शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

बायकोच्या वाढदिवसानिमित्त हटके शुभेच्छा देत हेमंत ढोमेने व्यक्त केलं प्रेम, म्हणाला, “पाटलीणबाई आज तुमचा जन्म झाला नसता तर…”

Shamal Sawantby Shamal Sawant
जानेवारी 1, 2025 | 3:34 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
hemant dhome on kshitee jog

हेमंत ढोमेने क्षिती जोगला दिल्या हटके शुभेच्छा

मराठी मनोरंजन क्षेत्रातील आघाडीच्या लोकप्रिय जोड्यांमध्ये हेमंत ढोमे व क्षिती जोग यांचे नाव घेतले जाते. हेमंत व क्षिती हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असलेले बघायला मिळतात. एकमेकांसाठी ते सोशल मीडियावर अनेक पोस्टदेखील शेअर करताना दिसतात. ७ डिसेंबर २०२४ रोजी दोघांच्याही लग्नाला १२ वर्ष पूर्ण झाली. यानिमित्ताने हेमंतने सोशल मीडियावर केलेली पोस्ट चांगलीच चर्चेत राहिली. हेमंतने दोघांचाही खूप गोड फोटो शेअर करत “या वेडेपणाचा एक तप पूर्ण. असाच वेडेपणा चालू ठेऊ. बाकी काय होईल मग आपोआप. लव्ह यु पाटलीण बाई”. असं लिहिलं होतं. आशातच आता हेमंतच्या दुसऱ्या पोस्टनेही सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. (hemant dhome on kshitee jog)

क्षितीचा आज म्हणजे १ जानेवारी रोजी वाढदिवस असतो. या दिवसाचे निमित्त साधून हेमंतने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्याने क्षितीबरोबरचे काही रोमॅंटिक फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत त्याने लिहिले की, “पाटलीणबाई आज तुमचा जन्म झाला नसता तर काही मजाच आली नसती! बाकी आपलं सेलिब्रेशन तर थांबत नसतं. Happywala Birthday my love”. या हटके शुभेच्छा सगळ्यांच पसंत पडल्या आहेत. अनेक कलाकार व चाहत्यांनी क्षितीला वाढदिवसांच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आणखी वाचा – बॉलिवूडला कंटाळून दिग्दर्शक अनुराग कश्यप मुंबई सोडणार, स्वतः खुलासा करत म्हणाले, “खूप किळस…”

View this post on Instagram

A post shared by Hemant Dhome | हेमंत ढोमे (@hemantdhome21)

हेमंत व क्षिती हे २०१२ साली लग्नबंधनात अडकले. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी त्यांच्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला होता. ‘सावधान शुभमंगल’ या नाटकाच्या तालमीदरम्यान भेट झाली होती. त्यावेळी त्यांच्यामध्ये मैत्री झाली आणि कालांतराने त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

आणखी वाचा – श्रेयस तळपदेच्या सुखी संसाराची २० वर्ष, बायकोसाठी लिहिली खास पोस्ट, म्हणाला, “आयुष्य जगण्याचा…”

दरम्यान हेमंत व क्षिति ‘झिम्मा २’ या चित्रपटाच्या निमित्ताने चांगलेच चर्चेत आले होते. २०२१ साली आलेल्या ‘झिम्मा’ च्या यशानंतर त्यांनी ‘झिम्मा २’ या चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन हेमंतने केले होते. आता क्षितीची मुख्य भूमिका असणारा व हेमंतने दिग्दर्शन केलेला ‘फर्स्टक्लास दाभाडे’ हा चित्रपट २४ जानेवारी २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये क्षितीसह सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ, राजन भिसे, हरिष दुधाडे, निवेदिता सराफ हे कलाकारदेखील दिसणार आहेत.  

Tags: hemant dhomekshitee jogkshitee jog birthday
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
ranbir kapoor with family

रणबीर कपूरचं कुटुंबासहित नवीन वर्षांचं जंगी सेलिब्रेशन, राहाच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, फोटो व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.