शनिवार, जुलै 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

साता समुद्रापार गौरव ते गुरुंच्या हस्ते सन्मान; छाया कदम यांचा कौतुकसोहळा संपन्न, म्हणाल्या, “वाईट काळातही…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 15, 2024 | 12:11 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Chhaya Kadam

साता समुद्रापार गौरव ते गुरुंच्या हस्ते सन्मान; छाया कदम यांचा कौतुकसोहळा संपन्न, म्हणाल्या, "वाईट काळातही…"

यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलनंतर मराठमोळी अभिनेत्री छाया कदम चर्चेत राहिली. यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलने भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. ‘All We Imagine As Light’ या भारतीय चित्रपटाला कान्समध्ये नामांकन मिळाले आहे. या चित्रपटात मराठमोळ्या अभिनेत्रीचा गौरव झाला. सोशल मीडियावर तसेच सर्वच स्तरातून छाया कदम यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. अशातच छाया कदम यांचा दिग्दर्शक वामन केंद्रे यांनी सत्कार केलेला व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. (Chhaya Kadam )

मराठी सिनेविश्वात छाया कदम यांना प्रा. वामन केंद्रे यांनी खूप मोठा ब्रेक दिला आणि त्यांच्या पाठीशी ते कायम राहिले. गुरुंच्या हस्ते विद्यार्थिनीचा होणारा सन्मान सोहळा खूप काही सांगत आहे. या सन्मान सोहळ्याचा व्हिडीओ छाया यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर करत आभार व्यक्त केले आहेत. या व्हिडीओसह कॅप्शन देत त्यांनी असं लिहिलं आहे की, “वामन केंद्रे सरांच्या रंगपीठ या अभिनयाच्या तालमीत जेव्हा खूप वर्षांपूर्वी नकळत पाऊल टाकले तेव्हा ठाऊकही नव्हते की हा प्रवास इतका फुलत-बहरत जाईल. माझ्यासारख्या सर्वसामान्य घरातून आलेली मुलगी अभिनयाच्या क्षेत्रात येते. तेव्हा तिला रोज लहान सहान गोष्टींनी घडवणारे कुबेराचे हात म्हणजे वामन केंद्रे सर”.

आणखी वाचा – ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान, शरद पवारांच्या हस्ते सन्मानित

View this post on Instagram

A post shared by Chhaya Kadam (@chhaya.kadam.75)

पुढे त्या म्हणाल्या आहेत की, “वामन केंद्रे सरांच्या व माझ्या वैयक्तिक पहिल्या म्हणजेच ‘झुलवा’ नाटकापासून सुरु झालेला हा प्रवास आणि विशेष म्हणजे झुलवा नाटकाचा पहिला प्रयोग शिवाजी नाट्यमंदिर येथे झाला होता आणि त्याच शिवाजी नाट्यमंदिरमध्ये आपल्या गुरुंनी आपला सन्मान करावा याहून वेगळा आनंद नाही. आज आपला सगळा प्रवास साता समुद्रापार गौरविला जात आहे. हा आनंद तर आहेच, पण त्याचे बीज, त्याचा अंकुर जर कोणी माझ्या अंगी, माझ्या जगण्यात पेरला असेल तर ते वामन केंद्रे सर आहेत. माझ्यासारख्या कित्येक चेहऱ्यांना घडवणारे सर, माझ्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर व चांगल्या वाईट काळातही माझ्या पाठी नेहमी एका भक्कम आपलेपणाच्या आधारासारखे उभे होते. आणि पुढेही वडीलधाऱ्याच्या नात्याने उभे राहतील याची मला खात्री आहे”.

आणखी वाचा – सात वर्षांनी अर्जुनसमोर आला अमोलचा चेहरा, सिंबा मुलगा असल्याचं पाहून आठवणीतही रमला, किडनॅप झालेल्या लेकाला शोधू शकेल का?

“सर. तुमचे आभार मानून तुम्हाला परके करणार नाही. आयुष्यभर तुमच्या ऋणात राहीन, कारण ‘झुलवा’पासून सुरु झालेला हा माझा प्रवास तुमचे बोट धरुनच सुरु झाला होता, आणि आज चालत-चालत तो इथपर्यंत पोहोचला आहे. खूप प्रेम वामन केंद्रे सर आणि गौरी केंद्रे मॅडम आणि तुम्हा दोघांच्या आशीर्वादाचा हात असाच कायम माझ्या डोक्यावर राहू दे हीच प्रार्थना”.

Tags: chhaya kadamChhaya Kadam Cannes Film Festivalentertainmentmarathi actress
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
Sankarshan Karhade niyam va ati lagu play won three awards of Akhil Bharatiya Natya Parishad he expressed happiness by sharing post

संकर्षण कऱ्हाडेच्या ‘या’ नाटकाला नाट्यपरिषदेचे तीन पुरस्कार, अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "अनेक प्रयोग..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.