अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही सध्या खूप चर्चेत आहे. गेल्या महिन्यात ती तिचा बॉयफ्रेंड झहीर इक्बालबरोबर लग्नबंधनात अडकली. मुंबई येथे सोनाक्षी व झहीरने नोंदणी पद्धतीने लग्न केले. त्यांच्या लग्नासाठी मित्र-मंडळी व कुटुंबीयांनी उपस्थिती दर्शवली होती. त्यानंतर लग्नाच्या दिवशीच बॅस्टीयन या अलिशान रेस्टॉरंटमध्ये रिसेप्शन पार्टीचे आयोजन केले होते. या रिसेप्शन पार्टीला बॉलिवूडमधील सर्व अनेक दिग्गज कलाकारांनी उपस्थिती दर्शवली होती. यावेळी सोनाक्षीच्या साडीतील लूकने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले होते. त्याचप्रमाणे अनेकांनी सोनाक्षी व झहीरच्या नात्यावर प्रश्नदेखील उपस्थित केले. (sonakshi sinha one month anniversry)
सोनाक्षी व झहीरने लग्न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सर्वच स्तरातून तिच्यावर टिका केली गेली. लव्ह जिहादला सोनाक्षी पाठिंबा देत असल्याचेही अनेकांनी भाष्य केले. मात्र कोणाच्याही बोलण्याकडे लक्ष न देता दोघांनी लग्न केले. त्यांच्या लग्नासाठी अभिनेत्रीचे आई-वडील व एक भाऊ उपस्थित होता. मात्र तिच्या एका भावाची अनुपस्थिती पाहायला मिळाली. यावरुनही वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या. आता मात्र दोघांच्याही लग्नाला एक महिना पूर्ण झाला आहे.
सोनाक्षीने तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक फोटो शेअर केले आहेत. दोघंही फिलीपिन्समध्ये आपला वेळ घालवत आहेत. यावेळी सोनाक्षीने पतीवरचे प्रेम बोलून दाखवले आहे. हे फोटो शेअर करत सोनाक्षीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “आमच्या लग्नाला एक महिना पूर्ण झाला आहे. यावेळी आम्ही ते केलं जे आम्हाला करायचं होतं. रिकव्हर!!! ही कोणतीही जाहिरात नाही तसेच आम्हाला कोणीही काहीही पोस्ट करायला सांगितलं नाही. पण आम्ही फिलीपिन्समध्ये @thefarmasanbenito च्या सुंदरतेबद्दल सांगणार आहोत”.
सोनाक्षीने पुढे लिहिले की, “एका आठवड्यात आम्हाला सांगितले स्वास्थ्य काय असते. तुमच्या शरीराच्या गरजा समजून घ्या आणि त्यांची काळजी घ्या. निसर्गामध्ये उठणं, व्यवस्थित जेवण, वेळेवर झोपण, डिटॉक्स ट्रीटमेंट व मसाज या सगळ्यामुळे खूप छान वाटत आहे”. त्यांचे काही फोटो समोर आल्यानंतर चाहत्यांनी खूप पसंती दर्शवली आहे. तसेच चाहत्यांनी अनेक प्रतिक्रिया देत कौतुकही केले आहे.