शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“लग्नानंतर माझ्या सासरवाडीमध्ये…”, मकरंद अनासपुरेंनी सांगितली त्यांची लव्हस्टोरी, म्हणाले, “चाळीत राहत असताना…”

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 24, 2024 | 3:36 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Marathi actor Makarand Anaspure talk anout his marriage see the details

“लग्नानंतर माझ्या सासरवाडीमध्ये...”, मकरंद अनासपुरेंनी सांगितली त्यांची लव्हस्टोरी, म्हणाले, “चाळीत राहत असताना...”

आपल्या विनोदाच्या अनोख्या बाजाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेले अभिनेते म्हणजे मकरंद अनासपुरे. नाटक, मालिका, चित्रपट व वेबसीरिज अशा अनेक माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाद्वारे त्यांनी चाहत्यांच्या मनात आपली एक वेगळी छाप उमटवली आहे. विनोदी भूमिकांसह गंभीर भूमिकाही तितक्याच ताकदीने निभावल्या आहेत. अभिनेत त्यांच्या खासगी आयुष्याविषयी क्वचितच व्यक्त होत असतात. अशातच मकरंद अनासपुरे यांनी नुकतेच एका मुलाखतीत त्यांच्या पत्नीविषयी भाष्य केले आहे.

मकरंद अनासपुरे यांनी नुकतीच ‘नवरदेव बीएससी एग्री’ चित्रपटाच्यानिमित्ताने ‘मित्रम्हणे लाइमलाइट’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या लग्नाबाबत भाष्य केलं. यावेळी ते म्हणाले, “मी ‘जाऊबाई जोरात’ नाटक करत होतो. त्यादरम्यान मी चाळीमध्ये मित्राकडे राहत होतो. तेव्हा संघर्षाचा काळ होता. तिच पँट मी बऱ्याचदा घालून नाटकासाठी जात होतो. आठ बायका आणि आठ मुली असलेलं हे नाटक होतं. त्या नाटकामध्ये माझी सध्याची जी बायको आहे तीही काम करत होती.”

View this post on Instagram

A post shared by Makrand Anaspure (@makrand.anaspure)

आणखी वाचा – “तू पाठिशी आहेस म्हणून…”, लग्नाला तीन वर्ष पूर्ण होताच बायकोसाठी सिद्धार्थ चांदेकरची भावुक पोस्ट, म्हणाला, “बायको आज…”

“ती तिच्या मैत्रिणीकडे नेहमी बोलत असायची की, हा कसा आहे तेच तेच कपडे घालून येतो. तेच तेच कपडे घालायला त्याला काही वाटत नाही का? असं ती सतत म्हणायची. तिची मैत्रिण एक दिवस त्याला म्हणाली की, तुला असं वाटत नाही का? सतत तू त्याच्याबद्दलच बोलत आहेस. तू त्याच्या प्रेमामध्ये पडली आहेस का?. यामधूनच आमच्या नात्याला सुरुवात झाली”.

आणखी वाचा – “घरात तुझे…”, बहिणीच्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे प्रियांका चोप्रा, मन्नारा चोप्रासाठी शेअर केली पोस्ट, म्हणाली, “इतर गोष्टींकडे दुर्लक्ष…”

“जेव्हा तिच्याकडून मला लग्नाची मागणी आली तेव्हा मी होकार दिला. लग्नासाठी आपल्याला कोणी विचारत आहे याच्यापेक्षा अधिक कौतुकाचं काय असू शकतं असं त्यावेळी माझी अवस्था होती. माझं शहरात काहीच नव्हतं. आता तरी मी खात्या-पित्या घरचा वाटतो. तेव्हा फक्त पित्याच घरचा दिसत होतो. तरीपण तिने माझ्यावर विश्वास ठेवला. लग्नानंतर आता सासरवाडीमध्येही पटलं आहे की, अभिनेता नवरा असला तरी एवढं काही वाईट नसतं”. लग्नाबाबत आणि पत्नीविषयी मकरंद यांनी अगदी दिलखुलासपणे भाष्य केलं.

Tags: entertainment newsMakarand Anaspuremarathi actormarathi entertainmentmarathi entertainment newsमकरंद अनासपुरेमनोरंजन बातमीमराठी अभिनेतामराठी मनोरंजन
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

 Celebs Live In Rented Houses
Entertainment

कोट्यवधी कमावतात तरीही कलाकार भाड्याच्या घरात का राहतात?, कारण ऐकून व्हाल थक्क, जाणून घ्या…

जून 6, 2025 | 1:30 pm
Varun Badola on ekta Kapoor serial
Entertainment

“कथा न बघता फक्त पैसे कमवत राहिली अन्…”, एकता कपूरवर भडकला सुप्रसिद्ध अभिनेता, तिच्याच मालिकांमध्ये काम करुनही…

जून 6, 2025 | 1:02 pm
Shiva Marathi Serial
Entertainment

‘शिवा’ मालिकेतील एकाचवेळी दोन कलाकारांच्या एक्झिट, भावुक पोस्ट शेअर करत सांगितलं कारण, म्हणाले…

जून 6, 2025 | 12:23 pm
Housefull 5 Review
Entertainment

Housefull 5 Review : ‘हाऊसफुल ५’ पाहावा की नाही?, प्रेक्षकांनी चित्रपटाचा ट्विस्टच सांगितला, खरंच तुफान गर्दी आहे का?

जून 6, 2025 | 11:53 am
Next Post
Bigg Boss 17 Latest News

Bigg Boss 17 : 'बिग बॉस १७'च्या टॉप ३ स्पर्धकांची नावं समोर, कोण ठरणार विजेता?, प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.