मंगळवार, एप्रिल 21, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सात वर्षांनी अर्जुनसमोर आला अमोलचा चेहरा, सिंबा मुलगा असल्याचं पाहून आठवणीतही रमला, किडनॅप झालेल्या लेकाला शोधू शकेल का?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 15, 2024 | 10:30 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Appi Amchi Collector Promo

सात वर्षांनी अर्जुनसमोर आला अमोलचा चेहरा, सिंबा मुलगा असल्याचं पाहून आठवणीतही रमला, किडनॅप झालेल्या लेकाला शोधू शकेल का?

‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेत सात वर्षांचा लीप आल्यापासून ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडताना पाहायला मिळत आहे. मालिकेत एकामागोमाग एक येणार रंजक वळण पाहणं प्रेक्षकांना उत्सुकतेच ठरत आहे. अर्जुन व अमोलची भेट कधी होणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान अप्पी व अर्जुन यांच्यातला दुरावा कमी करण्यासाठी आता अमोल म्हणजे त्यांचा मुलगा स्वतः प्रयत्न करतानाही पाहायला मिळत आहे. मात्र अद्याप अर्जुन व अमोलची भेट झालेली नाही त्यामुळे ही भेट ही कधी होणार?, हे वडील मुलाचं नातं कधी बहरणार?, याकडेही साऱ्यांच्या नजरा लागून राहिलेल्या आहेत. (Appi Amchi Collector Promo)

अशातच मालिकेच्या एका प्रोमोने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. या प्रोमोमध्ये तब्बल सात वर्षांनी अर्जुनसमोर अमोलचा चेहरा येणार आहे. अमोलला पहिल्यांदा पाहताना अर्जुनला भरुन आलं आहे. मात्र अमोल व अर्जुनची भेट ही प्रत्यक्षात होत नाही कारण अमोलला काही गुंडांनी किडनॅप केलेलं असतं. अमोल त्याच्या मामाबरोबर बाहेर आलेला असतो तेव्हा काही गुंड अमोलला घेऊन पळून जातात. त्यावर दीपेश अर्जुन व अप्पीला फोन करुन सांगतो.

आणखी वाचा – साक्षीकडून अर्जुन-चैतन्यची मोठी फसवणूक, कसा करतील दोघं याचा सामना?, या मोठ्या संकटात सायलीचाही पाठिंबा

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

अप्पी येऊन अमोलची चौकशी करते तितक्यात तिथे अर्जुन येतो. आणि तो अप्पीवर भडकतो की, “आता तू अमोलला इथे का घेऊन आलीस. तो उत्तराखंडला हॉस्टेलला होता ना?”, यावर अप्पीला काहीच कळत नाही ती विचारते की, “तू काय बोलत आहेस आणि कोणतं हॉस्टेल”. अप्पी सांगते की, “मी पुण्यात आले तेव्हाच अमोल माझ्याबरोबर आला आहे. गेले दोन महिने तो माझ्याबरोबर आहे”. हे ऐकून अर्जुन सांगतो, “मग तू त्याला माझ्यापासून दूर का ठेवलं?, त्याला तुला मला भेटवायचं नव्हतं ना?, असं म्हणत दोघे एकमेकांशी भांडू लागतात”.

आणखी वाचा – पारू-आदित्यची अनोखी डेट, दामिनी देवी किर्लोस्कर दोघांना शोधू शकतील का?, अहिल्यादेवींचीही काळजी वाढली

यावर अप्पीचे बाबा दोघांना ओरडतात आणि शांत करतात. त्यानंतर अप्पी अर्जुनला अमोलचा फोटो दाखवते. अमोल म्हणजेच सिंबा हा त्याचा मुलगा असल्याचं समोर येताच अर्जुन रडू लागतो आणि त्याला सिंबाबरोबरचे खास क्षण आठवतात. आता किडनॅप केलेल्या अमोलला अर्जुन कसा शोधणार हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल.

Tags: Appi Amchi CollectorAppi Amchi Collector Promoentertainmentmarathi serialzee marathi
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Famous Actress and Actor Wedding News
Entertainment

“सुपारी फुटली, लग्न ठरलं” सुप्रसिद्ध अभिनेत्री-अभिनेता अडकणार लग्नबंधनात; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

एप्रिल 21, 2026 | 4:28 pm
dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Next Post
Satvya Mulichi Satavi Mulgi serial update Netra and Indrani succeeded in gettingdivine dagger disappears

देवीआई भक्तांच्या हाकेला धावली, अस्तिकट्यार मिळवण्यात त्रिनयना देवीच्या लेकींना यश, आता तरी विरोचकाचा वध होणार का?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.