सध्या ऑनलाईन खरेदीचा जमाना आहे. अनेक जण त्यांना लागणारी प्रत्येक वस्तू शक्यतो ऑनलाईन पद्धतीने खरेदी करतो. त्यातील काहींना चांगला अनुभव येतो, तर काहींना वाईट. अनेकांची यामध्ये फसवणूक झाल्याचे नेहमी आपल्या ऐकण्यात येते. असाच अनुभव मराठीतील एक प्रसिद्ध अभिनेत्याला नुकताच आला आहे. नाटक, मालिका, चित्रपट व वेबसीरिज या सर्वच माध्यमांमध्ये झळकलेला सुप्रसिद्ध मराठी अभिनेता निखिल रत्नपारखी यांची ऑनलाईन खरेदीवेळी फसवणूक झाली आहे. (Nikhil Ratnaparkhi got cheated in Online Shopping)
सोशल मीडियाद्वारे खुद्द त्यांनी ही माहिती दिली असून यावेळी त्यांच्या चाहत्यांसमोर हा अनुभव शेअर केला. निखिल रत्नपारखी यांनी नुकताच एक पेनड्राईव्ह खरेदी केला होता. पण जेव्हा तो पेनड्राईव्ह खराब निघाला, तेव्हा त्यांनी याबाबत कंपनीकडे तक्रार दाखल केली. पण कंपनीकडून त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे त्यांनी सोशल मीडियावर हा अनुभव शेअर करत आपला संताप व्यक्त केला.
हे देखील वाचा – Video : “मी वजनदार आहे पण…”, लावणी सादर करत विशाखा सुभेदारचं ट्रोलर्सला सडेतोड उत्तर, म्हणाली, “भूकंप होईल या…”
निखिल यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली आहे. ज्यात ते म्हणाले, “मी ॲमेझॉनवरून एक पेनड्राईव्ह ऑर्डर केला होता. तो डॅमेज होता म्हणून मी त्वरित रिप्लेसमेंट ऑर्डर दिली. तो घेऊन जायला कोणीही आलं नाही. म्हणून त्याविषयी मी चौकशी केली असता टाईम लिमिट उलटून गेल्याचं ते सांगतात. वास्तविक ऑर्डर देऊन सहा दिवस सुद्धा झाले नाहीत. आम्ही काही करू शकत नाही. यापुढे ते काही बोलतच नाहीयेत. आणि आता शेवटी ते रिप्लेसमेंट देत नाहीयेत (पेन ड्राईव्ह महाग आहे) असे हे ॲमेझॉनवाले चोर आणि फसवणारे लोक आहेत. विकत घेतलेल्या प्राॅडक्टची काहीही गॅरंटी नाही. निव्वळ फालतूपणा आहे. त्यामुळे मी असं ठरवलं आहे. जीवाला थोडे कष्ट पडतील पण ॲमेझॉनवरून खरेदी बंद.”
हे देखील वाचा – शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाच्या दिग्दर्शकाने केली अभिनेत्रीची फसवणूक, खुलासा करत म्हणाली, “त्यांनी मला…”
निखिल यांची ही पोस्ट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या पोस्टवर अनेक नेटकरी कमेंटद्वारे ऑनलाईन खरेदीवेळी आलेला वाईट अनुभव सांगताना दिसत आहे. निखिल रत्नपारखी यांनी आजवर अनेक मालिका, चित्रपटांमध्ये दिसले आहे. काही दिवसांपूर्वी ओटीटी प्लॅटफॉर्मवर आलेल्या ‘स्कॅम २००३’ या वेबसीरिजमध्ये त्यांनी काम केलं आहे.