शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान, शरद पवारांच्या हस्ते सन्मान

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 15, 2024 | 11:22 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Ashok saraf jivangaurav purskar

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान, शरद पवारांच्या हस्ते सन्मान

अशोक सराफ हे मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपटांतून, नाटकांतून विविध भूमिका साकारुन ते प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. कधी खळखळून हसावणाऱ्या तर कधी भावुक करणाऱ्या भूमिका त्यांनी साकारल्या. मराठीसह हिंदी चित्रपटांतही त्यांनी महत्त्वपूर्ण काम केलं. नाटक, चित्रपट, मालिका यांमध्ये अनेक भूमिका साकारत त्यांनी कायमच सिनेसृष्टी गाजवली. अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरुपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छ्टांचे दर्शन आपल्या अभिनयातून घडविले आणि रसिकांवर अधिराज्य गाजवले. (Ashok saraf jivangaurav purskar)

अशोक सराफ यांच्या रंगभूमीवरील उल्लेखनीय कामगिरीसाठी नेहमीच त्यांना पुरस्कार देत त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. अशातच नुकताच अशोक सराफ यांना मानाचा पुरस्कार देत त्यांचा सन्मान करण्यात आला. मराठी रंगभूमीसाठी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नाट्यकर्मींचा दरवर्षी नाट्य परिषदेच्या वतीने सन्मान केला जातो. यंदा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना पुरस्कार देत सन्मानित करण्यात आले आहे.

आणखी वाचा – सात वर्षांनी अर्जुनसमोर आला अमोलचा चेहरा, सिंबा मुलगा असल्याचं पाहून आठवणीतही रमला, किडनॅप झालेल्या लेकाला शोधू शकेल का?

View this post on Instagram

A post shared by Marathi Celeb's Katta (@marathicelebkatta)

“अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आयोजित नाटककार गो. ब. देवल स्मृतिदिन. जीवनगौरव पुरस्कार मा. अशोक सराफ यांना प्रदान”, असं कॅप्शन देत त्यांना हा पुरस्कार देतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळत आहे. हा पुरस्कार अशोक सराफ यांना मा. शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये अशोक सराफ यांनी पुरस्कार घेण्यास गेल्यानंतर शरद पवार यांचे पाया पडत आशीर्वाद घेतले.

आणखी वाचा – साक्षीकडून अर्जुन-चैतन्यची मोठी फसवणूक, कसा करतील दोघं याचा सामना?, या मोठ्या संकटात सायलीचाही पाठिंबा

त्यांनतर शरद पवारांच्या हस्ते अशोक यांना पुरस्कार देण्यात आला. यावेळी अशोक सराफ यांनी दिलेल्या भाषणात त्यांनी असंही म्हटलं की, “शरद पवार हे माझे आवडते नेते आहेत. लोकांना माझी कला आवडली, त्यामुळे मी काम करत गेलो. शरद पवारांच्या हस्ते पुरस्कार मिळाला याचा विशेष आनंद आहे. शरद पवारांकडे एकदा माझं एक काम होतं. त्यांनी फक्त तीन मिनिटांत ते काम केलं”.

Tags: ashok sarafAshok saraf jivangaurav purskarentertainmentmarathi actor
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Chhaya Kadam

साता समुद्रापार गौरव ते गुरुंच्या हस्ते सन्मान; छाया कदम यांचा कौतुकसोहळा संपन्न, म्हणाल्या, "वाईट काळातही…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.