Sonali Kulkarni latest post : अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती अभिनयाबरोबरच सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडीओ, रीलद्वारे चर्चेत असते. सोनालीचे आजवरचे सगळेच चित्रपट गाजले आहेत. याशिवाय अभिनेत्री सामाजिक विषयांवर नेहमीच स्पष्टपणे बोलताना दिसते. इतकंच नाहीतर प्रवासांत येणारे अनेक अनुभव ती वेळोवेळी शेअर करत असते. अशातच आता सोनालीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात तिने विमान सेवेत घडलेली धक्कादायक गोष्ट सांगितली. विमानात लहान बाळासह प्रवास करताना त्या आईने केलेल्या कृत्याबाबत सोनाली स्पष्टच बोलली. सध्या सोनालीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. इतकंच नाहीतर सोनालीच्या या व्हिडीओवर अनेक कलाकार मंडळी आपलं मत मांडताना दिसत आहेत.
व्हिडीओ शेअर करत सोनालीने म्हटलं की, “मी आताच विमानातून उतरले. माझं सामान येईपर्यंत एक अनुभव शेअर करावासा वाटला म्हणून हा व्हिडीओ शूट करतेय,” असं सोनालीने सांगितलं. विमानात एक जोडपं त्यांच्या एक- सव्वा वर्षाच्या बाळाबरोबर प्रवास करत होतं. त्यांनी त्या बाळाला दोघांच्या मधल्या सीटवर बेल्ट लावून बसवलं होतं. पण ते बाळ खूप रडत होतं, मला वाटत होतं की त्या बाळाचे कान दुखत होते. मी मागे वळून त्यांना विचारलं की काही मदत हवी आहे का? मी बाळाला शांत करण्यासाठी थोडावेळ कडेवर घेऊ का? तर ही गोष्ट त्या बाळाच्या आईला लाजिरवाणी वाटली”.
आणखी वाचा – “मला माझा संसार हवाय”, राकेश बापटच्या एकतर्फी प्रेमात आहे राखी, म्हणाली, “मी बॉलिवूड सोडेन”
पुढे ती म्हणाली, “मी तिला म्हटलं की त्या बाळाला कडेवर घ्या, जवळ घ्या. कारण लैंडिंग होत नव्हतं आणि आमचं विमान हवेत होतं. त्या बाईने बाळाला कडेवर घेतलं, बाळ परत रडायला लागलं. तर तिने बाळाला एक थप्पड मारली आणि त्याला दाबायचा प्रयत्न केला. खरे तर बाळ रडतंय यात लाज वाटण्यासारखं काहीच नाही. मुलांना काहीतरी त्रास होत असतो, ते आपल्याला सांगू शकत नाही. विमानात असताना कधी कधी कान दुखतो. त्या बाळालाही काहीतरी त्रास होत असेल. आपण मदत मागायला पाहिजे, त्या बाळाला त्रास देऊन किंवा शिक्षा देऊन काय उपयोग आहे? तुम्हाला काय वाटतं?”, असेही तिने चाहत्यांना विचारलं.
आणखी वाचा – जेवणानंतर आपल्याला मिठाई का हवी असते?, आयुर्वेदात दडलंय याचं रहस्य, वाचा सविस्तर
सोनालीच्या या व्हिडीओवर पालकांतील मुलांबरोबर वागण्याची पद्धत यावर भाष्य केलं आहे. “अगदी बरोबर… छोट्या मुलाला आपल्या भावना कशा व्यक्त करता येणार, बालपण समजण आणि वाढवणं हे जिला समजू शकत तीच खरी आई”, “माया प्रेम आपुलकी हे सगळं संपत चाललंय आता मॅनरिझम स्पेस . मुलांना वाढु द्या मुलांसारखं . सगळं अवघड झालंय. आपण मुलांना लागलं आणि ते रडायला लागलं तर हात रे करुन जमिनीवर हात आपटून त्याला शांत करायचो. आता असं काही केलं तर आयांना वाटतं की त्याच्यावर मारामारीचे संस्कार होतील. काय बोलायचं”, अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.





