शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“भाषणात नको ते शब्द, हातवारे…”, निवडणूक प्रचारावर सुप्रसिद्ध मराठी अभिनेते संतापले, म्हणाले, “मुलं अर्थ विचारतात तेव्हा…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 19, 2024 | 1:10 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Girish Oak On Election

निवडणूक प्रचारावर सुप्रसिद्ध मराठी अभिनेते संतापले

Girish Oak On Election : अनेक कलाकार मंडळी सध्याच्या आजूबाजूच्या राजकीय प्रश्नांवर आपली मतं व्यक्त करताना दिसत आहेत. मतदानाला अवघा एक दिवस उरलं असून या निवडणुकीच्या लढतीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी प्रमुख सहा पक्षांची लढत होणार आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून दिग्गजांच्या सभा राज्यात विविध ठिकाणी पार पडताना पाहायला मिळाल्या. अखेर सोमवारी सायंकाळी सहा वाजता या प्रचाराचा शेवट झाला असून आता उद्या म्हणजेच बुधवारी मतदान होणार आहे. तर यंदाच्या मतदानात कोणता राजकीय पक्ष बाजी मारणार हे येत्या २३ नोव्हेंबरला समोर येणार आहे.

यंदा निवडणूक प्रचाराला दिग्गज नेत्यांसह कलाकार मंडळीही सहभागी झाली होती. दरम्यान, राजकीय पार्श्वभूमीवर अनेक कलाकार मंडळी आपलं मत मांडताना दिसत आहेत. अशातच ज्येष्ठ अभिनेते डॉ. गिरीश ओक यांच्या राजकीय पार्श्वभूमीवरील पोस्ट मतदानाच्या कालावधीत चर्चेत आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी मतदारांना दोन ‘भाबडे’ प्रश्न विचारले होते. पक्षांकडून देण्यात येणारी आश्वासनं आणि गाड्यांमध्ये पकडण्यात येणा पैसे याबाबतचे हे दोन प्रश्न होते. यानंतर आता गिरीश ओक यांनी राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारी आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये या ज्येष्ठ अभिनेत्याला आणखी एक ‘भाबडा’ प्रश्न पडला आहे.

आणखी वाचा – Video : कॉन्सर्टमध्ये चाहत्याने आयुष्मान खुराणावर उडवले पैसे, गाणं थांबवून फटकारलं, म्हणाला, “हेच पैसे तुम्ही…”

गिरीश यांनी पोस्ट शेअर करत असं म्हटलं आहे की, “मला पडलेला अजून एक ‘भाबडा’ प्रश्न. चित्रपटांना, नाटकांना सेन्सॉर आहे तसं या निवडणूक प्रचार भाषणांना नाही का किंवा का नाही?. अहो सध्या फार पंचाईत होते. मुलांबरोबर कुठल्याही बातम्यांच्या चॅनेलवर ही भाषणं बघताना, ऐकताना. त्या भाषणांमधल्या नको नको त्या शब्दांचे, हातवाऱ्यांचे अर्थ विचारतात मुलं. त्यापेक्षा चित्रपटाच्या आधी जसं पेरेंटल गायडंस १३ + १६ + १८ येतं तसं निवडणूक आयोगाने या भाषणांच्या आधी टाकलं तर बरं होईल नाही का?”.

आणखी वाचा – ‘तारक मेहता…’च्या निर्मात्याची कॉलर पकडण्यावरुन अखेर जेठालालने दिलं स्पष्टीकरण, म्हणाले, “यापुढे मी…”

पुढे त्यांनी असं म्हटलं आहे की, “का तर आम्हाला कळलेलंच आहे की कुठले राजकीय ज्येष्ठ लोकप्रतिनिधी किती अनपार्लमेंटरी बोलतात पण, हे मुलांनाही कळायला नको म्हणून हो. एक सुजाण नागरिक पेरेंटल जबाबदारी”. गिरीश ओक यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर सध्या ते ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेत सूर्या दादाच्या सासऱ्यांची म्हणजेच डॅडींची भूमिका साकारत आहेत.

Tags: girish oakGirish Oak On Electionmarathi actor
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Appi Amchi Collector Serial Updates Appi and Arjun will prepare to amol's illness chemotherapy

Appi Amchi Collector : अमोलच्या आजारपणावर उपचार सुरु, अप्पी-अर्जुनची अमोलला साथ पण…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.