपच भारी दिसत आहे, क्या बात है” अशा कमेंट्स करत दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच अभिनेता अभिनय बेर्डेनेदेखील या व्हिडीओखाली “दोघांचे अभिनंदन व शुभेच्छा” असं म्हटलं आहे.