सोमवार, ऑगस्ट 31, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“तू असल्याने जगण्याला…”, रोमँटिक फोटो शेअर करत शशांक केतकरची बायकोसाठी खास पोस्ट, म्हणाला, “नाहीतर हसनेही…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 16, 2023 | 2:28 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Shashank Ketkar Special Post For Wife

"तू असल्याने जगण्याला…", रोमँटिक फोटो शेअर करत शशांक केतकरची बायकोसाठी खास पोस्ट, म्हणाला, "नाहीतर हसनेही…"

असे बरेच कलाकार आहेत जे त्यांच्या प्रियकरांबरोबरचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावरून शेअर करत असतात. शिवाय बरेचदा ते त्यांच्या कुटुंबियांबरोबरच्या गमती जमती पोस्ट करत असतात. अशातच एका मराठमोळ्या अभिनेत्याने त्याच्या पत्नीसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्याकडे साऱ्यांच्या नजरा वळल्या आहेत. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून छोटा पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता शशांक केतकर आहे. छोट्या पडद्यावरून आपली ओळख निर्माण करून चाहत्यांच्या मनात घर केलं. (Shashank Ketkar Special Post For Wife)

या मराठमोळ्या अभिनेत्याने पेशाने वकील असणाऱ्या प्रियांका ढवळेसह २०१७ मध्ये लग्नगाठ बांधली. सध्या ‘मुरांबा’ या मालिकेत शशांक अक्षय ही मुख्य भूमिका साकारतोय. सोशल मीडियावरही शशांकचा वावर नेहमीच पाहायला मिळतो. अशातच नुकतीच शशांकने बायकोच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. शशांकची पत्नी प्रियांका ढवळेचा आज वाढदिवस आहे. प्रियांकाच्या वाढदिवसानिमित्त शशांकने बायकोबरोबरचे रोमॅंटिक फोटो शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. “तू असल्याने जगण्याला अर्थ आहे , नाहीतर हसणेही व्यर्थ आहे. Happy Birthday बायको”, असं त्याने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

आणखी वाचा – Video : “मी वजनदार आहे पण…”, लावणी सादर करत विशाखा सुभेदारचं ट्रोलर्सला सडेतोड उत्तर, म्हणाली, “भूकंप होईल या…”

View this post on Instagram

A post shared by Shashank Ketkar (@shashankketkar)

शशांकने शेअर केलेल्या या पोस्टकडे साऱ्यांचा नजरा वळल्या आहेत. शशांकच्या या पोस्टवर प्रियांकासाठी कौतुकाचा वर्षाव होत आहे. मराठी इंडस्ट्रीतील कलाकार मंडळींनी ही प्रियांकाला वाढदिवसानिमित्त कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच शशांकने शेअर केलेल्या बायकोबरोबरच्या रोमँटिक फोटोसवर प्रेक्षकांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे. व्यवसायाने वकील असणाऱ्या प्रियंकाने स्वत:चा स्किनकेअर ब्रॅन्ड सुरु केला होता.

आणखी वाचा – हनिमूनला असतानाच विशाखा सुभेदारच्या महाविद्यालयीन परीक्षेचा लागला होता निकाल, खुलासा करत म्हणाली, “खूप लवकर लग्न झालं आणि…”

‘होणार सून मी या घरची’, ‘हे मन बावरे’ या मालिकांमुळे शशांक केतकरला खरी ओळख मिळाली आणि तो घराघरांत पोहोचला. सध्या ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘मुरांबा’ या मालिकेत मुख्य भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतोय. मराठीसह शशांकने आता हिंदी सिनेसृष्टीतही आपली पावलं वळविली आहेत.

Tags: murambapriyanka dhavleshashank ketkarstar pravah
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Heavy Weight Lifting
Entertainment

कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

ऑगस्ट 29, 2026 | 10:14 am
Telugu actor GV Narayana Rao Death
Entertainment

ज्येष्ठ तेलुगू अभिनेते वयाच्या ७३ व्या वर्षी काळाच्या पडद्याआड, चिरंजीवींनी वाहिली श्रद्धांजली

ऑगस्ट 28, 2026 | 10:35 am
Kapuskonda Movie
Entertainment

‘कापूसकोंडा’मुळे सचिन पिळगावकर, मधुराणी गोखले पुन्हा एकत्र, २३ ऑक्टोबरला सिनेमागृहात

ऑगस्ट 28, 2026 | 10:02 am
Bandhu Marathi Movie
Entertainment

राम-लक्ष्मणाच्या अतूट बंधाची आठवण करून देणारा ‘बंधू’, उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी पहिल्यांदा एकत्र

ऑगस्ट 27, 2026 | 3:07 pm
Next Post
Nana says about padmashri award

"मला पद्मश्री पुरस्कार का दिला?", नाना पाटेकरांचं मोठं वक्तव्य, म्हणाले, "नानासारख्या माणसाला…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.