‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेत गेल्या काही दिवसांपासून अनेक नवनवीन वळण येत आहेत. मालिकेत अप्पी व अर्जुन यांना एकत्र आणण्यासाठी अमोल प्रयत्न करत होता आणि त्याच्या या प्रयत्नांना यश आले असून नुकतंच मालिकेत अप्पी व अर्जुन अमोलसाठी एकत्र आले. अर्जुनने अप्पी व अमोलबरोबर राहण्याचा निर्णय घेतला आहे. अप्पी-अर्जुन दोघे अमोलसाठी एकत्र आले आहेत. त्यांना एकत्र आल्याचे पाहून प्रेक्षकही आनंदी झाल्याचे पाहायला मिळाले. मालिकेत सगळं काही ठीक चाललं असतानाच मीठाचा खडा पडला तो म्हणजे अमोलच्या आजारपणाचा. (Appi Amchi Collector Serial Updates)
अमोलच्या प्रयत्नानंमुळे अर्जुन-अप्पी एकत्र आले. पण त्यांना एकत्र आणणारा अमोल आजारी पडला. मालिकेत काही दिवसांपूर्वी त्याला आजार झाल्याचे समोर आले होते. मात्र हा आजार नक्की काय होता? याविषयी कुणालाच काहीच कल्पना नव्हती. अमोलच्या मन:शांतीसाठी त्याला झालेल्या आजाराचं सत्य लपवण्याचा निर्णय स्वप्नील आणि रुपालीने घेतला. दिवाळीच्या तयारीत सगळे असतानाच दीप्या अमोलच्या आजाराचं सत्य सर्वांसमोर मांडतो. हे ऐकून सगळे हादरतात.
आणखी वाचा – “हा केवळ अपघात नसून हत्याच…”, ‘अनुपमा’ सेटवरील लाईटमनच्या मृत्यूप्रकरणी मोठा वाद, नुकसान भरपाईचीही मागणी
अशातच आता अमोलच्या आजारपणावर उपचार सुरु होणार आहेत. अमोलला झालेल्या आजारपणाच्या उपचारासाठी त्याची किमोथेरपी केली जाणार आहे आणि यासाठी अप्पी व अर्जुन तयारी करुन घेणार आहेत. याचा एक प्रोमो समोर आला आहे ज्यात त्याच्या किमोथेरपीमुळे अप्पी व अर्जुन यांना अमोल यासाठी कसं तयार करावं हे दाखवण्यात आले आहे. या प्रोमोमध्ये अमोलने किमोथेरपीसाठी खचून जाऊ नये म्हणून त्याला धीर देतात. यावर अमोलही त्यांना “मी कशालाच घाबयरत नाही. मी सिंबा आहे सिंबा” असं म्हणतो.
यावर अप्पी त्याला असं म्हणते की, “बाळा असंच हार न मानता लढत राहा. कारण पुढचा काळ आपल्या सर्वांसाठी खूपच अवघड आहे”. पुढे अमोल हॉस्पिटलमध्ये अॅडमिट झाल्यानंतर तो अचानक बेशुद्ध पडतो आणि यादरम्यान, तो आई आणि बाबा असं तोंडातल्या तोंडात पुटपुटतो. त्यामुळे मालिकेचा हा प्रोमो खूपच भावुक आहे. दरम्यान, आता अमोलच्या या आजारपणात अप्पी व अर्जुन त्याला कशी साथ देणार? आणि अमोलच्या आजारामुळे घाबरलेले अप्पी आणि अर्जुन सावरणार का? हे आगामी भागातून प्रेक्षकांना पाहता येणार आहे.