छोट्या पडद्यावरील बहुचर्चित शो ‘बिग बॉस’च्या महाअंतिम सोहळ्याला अवघे काही दिवस उरले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या भागात घरातील विकी जैन घरातून बाहेर पडला. त्यामुळे आता ‘बिग बॉस’ विजेते पदासाठी अंकिता लोखंडे, मुन्नवर फारुकी, मन्नारा चोप्रा, अभिषेक कुमार आणि अरुण महाशेट्टी यांच्यात चुरशीची स्पर्धा होत आहे. त्यामुळे आपल्या आवडत्या स्पर्धकाला जिंकवण्यासाठी चाहते सोशल मीडियावर त्यांना मत देण्याचे आवाहन करत आहेत. अशातच बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रादेखील तिचे चुलत बहीण मन्नाराला पाठिंबा देत असताना पाहायला मिळत आहे.
प्रियंका चोप्राने नुकतीच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक स्टोरी पोस्ट केली आहे. यात प्रियांकाने मन्नाराचा एक फोटो शेअर करत असे म्हटले आहे की, “तू बाकी सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष कर आणि तुझे सर्वोत्तम दे आणि घरात तुझे शेवटचे उरलेले दिवस उत्तम खेळ. तुला अंतिम सोहळ्यासाठी शुभेच्छा.”

काही दिवसांपूर्वी प्रियंका चोप्राची आई मधु चोप्रानेही मन्नारासाठी एक संदेश शेअर केला होता. यात असे म्हटले होते की, “मन्नारा. अंतिम फेरीत गेल्याबद्दल तुझे खूप खूप अभिनंदन. मला तुझा अभिमान आहे. धैर्यवान राहा. तू चोप्रा घराण्याची मुलगी आहेस आणि तू खरोखरच बलवान आहेस. तुला अंतिम फेरीसाठी खूप शुभेच्छा.”
आणखी वाचा – चित्रपटगृहे गाजवल्यानंतर आता ओटीटीवर प्रदर्शनासाठी ‘सॅम बहादूर’ सज्ज, ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित
दरम्यान, ‘बिग बॉस’च्या घरात आल्यापासूनच मन्नारा तिच्या उत्तम खेळीमुळे कायमच चर्चेत राहिली आहे. अशातच तिने अंतिम सोहळ्यापर्यंत मजल मारल्यामुळे तिच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यामुळे तिच्यासह घरातील कोणता स्पर्धक ‘बिग बॉस’च्या विजेतेपदाचा मान कोण पटकावणार? याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.