बुधवार, एप्रिल 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : “मी वजनदार आहे पण…”, लावणी सादर करत विशाखा सुभेदारचं ट्रोलर्सला सडेतोड उत्तर, म्हणाली, “भूकंप होईल या…”

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
सप्टेंबर 16, 2023 | 1:11 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Vishakha Subhedar New Video

Video : “मी वजनदार आहे पण...”, लावणी सादर करत विशाखा सुभेदारचं ट्रोलर्सला सडेतोड उत्तर, म्हणाली, “भूकंप होईल या...”

मराठी मालिकाविश्वातील दमदार अभिनेत्रींमध्ये ओळखली जाणारी विशाखा सुभेदारची प्रचंड फॅन फॉलोविंग आहे. विशाखाने गेली अनेक वर्ष विनोदी कार्यक्रमांमधून आपल्या अफलातून अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. सध्या विशाखा स्टार प्रवाहवरील ‘शुभविवाह’ या मालिकेत रागिणी आत्याची भूमिका साकारताना दिसत आहे. भलेही ती यामध्ये खलनायिकेची भूमिका साकारत असली, तरी तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांकडून कौतुकाची थाप मिळत आहे. (Vishakha Subhedar New Video)

विशाखा सुभेदार सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ती तिच्या वैयक्तिक आयुष्याशी निगडित अनेक फोटोज व व्हिडिओज शेअर करत आहे. शिवाय, तिच्या डान्स व्हिडिओजची नेहमीच चर्चा होत असते. अशातच विशाखाने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यात तिने पोस्ट केलेल्या आतापर्यंतच्या अनेक व्हिडिओजवर ट्रोल करणाऱ्यांना खडेबोल सुनावले आहे.

विशाखा सुभेदारने ‘मला प्रितीच्या झुल्यात झुलवा’ या गाण्यावर लावणी सादर केली आहे. या व्हिडिओसह पोस्ट करताना ती म्हणते, “मी लाडाची….! आता धरती मातेचं काय होईल? भूकंप होईल ह्या सगळ्या कंमेंट ठेवा… तुमच्यापाशी..! हो.. आहे वजनदार पण मला पण एन्जॉय करु द्या की, तुमचं रंजन करत आलेच आहे की मी.. मज्जेत राहू द्या आणि तुम्ही पण मज्जेत रहा.!”

हे देखील वाचा – ‘रंग माझा वेगळा’च्या टीमने केलं प्रसाद-अमृताचं केळवण, अभिनेत्रीने घेतला उखाणा, म्हणाली, “तुझ्या गळा माझ्या गळा…”

View this post on Instagram

A post shared by Vishakha Subhedar (@subhedarvishakha)

तिच्या या पोस्टवर नेटकऱ्यांसह कलाकारांनी कमेंट करत तिच्या लावणीचे भरभरून कौतुक केले आहे. एका नेटकऱ्याने कमेंट करत म्हटलं आहे, “एक नंबर डियर कॅप्शनची काहीच गरज नाही.आणि जे तब्येती बद्दल बोलतात त्यांना या पैकी एक जरी अदा, डान्स जमतात का? हा प्रश्न स्वताला विचारावा. मग जज करा, नावे ठेवा म्हणावं.” तर अन्य एका नेटकऱ्याने म्हटलंय, “तुम्ही डान्स इतका छान करता की, बस बघतच बसावं तुमच्याकडे”. तर दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनीदेखील विशाखाच्या या पोस्टचे कौतुक केले आहे.

हे देखील वाचा – हनिमूनला असतानाच विशाखा सुभेदारच्या महाविद्यालयीन परीक्षेचा लागला होता निकाल, खुलासा करत म्हणाली, “खूप लवकर लग्न झालं आणि…”

विशाखाने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’, ‘फूबाईफू’, ‘कॉमेडी एक्सप्रेस’ या विनोदी कार्यक्रमांबरोबरच ‘का रे दुरावा’, ‘शेजारी शेजारी पक्के शेजारी’ यासारख्या मालिकांमध्येही काम केलं आहे.

Tags: vishakha subhedarVishakha Subhedar New Video
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Famous Actress and Actor Wedding News
Entertainment

“सुपारी फुटली, लग्न ठरलं” सुप्रसिद्ध अभिनेत्री-अभिनेता अडकणार लग्नबंधनात; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

एप्रिल 21, 2026 | 4:28 pm
dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Next Post
Rubina Dilaik Pregnancy

लग्नाच्या पाच वर्षांनंतर रुबीना दिलैक आई होणार, बेबी बंप दाखवत फोटो केला शेअर, सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.