मराठी चित्रपटसृष्टीतील काही लोकप्रिय कपलपैकी एक म्हणजे अभिनेते सिद्धार्थ चांदेकर अभिनेत्री मिताली मयेकर. सिद्धार्थ आणि मिताली सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. सोशल मीडियावर ते आपले अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. सिद्धार्थ-मिताली यांचा प्रेमविवाह झाला असून त्यांच्या लग्नाला आता ३ वर्षे झाली आहेत.
सिद्धार्थने लग्नाच्या तिसऱ्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. सिद्धार्थने लग्नातील खास फोटो शेअर करत त्याखाली असे म्हटले आहे की, “तीन वर्ष. थ्री चिअर्स. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको. आज मी जिथे आहे त्यात तुझा खूप मोठा वाटा आहे. तू पाठीशी खंबीरपणे उभी होतीस म्हणून मी आज इथपर्यंत आलो आहे”.
सिद्धार्थने शेअर केलेल्या फोटोमध्ये दोघेही खूप सुंदर दिसत असून सिद्धार्थने जांभळ्या रंगाची शेरवाणी व मितालीने हिरव्या रंगाची साडी परिधान केली असल्याचे पाहायला मिळत आहे. दोघेही फोटोमध्ये एकमेकांकडे प्रेमाने पाहत आहेत.
दरम्यान, २४ जानेवारी २०२१ मध्ये पुण्यातील ढेपे वाड्यात लग्न केले होते. त्यांच्या लग्नाचे अनेक् फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अशातच सिद्धार्थने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोलादेखील चाहत्यांकडून लाईक्स व कमेंट्सद्वारे प्रतिसाद मिळत आहे. तसेच अनएक चाहत्यांनी दोघांना लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.