‘बिग बॉस मराठी ४’ मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री व नृत्यांगना म्हणजे मेघा घाडगे. मेघाने तिच्या अप्रतिम नृत्यकौशल्याने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य केले आहे. त्याचबरोबर काही चित्रपटांत काम करत तिने प्रेक्षकांचे मनोरंजनही केले आहे. मेघा सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अशातच तिने शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे ती चर्चेत आली आहे.
काही दिवसांपूर्वी मेघाचा वाढदिवस होता. वाढदिवासानिमित्त अनेक चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या होत्या. यानिमित्त तिने इन्स्टाग्राम आकाऊंटद्वारे एक फोटो शेअर केला होता. मला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा, तुम्हा सर्वांना शुभेच्छांसाठी खुप खुप धन्यवाद” असं कॅप्शन देत थेट रुग्णालयामधील फोटो तिने शेअर केले होते. या फोटोंमध्ये मेघा आजारी असून रुग्णालयामध्ये असल्याचं कळलं. अशातच मेघाने तिच्या तब्येतीची अपडेट देत एक व्हिडीओ शेअर केला आहे.
मेघाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात तिने तिच्या वाढदिवसानिमित्त तिला शुभेच्छा देणाऱ्या सर्व चाहत्यांचे आभार मानण्यासाठी इन्स्टाग्राम लाईव्ह केले होते. या लाईव्हदरम्यान तिला अनेकांनी तिच्या आजाराबाबत प्रश्न विचारले होते. यावेळी चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत तिच्या तब्येतीची अपडेट दिली. तसेच यापुढे ती असं म्हणाली आहे की, “व्हायरल तापामुळे मला रुग्णालयात अॅडमिट करण्यात आले आहेत. मी माझ्या अनेक कार्यक्रमांनमित्त गर्दीच्या ठिकाणी जात असते. यादरम्यान काळजी न घेतल्याचा परिणाम माझ्या तब्येतीवर झाला आहे आणि मी उपचारांसाठी रुग्णालयामध्ये दाखल झाली.” असे तिने म्हटले आहे.
यापुढे तिने “याआधी कधीही इतके दिवस रुग्णालयामध्ये अॅडमिट झाले नव्हते. सध्याच्या वातावरणाचा माझ्या तब्येतीवर परिणाम झाला असून सततच्या कामामुळे माझ्याकडून हलगर्जीपणा झाला. त्यामुळे अचानक तब्येत खराब झाली आणि त्यामुळे मला अॅडमिट व्हावं लागलं.” असंही म्हटलं आहे. आता येत्या १५ तारखेनंतर तिचे कार्यक्रम सुरू होणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमांच्या तयारीला लागणार आहे” असं तिने या व्हिडीओमध्ये म्हटले आहे. तसेच या व्हिडीओद्वारे मेघाने तिच्या चाहत्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच अनेक चाहत्यांनीही मेघाला काळजी घ्यायला सांगितले आहे.