Dnyanada Ramtirthkar Kelvan : मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय आणि सर्वांची लाडकी अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. ज्ञानदाच्या लग्नाची उत्सुकता तिच्या चाहत्यांना लागली असतानाच, आता तिच्या लग्नापूर्वीच्या विधींना आणि केळवणाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. नुकतेच ज्ञानदाच्या केळवणाचे काही खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून नेटकऱ्यांकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. हे फोटो पाहून ज्ञानदा आणि हर्षद केव्हा लग्नबंधनात अडकणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. ज्ञानदाचे केळवण हे तिच्या आधीच्या मालिकेतील कलाकारांनी केलं असल्याचं समोर आलं आहे. याच मालिकेतील एका अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर केळवणाचे फोट शेअर केले आहेत.
ज्ञानदाचे हे केळवण ‘ठिपक्यांची रांगोळी’ गेम फेम सुप्रिया पाठारे, नम्रता प्रधान या अभिनेत्रींनी मिळून केले. अगदी साधेपणाने, घरच्या घरीच हा केळवणाचा बेत केला होता. ओढण्याचं पाठीमागे बॅकग्राउंड पाहायला मिळालं. आणि त्यावर फुलांच्या माळा सोडलेल्या दिसल्या. इतकंच नाहीतर साग्रसंगीत असा जेवणाचा बेतही त्यांनी केला. ज्ञानदा आणि हर्षद यांनी त्यांचं हे पहिलं केळवण खूप एन्जॉय केलं. ज्ञानदाच्या चेहऱ्यावर लग्नापूर्वीचा ग्लो पाहायला मिळत होता. सध्या ज्ञानदा ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. मालिकेच्या व्यस्त श्येडुलमधून वेळात वेळ काढून तिने तिच्या सहकलाकारांनी केलेल्या केळवणाला हजेरी लावली.
ज्ञानदाने थेट मेहंदीचे फोटो शेअर करत लग्नाची गोड बातमी दिली. ज्ञानदाने मेहंदीचा व्हिडीओ शेअर करत ‘ठरलं… कळवतो लवकरच!’ असं म्हटलं. ज्ञानदा रामतीर्थकर ही ‘धुमधडाका’ आणि ‘ठिपक्यांची रांगोळी’ यांसारख्या मालिकांमधून घराघरात पोहोचली. सध्या ज्ञानदा ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. या मालिकेत ज्ञानदाने काव्या ही भूमिका साकारली आहे. तिच्या या भूमिकेवर चाहते, प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. शिवाय सोशल मीडियावरही ज्ञानदाचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. ज्ञानदा आता केव्हा लग्नबंधनात अडकणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.





