मंगळवार, एप्रिल 21, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

साक्षीकडून अर्जुन-चैतन्यची मोठी फसवणूक, कसा करतील दोघं याचा सामना?, या मोठ्या संकटात सायलीचाही पाठिंबा

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 15, 2024 | 9:53 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Tharal Tar Mag Serial Update

साक्षीकडून अर्जुन-चैतन्यची मोठी फसवणूक, कसा करतील दोघं याचा सामना?, या मोठ्या संकटात सायलीचाही पाठिंबा

‘ठरलं तर मग’ मालिकेच्या कथानकात खूप मोठा ट्विस्ट आलेला पाहायला मिळत आहे. साक्षीने पत्रकार परिषद घेत अर्जुन व चैतन्यला संकटात टाकलेलं असतं. हे सर्व पाहून पूर्णाआई देव परीक्षा घेत असल्याचं म्हणते. तेवढ्यात पत्रकार अर्जुन व चैतन्य यांच्या घराबाहेर गराडा घालतात आणि नको तेवढे संशयास्पद प्रश्न विचारुन त्यांना भंडावून सोडतात. अगदी अर्जुन व चैतन्यला बॅन करायचेसुद्धा काही पत्रकार बोलतात. तेवढ्यात सायली पत्रकारांना अर्जुन-चैतन्यच्या खरेपणाचे दाखले देत बॅन करण्याबाबत पत्रकारांना चांगलेच खडेबोल सुनावते. तरीही पत्रकार आरोप करणं सुरुच ठेवतात, त्यावर सायली तुमच्याकडे साक्षी खरं बोलत असल्याचा पुरावा असल्याबाबत विचारणा करते, त्यावर पत्रकार शांत राहतात. (Tharal Tar Mag Serial Update)

अर्जुन व चैतन्य साक्षीच्या बोलण्याकडे लक्ष न देता नाण्याची दुसरी बाजूसमोर येईपर्यंत शांत राहण्यास हात जोडून पत्रकारांना विनंती करतात. दुसरीकडे साक्षी महीपतला जेलमध्ये भेटायला येऊन पत्रकार परिषदेचा व्हिडीओ दाखवते. महीपत हे बघून चक्रावून जातो आणि हे कसं सर्व जमवल्याबद्दल साक्षीकडे विचारणा करताच चैतन्यचा संशय येताच त्याच्या प्रत्येक हालचालीचा पाठपुरावा कसा केला याची इत्यंभूत माहिती महितपतला देते. त्यापुढे साक्षी तुम्हाला जेलमध्ये टाकण्याचा बदला म्हणून चैतन्यलासुद्धा जेलमध्ये टाकायचा विषय महीपतला बोलून दाखवते, पण महीपत मात्र असं काहीही करायचं नसल्याचे तिला सांगतो. कारण चैतन्यकडे पुरावे खरे आहेत आणि साक्षी तू खोटं सांगितलं असल्याने आपण दोघेही त्यात अडकू, त्यापेक्षा अर्जुन बर्बाद होईल आणि चैतन्य त्यामुळे स्वतःहून जीव देईल असं घडवून आणायचं, असंही महीपत साक्षीला सांगतो.

आणखी वाचा – पारू-आदित्यची अनोखी डेट, दामिनी देवी किर्लोस्कर दोघांना शोधू शकतील का?, अहिल्यादेवींचीही काळजी वाढली

साक्षी म्हणते चैतन्य कुणालसारखाच मरेल अशी मनात इच्छा आणते. दुसरीकडे अर्जुन सारख्या येणाऱ्या त्याच कॉल्समुळे पुरता वैतागतो. सायली त्याला शांत करत घरच्यांना त्रास नको म्हणून ऑफिसला जाण्याचे सांगते आणि अर्जुन ऑफिसला निघतो. दुसरीकडे प्रिया साक्षीला भेटून आनंद व्यक्त करते आणि मदत करण्याबद्दल सांगते. साक्षी त्यावर साफ नकार देत काही भाडोत्री गुंडांना बोलवून अर्जुनच्या ऑफिसवर आणि घरावर हल्ला करायला सांगते. एकीकडे अर्जुन व चैतन्य ऑफिसला असताना अचानक काही क्लाएंट येऊन गोंधळ घालू लागतात. चैतन्य व अर्जुन त्यांना खूप समजवायचा प्रयत्न करतात पण कुणीच ऐकण्याच्या मानस्थितीत नसते.

आणखी वाचा – शशांक केतकरने फिल्मसिटीबाहेरील कचऱ्याचा व्हिडीओ शेअर केल्यानंतर BMCने घेतली दखल, स्वच्छ केला परिसर, म्हणाला, “तातडीने…”

चैतन्य मात्र हताश होत या सगळ्याला आपण जबाबदार असल्याचं म्हणत स्वतःला दोषी मानतो, पण अर्जुन त्यात तुझी चूक नसल्याचे सांगतो. दुसरीकडे सायली घरी अस्वस्थ होते आणि कल्पनाला ऑफिसमध्ये जाण्याबद्दल सांगते. कल्पनासुद्धा तिला लगेच परवानगी देते. दुसरीकडे अचानक काही लोकांचा मोर्चा ऑफिसवर येतो. शिवाय अर्जुन व चैतन्यवर खोटे आरोप करत ते ओरडू लागतात. अर्जुन मात्र हा गंभीर विषय शांतपणे घेत पोलिसांना बोलावण्याचे सांगतो. पण ते सगळेजण ऑफिसची नासधूस करतात. अर्जुन व चैतन्य त्यांना रोखायचा खूप प्रयत्न करतात. त्यातला एकजण अर्जुनवर चप्पलसुद्धा उगारतो पण सायली तितक्यात तिथे येऊन चप्पल रोखते. मालिकेच्या पुढील भागात पाहणार आहोत की, अर्जुन सध्याच्या परिस्थितीसमोर हताश होऊन बसलेला असताना सायलीसमोर येऊन मधुभाऊंची केस हातात असून न रडता लढायचं असं ठरवते.

Tags: entertainmentmarathi serialtharal tar magTharal Tar Mag Serial Update
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Deepali Sayed First Post After Bigg Boss Marathi 6
Entertainment

पाच लाखांची बॅग सोडली आणि…; एलिमिनेट झाल्यानंतर दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली, “माझ्यासाठी…”

एप्रिल 20, 2026 | 11:29 am
Next Post
Appi Amchi Collector Promo

सात वर्षांनी अर्जुनसमोर आला अमोलचा चेहरा, सिंबा मुलगा असल्याचं पाहून आठवणीतही रमला, किडनॅप झालेल्या लेकाला शोधू शकेल का?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.