सर्वत्र आता पुन्हा एकदा सणांची रेलचेल सुरु झालेली पाहायला मिळत आहे. अशातच काही दिवसांवर गणेशोत्सव आले आहेत. गणेशोत्सवानिमित्त सर्वत्र धामधूम सुरु झालेली पाहायला मिळत आहे. मोठमोठ्या मिरवणुका, ढोल ताशांचे पथक यासाठी सज्ज होताना दिसत आहेत. दरवर्षी महाराष्ट्रात मुंबई-पुण्यात गणपती विसर्जन मिरवणुकींचा वेगळाच थाट अनुभवायला मिळतो. विशेषतः पुण्यात मराठी कलाकारही ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप देतात. असेच एक कलाकारांचे ढोल ताशा पथक ‘कलावंत पथक’. (Astad Kale Post)
अजय पुरकर, आस्ताद काळे, सौरभ गोखले, श्रुती मराठे, शाश्वती पिंपळकर, प्राजक्ता हणमघर, माधवी सोमण, ज्योती मालशे, तेजस्विनी पंडित, हृषीकेश जोशी, प्रसाद ओक, ऋजुता देशमुख, पीयूष रानडे, मयूरी वाघ, अनुजा साठे, परी तेलंग, केतन क्षीरसागर, श्रीकार पित्रे, प्रसाद जवादे, राधिका देशपांडे, मधुरा देशपांडे, नूपुर दैठणकर, तेजश्री वालावलकर, अश्विनी कुलकर्णी, बिपीन सुर्वे ही कलाकार मंडळी पथकात आहेत. ही सर्व कलाकार मिरवणुकींमध्ये बेभान होऊन ढोल-ताशांचा गजर करताना दिसतात.

अशातच या कलावंत ढोल ताशा पथकातून आता एका मराठमोळ्या अभिनेत्याने एक्झिट घेतली असल्याचं समोर आलं आहे. याबाबतची पोस्ट त्या अभिनेत्याने सोशल मीडियावरुन शेअर केली आहे. हा अभिनेता म्हणजे आस्ताद काळे. आस्तादने कलावंत पथक यामधून काढता पाय घेतला आहे. “नमस्कार. मी कलावंत पथक सोडलं आहे. या पथकाशी त्याच्या मिरवणुकांशी, वादनांशी माझा काहीही संबंध नाही. तेव्हा नवीन सभासद नोंदणी, तालमींचं वेळापत्रक, मिरवणुका इ. संबंधी मला संपर्क करु नये. धन्यवाद”, असं म्हणत त्याने पथकाला रामराम केला असल्याचं सांगितलं आहे.
सध्या आस्ताद काळे कोणत्याच मालिकेमध्ये झळकताना दिसत नाही आहे. तर तो सध्या ‘मास्टर माईंड’ या नाटकाद्वारे रंगभूमी गाजवताना दिसत आहे. त्याच हे नाटक सध्या चांगलंच गाजत आहे. इतकंच नव्हे तर सोशल मीडियावरुन नेहमीच काही ना काही शेअर करत तो न पटणाऱ्या मुद्द्यांवर भाष्यही करताना दिसतो.