Ayushmann Khurrana In Concert : आयुष्मान खुरानाने केवळ त्याच्या गाण्यांनीच नव्हे तर त्याच्या अमेरिका दौऱ्यातील त्याच्या नम्रतेनेही मन जिंकली आहेत. शिकागो, न्यू यॉर्क आणि सॅन जोस सारख्या शहरांमध्ये त्याच्या ‘आयुष्मान भव’ या बँडसह सादरीकरण करणाऱ्या या अभिनेत्या-गायकाला त्याच्या यूएसमधील दुसऱ्या मैफिलीदरम्यान चाहत्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. पण त्याच्या न्यूयॉर्क कॉन्सर्टमध्ये एक विचित्र घटना घडली जेव्हा एका चाहत्याने स्टेजवर त्याचे कौतुक करण्यासाठी त्याच्यावर डॉलर्सचा वर्षाव केला.
आयुष्मान खुरानाने त्याच क्षणी कॉन्सर्ट थांबवली आणि चाहत्याला पैसे दान करण्यास सांगितले. आयुष्मानची ही क्लिप व्हायरल झाली आहे, ज्यामुळे सोशल मीडियावर त्याचे खूप कौतुक होत आहे. एका यूजरने सोशल मीडियावर त्याच्या प्रतिक्रियेचे कौतुक करताना म्हटले आहे की, “लाइव्ह कॉन्सर्टमध्ये असा अनादर घडताना पाहणे निराशाजनक आहे”. आयुष्मान खुरानाच्या नुकत्याच झालेल्या NYC कॉन्सर्ट दरम्यान, तो गाताना एका चाहत्याने स्टेजवर डॉलर्स फेकले. संगीताचा आनंद घेण्याऐवजी या माणसाने आपली संपत्ती चुकीच्या पद्धतीने दाखवली.
आणखी वाचा – Kantara 2 Teaser : शिवाच्या रुपात ऋषभ शेट्टीची एंट्री, ‘कांतारा २’च्या टीझरची हवा, राजवंशाची कहाणी समोर
पोस्टमध्ये पुढे आयुष्मानचे कौतुक करताना म्हटले आहे की, “त्याच्या नम्रतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या आयुष्मानने शो थांबवला आणि प्रेक्षकांना अशा क्षुल्लक हावभावांऐवजी देणगी देण्याचा विचार करण्याची नम्रपणे विनंती केली. त्याचा प्रतिसाद तर उत्तम होताच पण पैसा खर्च करण्याचाही एक चांगला मार्ग होता. आम्हाला आशा आहे की ही घटना लाईव्ह कॉन्सर्टमध्ये उपस्थित असलेल्या सर्व लोकांच्या आणि कलाकारांच्या कायम लक्षात राहील”. आयुष्मानच्या यूएस दौऱ्याने आठ वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर पुनरागमन केले आहे. पाच शहरांच्या दौऱ्यात शिकागो, न्यूयॉर्क, सॅन जोस, न्यू जर्सी आणि डॅलस यांचा समावेश आहे.
आणखी वाचा – ‘तारक मेहता…’च्या निर्मात्याची कॉलर पकडण्यावरुन अखेर जेठालालने दिलं स्पष्टीकरण, म्हणाले, “यापुढे मी…”
आयुष्मानच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर, आयुष्मान पुढे ‘मॅडॉक फिल्म्स’च्या आगामी ‘थमा’ मध्ये दिसणार आहे, जो ब्लॉकबस्टर हॉरर-कॉमेडी विश्वाचा एक भाग आहे. २०२५ च्या दिवाळीत प्रदर्शित होणारा हा चित्रपट भयपट आणि रोमान्सचे मिश्रण आहे.