‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, अप्पीने केलेल्या कामगिरीचं अर्जुनला कौतुक वाटत असतं. त्यामुळे तो हा आनंद साजरा करण्यासाठी घरी गोडाधोडाचही घेऊन येतो. ही गोष्ट रूपाली व मोना यांना काही पटलेली नसते. त्यामुळे या विरोधात कसं पाऊल उचलायचं यासाठी त्या आर्याला तयार करतात. तर इकडे गड किल्ल्यांवर अडकलेल्या काही तरुणांची मदत करत त्यांना वाचवलेलं असतं त्यामुळे त्यांनी तिचं कौतुकही केलेलं असतं, याचाच फायदा घेत आर्या काही केसमध्ये अडकलेल्या मुलांना हाताशी घेत या केसमधून त्यांची सुटका करण्याचं वचन देत त्यांच्याकडून अपर्णा विरोधात मोर्चा काढण्याचा ठरवते. (Appi Amchi Collector Serial Update)
गड किल्ले काही दिवसांसाठी बंद असल्याने ती या विरोधात मोर्चा काढायला सांगते. तर इकडे अप्पीने सगळ्यांसाठीच डबा केलेला असतो तेव्हा अमोल अर्जुनलाही डबा देण्यासाठी आग्रह करतो. अर्जुनही डबा घेऊन जायला तयार होतो तर अप्पी इकडे ऑफिसमध्ये येते तर इकडे मोर्चा घेऊन आलेली मंडळी खूप संताप दाखवत असतात. त्यावेळेला गायतोंडे अप्पीला सांगतात की, मी तुम्हाला सगळं काही समजावून सांगतो की हे नेमकं काय प्रकरण आहे. तर इकडे डबा घेऊन आलेलं पाहून आर्या व चिंचुकेला धक्काच बसतो आणि अर्जुन हा डब्बा मला बनवून अप्पीने बनवून दिला आहे आणि अमोलच्या आग्राहाखातर तुम्ही आणला आहे असं सांगतो. हे ऐकून आर्याला आणखीनच वाईट वाटतं. त्यावेळेला चिंचुके आर्याला सावध करतात की, साखरपुडा तुमचा झाला आहे पण लग्न त्यांचं होईल तुमच्या हातातून साहेब निसटत चालले आहेत त्यामुळे तुम्ही नीट लक्ष देऊन बघा.
घडलेला मोर्च्यांच्या टीव्हीवर बातम्या येत असतात तेव्हा ही बातमी आर्या नेऊन अर्जुनला दाखवते. तेव्हा ती अपर्णाचा कसं चूक आहे हे दाखवून देते मात्र अर्जुन सांगतो की ती कलेक्टर आहे आणि तिने हा निर्णय घेण्यापूर्वी काहीतरी विचार नक्कीच केला असेल. तेव्हा आर्या अर्जुनला स्वतःची बाजू सांगत अपर्णाशी बोलण्यासही सांगते मात्र अर्जुन सांगतो की, हा निर्णय घेण्यास ती माझ्याहून खूप मोठी आहे. ती या जिल्ह्याची कलेक्टर आहे त्यामुळे माझा असा निर्णय तिला काही पटणार नाही आणि ती जे करतीये ते योग्यच आहे. हे ऐकून तर आणखीनच आर्याचा जळफळाट होतो.
आणखी वाचा – हरीशच्या जाण्याचं सत्य समोर येणार का?, दिशा-दामिनी पारूचा खरा चेहरा सर्वांसमोर आणणार का?
आता अप्पी ही परिस्थिती कशी हाताळणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागले आहे. तर इकडे आर्याला अर्जुन व अप्पी यांच्यातील जवळीक पाहून आणखीनच संताप झालेला पाहायला मिळत आहे. आता मालिकेत पुढे काय होणार हे पाहणं रंजक ठरेल.