शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

कोल्हापूरमध्ये बंगला, शेती अन्…; आई-वडिलांची अशी सेवा करायचे भरत जाधव, जुना व्हिडीओ व्हायरल, म्हणाले, “उशिरा येऊनही माझे पाय दाबायचा अन्…”

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 13, 2023 | 5:41 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
marathi actor bharat jadhav shared special video of his mother and father on his birthday

कोल्हापूरमध्ये बंगला, शेती अन्…; आई-वडिलांची अशी सेवा करायचे भरत जाधव, जुना व्हिडीओ व्हायरल, म्हणाले, "उशिरा येऊनही माझे पाय दाबायचा अन्…"

मराठी मनोरंजनसृष्टीत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे अभिनेते म्हणजे भरत जाधव. त्यांनी आजवर अनेक नाटक, चित्रपट व मालिकांमध्ये नानाविध भूमिका करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. गंभीर, विनोदीसह अनेक प्रकारच्या भूमिकांद्वारे त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप सोडली आहे. भरत यांनी  आतापर्यंत खूप संघर्ष केला आहे. अनेक खडतर परिस्थितीतून यश संपादन केले आहे आणि या यशाचे श्रेय त्यांनी आईवडिलांना दिले आहे आणि हे अनेकवेळा त्यांनी जाहीरपणे सांगितलेही आहे. (Bharat Jadhav On Instagram)

भरत जाधव सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. त्यांचे अनेक फोटो, व्हिडीओ किंवा कामसंबंधीची माहिती सोशल मीडियावर चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. अशातच त्यांनी इनस्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे. काल (१२ डिसेंबर) रोजी भरत यांचा वाढदिवस होता. याच वाढदिवसानिमित्त त्यांनी हा खास व्हिडीओ शेअर केला आहे आणि हा खास व्हिडीओ त्यांच्या आईवडिलांचा आहे. “ज्यांच्यामुळे माझं अस्तित्त्व आहे असे माझे आई-अण्णा” असं म्हणत त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Bharat Jadhav (@sahibharat)

आणखी वाचा – मेघा घाडगेवर रुग्णालयात उपचार सुरू, व्हिडीओ शेअर करत सांगितले आजाराचे कारण, म्हणाली, “हलगर्जीपणा झाला अन्…”

स्टार प्रवाहवरील ‘सुप्रिया सचिन शो’ या कार्यक्रमात भरत यांनी त्यांच्या पत्नीसह हजेरी लावली होती. तेव्हा या कार्यक्रमात त्यांच्या आई-वडिलांनी भरत व त्यांच्या पत्नीचे कौतुक केले होते. यात त्यांच्या वडिलांनी भरतचे कौतुक करत असे म्हटले आहे की, “भरत हा त्याच्या आई-वडिलांना खूप मानतो. आईला तर जास्तच मानतो. आमचा खूप आदर करतो. शूटिंगवरुन रात्री उशिरा आला तरी घरी येऊन आमचे पाय दाबतो. आमची काळजी घेतो. जेवण करायच्या आधी तो आमची तब्येत विचारतो. कोल्हापुरात आम्हाला आमचं घर पाहिजे होतं, तर त्याने नवीन घर बांधलं. शेती नव्हती, तर त्याने शेती विकत घेतली आणि आमची इच्छा पूर्ण केली. दर महिन्याला सगळा किराणा भरतो आणि दहा हजार रुपयेसुद्धा हातात देतो. मी त्याला नेहमी म्हणतो मला काय कमी नाही. आम्ही सुखात आहोत. पण त्याला नेहमीच आमची काळजी असते.” यापुढे भरत यांची आई म्हणते, “भरतने लहानपासूनच माझी खूप सेवा केली आहे. दळण आणून देणे, भाजी आणणे, दिवाळीत सर्वांना फराळ वाटणे किंवा कुठेही जायचं असेल तर तो नेहमीच माझ्याबरोबर यायचा. एकदा माझ्या तब्येतीबद्दल कळताच तो शूटिंग सोडू मला भेटायला आला. भरत हा आमच्याबद्दल आणि आमच्या तब्येतीबद्दल खूपच भित्रा आहे.”

आणखी वाचा – “सतत दात काढत असता”, मुग्धाने वैशंपायने होणाऱ्या नवऱ्याबरोबर फोटो शेअर करताच नेटकऱ्याने सुनावलं, प्रथमेश लघाटे म्हणाला, “तुम्हालाच…”

यापुढे भरत यांच्या आई-वडिलांनी त्यांच्या पत्नीचेदेखील खूप कौतुक केले. “ती त्याची उत्तम सेवा करते. भरत रात्री कितीही उशिरा आला तरीही ती त्याच्यासाठी थांबते. त्याची वाट बघते. ती त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. त्यामुळे भरत आज इतका यशस्वी झाला आहे” असं म्हणत त्यांचे कौतुक केले आहे. त्याचबरोबर भरतने असंच मेहनत करत पुढे जावे. आई-वडील म्हणून आम्ही कायम त्याच्याबरोबर आहोत. आमचा कायम त्याला आशीर्वाद असेल असं म्हणत भरत यांचे कौतुक केले आहे. दरम्यान, या व्हिडीओमध्ये भरत त्यांच्या आईवडिलांना पाहून खूपच भावुक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. तसेच या व्हिडीओखालीही नेटकऱ्यांनी भरत जाधव यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच आई-वडिलांविषयी इतकं प्रेम व आदर पाहून नेटकऱ्यांनी त्यांचे कमेंटमध्ये कौतुक केले आहे.  

Tags: bharat jadhaventertainment newsmarathi actormarathi entertainmentMarathi news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
Next Post
bharat jadhav mother told an old memory of actor video viral on social media

आईची तब्येत बिघडली असताना भरत जाधव लगेचच शूटिंग रद्द करुन निघाले अन्…; आई-वडिलांनीच सांगितलं होतं सत्य, म्हणालेले, "घट्ट मिठी मारत त्याने…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.